“मेरा जी नही भारा...” म्हणत Salman Khan ने दिला इशारा; व्हायरल व्हिडीओने चाहत्यांची वाढली उत्सुकता

सलमान खानने त्याच्या इन्स्टाग्राम सोशल मीडिया अकाउंटवर एक व्हिडिओ शेअर केला आहे, ज्यामध्ये तो 'मेरा जी नही भारा' हे गाणे गाताना दिसत आहे, ज्यामुळे चाहते चकीत झालेले दिसत आहेत.
(फोटो सौजन्य - इन्स्टाग्राम)
(फोटो सौजन्य - इन्स्टाग्राम)
Published on: 
Updated on: 
  • सलमान खानने दिला इशारा
  • सलमान खानचा नवीन व्हिडिओ पोस्ट
  • सलमान खानचा आगामी चित्रपट

बॉलीवूड अभिनेता सलमान खान त्याच्या वैयक्तिक आणि व्यावसायिक आयुष्यामुळे नेहमीच चर्चेत असतो. आजकाल भाईजान सोशल मीडियावर खूप सक्रिय आहे आणि दररोज आपल्या लूक्सने सर्वांना आश्चर्यचकित करताना दिसत आहेत. सलमान खान लवकरच 'मातृभूमी' या चित्रपटात दिसणार आहे, जो लवकरच प्रदर्शित होणार आहे. दरम्यान, सलमान खानने त्याच्या इन्स्टाग्राम अकाउंटवर चाहत्यांसोबत एक गूढ पोस्ट शेअर केली आहे. या व्हिडिओमध्ये सलमान खान एक गाणे गाताना दिसत आहे, पण त्याचा अर्थ कोणालाही समजू शकलेला नाही. हा व्हिडिओ आता चर्चेत आलेला दिसत आहे.

सलमान खानचा नवीन व्हिडिओ पोस्ट

बॉलीवूडचा भाईजान सलमान खानने 'मेरा जी नही भरा' हे गाणे गातानाचा एक व्हिडिओ इन्स्टाग्रामवर शेअर केला आहे. हा एक ब्लॅक अँड व्हाईट व्हिडिओ आहे, पण सलमान खानच्या लूकने सर्वांचे लक्ष वेधून घेतले. सलमानने टोपी आणि सनग्लासेस घातले आहेत. हा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. 'मेरा जी नही भरा' हे गाणे गाऊन सलमान खान नेमका कोणता संकेत देत आहे, याबद्दल लोक संभ्रमात पडले होते. ही गूढ पोस्ट पाहून चाहत्यांनी विविध तर्कवितर्क लावायला सुरुवात केली. काहींनी या व्हिडिओला राजपाल यादवच्या वादाशी जोडण्याचा प्रयत्न केला, तर काहींनी सलमानच्या आगामी चित्रपटाशी जोडण्याचा प्रयत्न केला. सलमानचा व्हिडिओ पाहणाऱ्या चाहत्यांनी त्याच्या स्वॅगचे कौतुक केले.

सलमान खानचा आगामी चित्रपट

सलमान खानचा 'मातृभूमी' हा चित्रपट लवकरच प्रदर्शित होणार आहे, परंतु त्याच्या प्रदर्शनाच्या तारखेची अधिकृत घोषणा अद्याप झालेली नाही. एका सूत्राने झूम टीव्हीला सांगितले की, सलमान खानने चित्रीकरणाच्या पहिल्याच दिवशी निर्मात्यांना स्पष्ट केले होते की 'मातृभूमी' हा केवळ एक युद्धपट नसेल. 'मातृभूमी'मधून प्रेक्षकांनी सैनिकांच्या जीवनाबद्दल जाणून घ्यावे, अशी सलमान खानची इच्छा होती. विशेष म्हणजे, या चित्रपटात सलमान खानसोबत चित्रांगदा सिंग देखील दिसणार आहे.