(फोटो सौजन्य - इंस्टाग्राम)
बॉलीवूडचे प्रसिद्ध जोडपे रिचा चड्ढा आणि अली फजल यांनी 16 जुलै रोजी आपल्या मुलीचे या जगात स्वागत केले. 20 जुलै 2024 रोजी या जोडप्याने सोशल मीडियावर एक पोस्ट शेअर करून चाहत्यांना ही आनंदाची बातमी दिली. आता या जोडप्याने त्यांच्या नुकत्याच दिलेल्या मुलाखतीत त्यांच्या राजकुमारीचे नाव देखील उघड केले आहे. ऋचा चड्ढा आणि अली फजल यांनी आपल्या मुलीचे नाव ‘झुनेरा इडा फजल’ असे अभिमानाने नाव ठेवले आहे. एका मुलाखतीत या जोडप्याने आई-वडील झाल्यानंतर आयुष्यात झालेल्या बदलांबद्दल देखील सांगितले आहे.
वडील झाल्यानंतर अली फजलचे आयुष्य कसे बदलले?
अली फजलने सांगितले की, मुलीच्या आगमनानंतर, जीवनातील एक पोकळी कशी भरून निघते, ज्याची तुम्हाला कल्पनाही नसते. अली फजल म्हणाला, ‘आता कामावर लक्ष केंद्रित करणं माझ्यासाठी खूप कठीण झालं आहे. मी घराबाहेर पडल्यावर माझी मुलगी काय करत असेल याची मला नेहमी काळजी वाटते. कारण मला तिला सतत भेटायची इच्छा करते. मला माझी मुलगी जुनेरासोबत कायम राहायचे आहे आणि तिला माझ्यासोबत ठेवायचे आहे.’ असे अभिनेत्याने या मुलाखतीत सांगितले.
हे देखील वाचा- डोळ्यात आग, चेहऱ्यावर राग, भयानक अवस्थेत रक्तात माखलेली ‘ही’ अभिनेत्री आहे तरी कोण?
रिचाने देखील पालकत्वाबाबतचा तिचा अनुभव शेअर केला
बॉलीवूड अभिनेत्री रिचा चड्ढा हिने पालकत्वाबाबतचे तिचे अनुभव शेअर केले आहेत. ती म्हणाली की, ‘मी पालकत्वाबद्दल खूप वाचन थांबवले आहे कारण असे केल्याने माहितीबद्दल गोंधळ होऊ शकतो. याशिवाय, याचा नैसर्गिक पालकत्वावरही परिणाम होऊ शकतो. तिने पुढे सांगितले की बाळाच्या जन्मानंतर, डॉक्टरांनी तिला पालकत्वाच्या अनेक मूलभूत गोष्टी सांगितल्या, ज्यामुळे तिला मदत झाली. ‘ असे अभिनेत्रीने सांगितले आहे. आता याचबरोबर, या जोडप्याने त्यांच्या मुलीचे नाव उघड केले आहे, जाणून घेऊयात या सुंदर नावाचा अर्थ काय आहे.
हे देखील वाचा- कमल हासन यांच्या वाढदिवसानिमित्त ‘ठग लाइफ’ चित्रपटाचा टीझर आऊट, अभिनेत्याचा समोर आला जबदस्त लुक!
जुनेराचा अर्थ काय आहे?
‘जुनेरा इडा फजल’ हे उर्दू नाव आहे. ‘जुनेरा’ म्हणजे ‘स्वर्गाचे फूल’. या जोडप्याने अतिशय विचारपूर्वक आपल्या मुलीचे नाव ठेवले आहे आणि आता तिच्या नावाप्रमाणेच जुनेराही तिच्या पालकांच्या आयुष्यात सुगंध भरत आहे. तसेच या जोडप्याने अद्याप त्यांच्या मुलीचा चेहरा उघड केलेला नाही. अशा परिस्थितीत आता चाहत्यांना एवढीच इच्छा आहे की गुड्डू पंडित आणि भोली पंजाबनच्या मुलीचा चेहराही समोर यावा. परंतु चाहत्यांना हे नाव ऐकून चांगलाच आनंद झाला आहे.