(फोटो सौजन्य- सोशल मीडिया)
युवा पॅन-इंडिया स्टार राशि खन्ना अलीकडेच एका कार्यक्रमात सहभागी झाली होती जिथे तिने तिच्या आगामी चित्रपट ‘द साबरमती रिपोर्ट’बद्दल चर्चा केली. संभाषणादरम्यान तिने तिचा अनुभव आणि हा प्रकल्प निवडण्यामागील प्रेरणा याबद्दल खुलासा केला. तिने हा चित्रपट का निवडला हे विचारल्यावर राशीने स्पष्ट केले की, “एक व्यक्ती म्हणून ही भूमिका माझ्यासाठी वेगळी आहे आणि जेव्हा मला ती भूमिका साकारण्याची संधी मिळाली तो क्षण खास आहे. अशी एक गोष्ट जिने अनेक गोष्टीचा उलगडा करून सत्य दाखवल, मला माझे तथ्य बरोबर समजले. हा एक सोपा निर्णय नव्हता आणि मला दाखवून द्यायचे होते. मला काय झाले ते समजून घ्यायचे होते आणि साबरमतीसारख्या खास गोष्टीचा भाग बनायचे होते”. असे अभिनेत्रीने सांगितले.
हे देखील वाचा – Diwali 2024: दिवाळीत फटाके फोडण्याच्या विरोधात आहेत ‘हे’ सिनेस्टार, चाहत्यांना दिला पर्यावरण वाचवण्याचा संदेश!
चित्रपटात एका पत्रकाराची भूमिका करणाऱ्या राशीने या चित्रपटातील संदेश आणि प्रेक्षक ट्रेलरकडून काय अपेक्षा करू शकतात याबद्दल खास गोष्ट सांगितली अभिनेत्री म्हणाली की, “बऱ्याच गोष्टी आहेत ज्या कदाचित ट्रेलरमध्ये देखील प्रकट होतील.” पुढे ती म्हणाली, कलाकार म्हणून आमच्यावर सामाजिक जबाबदाऱ्या आहेत आणि जे लोक ते पाहत आहेत त्यांच्यावर त्याचा परिणाम होणार आहे हे मला माहीत आहे. अर्थात, आम्हाला याची जाणीव होती आणि म्हणूनच आमच्या टीमनेही विशेष मेहनत घेतली असे मला वाटते. सत्य दाखवणारे काहीतरी घेऊन येण्यासाठी त्यांनी वर्षानुवर्षे काम केले आहे. आणि यामुळेच मला चित्रपटाकडे आकर्षित केले, अन्यथा मी तो कधीच केला नसता.” असे राशी खन्नाने सांगितले. नुकताच प्रदर्शित झालेला टीझर पाहता, चित्रपट काय ऑफर करतो हे पाहण्यासाठी प्रेक्षक उत्सुक आहेत.
‘द साबरमती रिपोर्ट’मध्ये विक्रांत मॅसीसह राशी खन्ना मुख्य भूमिकेत आहेत. चित्रपटात, राशीने साबरमती एक्स्प्रेस घटनेमागील सत्य उघड करण्याच्या मिशनवर एका पत्रकाराची भूमिका केली आहे. धीरज सरना दिग्दर्शित, चित्रपट गुजरातमधील गोध्रा रेल्वे स्थानकाजवळ 27 फेब्रुवारी 2002 च्या दु:खद घटनांचे अन्वेषण करतो.
हे देखील वाचा – Ami Je tomar: लाइव्ह परफॉर्ममध्ये विद्या बालन पडली, मात्र जिंकले चाहत्यांचे मन, व्हिडिओ पाहून झाले प्रभावित!
हा चित्रपट येत्या 15 नोव्हेंबर 2024 रोजी चित्रपटगृहात दाखल होणार आहे. ‘द साबरमती रिपोर्ट’ व्यतिरिक्त, राशि खन्ना ‘तलाखों में एक’ नावाच्या आणखी एका चित्रपटात विक्रांत मॅसीसोबत पुन्हा एकत्र येणार आहे, जो लवकरच प्रदर्शित होणार आहे. तिच्याकडे ‘तेलुसू काडा’ हा तेलुगु चित्रपटही आहे त्याची देखील अभिनेत्री लवकरच घोषणा करणार आहे. तसेच, विक्रांत मॅसी ‘१२ फेल’ या चित्रपटाच्या यशानंतर नुकताच ‘सेक्टर 36’ या वेब सिरीजमध्ये झळकला. आणि आता अभिनेता आणखी नवनवीन चित्रपट घेऊन प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहे.