(फोटो सौजन्य - सोशल मीडिया)
फिल्म इंडस्ट्रीमध्ये अशा अनेक अभिनेत्री आहेत, ज्या आपल्या अभिनयाने आणि सौंदर्याने क्षणार्धात कोणालाही वेड लावू शकतात. याच निमित्ताने आम्ही तुमच्याशी दक्षिण चित्रपटसृष्टीतील एका दिग्गज अभिनेत्रीबद्दल सांगणार आहोत जिचा आज वाढदिवस आहे. तिच्या आगामी चित्रपटाचे लेटेस्ट पोस्टर देखील आज नुकताच रिलीज झाला आहे. ज्यामध्ये अभिनेत्रीचा खतरनाक लुक दिसत आहे. या अभिनेत्रीने सुपरस्टार प्रभाससोबत 1000 कोटींची कमाई करणारा सुपरहिट कॅजीत्रपट दिला आहे. जाणून घेऊयात या अभिनेत्रीचे नाव काय आहे.
धक्कादायक लूकमध्ये दिसणारी अभिनेत्री कोण?
या अभिनेत्रीचे नाव केवळ चित्रपटांमध्येच नाही तर तिच्या वैयक्तिक आयुष्यातही प्रभाससोबत जोडले गेले आहे. आता सस्पेन्स दूर करून ही अभिनेत्री दुसरी तिसरी कोणी नसून अनुष्का शेट्टी आहे. होय, अनुष्का शेट्टीचा 43 वा वाढदिवस आज म्हणजेच 7 नोव्हेंबर रोजी साजरा होत आहे आणि या खास प्रसंगी तिचा आगामी चित्रपट ‘घाटी’ UV Creations च्या निर्मात्यांनी अधिकृत X हँडलवर फर्स्ट लुक पोस्टर शेअर केला आहे.
VICTIM. CRIMINAL. LEGEND.
The Queen will now rule the #GHAATI ❤🔥
Wishing ‘The Queen’ #AnushkaShetty a very Happy Birthday ✨#GhaatiGlimpse Video today at 4.05 PM ✨
In Telugu, Tamil, Hindi, Kannada and Malayalam.#HappyBirthdayAnushkaShetty@DirKrish @UV_Creations… pic.twitter.com/jgZEBPU5gx
— UV Creations (@UV_Creations) November 7, 2024
हे देखील वाचा- कमल हासन यांच्या वाढदिवसानिमित्त ‘ठग लाइफ’ चित्रपटाचा टीझर आऊट, अभिनेत्याचा समोर आला जबदस्त लुक!
या पोस्टरमध्ये अनुष्का खूप खतरनाक आणि भयानक लुक दिसत आहे. जो पाहून चाहते खूप चकित झाले आहे. निर्मात्यांनी ही पोस्ट शेअर करताना ट्विटच्या कॅप्शनमध्ये लिहिले आहे की, ‘विकट क्रिमिनल आणि लीजेंड’. याशिवाय अभिनेत्रीला वाढदिवसाच्या शुभेच्छाही देण्यात आल्या आहेत. अनुष्का शेट्टीने दिग्दर्शक एसएस राजामौली यांच्या कल्ट मूव्ही फ्रँचायझीमध्ये सुपरस्टार प्रभाससोबत स्क्रीन शेअर केली आहे. अभिनेत्रीच्या बाहुबली 2 ने जगभरात 1000 कोटींहून अधिकचा व्यवसाय केला होता. आणि आता अभिनेत्री पुन्हा एकदा मोठ्या पडद्यावर झळकण्यासाठी सज्ज झाली आहे.
हे देखील वाचा- अजय देवगण आणि अनीस बज्मी यांचा बहुप्रतिक्षित ॲक्शन थ्रिलर चित्रपट “नाम” चा ट्रेलर रिलीज!
घाटीचा टीझर समोर येणार आहे
अनुष्का शेट्टीच्या घाटीच्या पोस्टरसोबतच त्याच्या टीझरची माहितीही निर्मात्यांनी दिली आहे. ज्यावर आधारित चित्रपटाचा पहिला प्रोमो व्हिडिओ आज संध्याकाळी 4:05 वाजता प्रदर्शित होणार आहे. यानंतर अनुष्काच्या ‘घाटी’ चित्रपटाबद्दल चाहत्यांची उत्सुकता वाढली आणि ते या चित्रपटाच्या प्रदर्शनाची आतुरतेने वाट पाहू लागले आहे. अभिनेत्रीचे सगळेच चित्रपट सुपरहिट ठरले आहेत. तसेच हा चित्रपट देखील यशस्वी होईल अशी खात्री आहे.
फक्त बाहुबलीच नाही तर अनुष्का शेट्टीने तिच्या शानदार अभिनय कारकिर्दीत अनेक हिट चित्रपट दिले आहेत ज्यात अरुंदती, बिल्ला, लिंगा, मिर्ची आणि सिंघम सारख्या अनेक चित्रपटांच्या नावाचा समावेश आहे. येत्या काळात अनुष्काचा ॲक्शन अवतारही ‘घाटी’ चित्रपटामध्ये पाहायला मिळणार आहे. या चित्रपटाची कथा, स्टारकास्ट आणि अभिनेत्रीचा अभिनय पाहण्यासाठी चाहते उत्सुक झाले आहेत.