(फोटो सौजय -इन्स्टाग्राम)
एखाद्या व्यक्तीने अनोळखी व्यक्तीसाठी स्वतःची संपूर्ण संपत्ती सोडणे हे क्वचितच घडताना दिसत असते. परंतु, बॉलीवूडचे ज्येष्ठ अभिनेते संजय दत्त यांच्यासोबत खरंच घडले आहे आणि हे जाणून ते देखील चकीत झाले होते. अलीकडेच त्यांनी त्यांच्या आयुष्यातील या क्षणाबद्दल सांगितले. एका महिलेने त्यांच्यासाठी ७२ कोटी रुपयांची मालमत्ता सोडली. या मालमत्तेचे त्यांनी काय केले हे अभिनेत्याने आता सांगितले आहे. तसेच याबद्दल सांगताना अभिनेता भावुक झाला. संजय दत्त नक्की काय म्हणाले जाणून घेऊयात.
‘पतीने काम करावे आणि पत्नीने मुलांना सांभाळावे…’ सुनील शेट्टी हे काय म्हणाला… ऐकून नेटकरी हैराण !
संजय दत्तने दान केलेल्या मालमत्तेचे काय केले?
कर्ली टेल्सशी झालेल्या संभाषणात, संजय दत्तला विचारण्यात आले की २०१८ मध्ये तुमच्या महिला चाहत्याने त्यांच्या मृत्यूपूर्वी तुमच्या नावावर मालमत्ता केली होती हे खरे आहे का? संजय दत्तने हे खरे असल्याचे सांगितले. या प्रकरणावर उत्तर देताना संजय दत्त म्हणाले की, ‘मी ती तिच्या कुटुंबाला परत केली.’ असे म्हणून अभिनेत्याने चाहत्यांचे मन जिंकले आहे.
मालमत्ता देण्याचे काय कारण होते?
खरं तर, २०१८ मध्ये संजय दत्तची चाहती निशा पाटील ही प्रसिद्धीच्या झोतात आली जेव्हा तिने तिची संपूर्ण मालमत्ता, सुमारे ७२ कोटी रुपये किमतीची, संजय दत्तला हस्तांतरित केली. या निर्णयामुळे संजय दत्तला धक्का बसला. मुंबईतील ६२ वर्षीय निशा एका असाध्य आजाराने ग्रस्त असल्याचे समजले होते. तिने तिच्या बँकेला सांगितले होते की तिच्या मृत्यूनंतर तिची सर्व मालमत्ता संजय दत्तला हस्तांतरित करावी. तसेच, संजय दत्तने ही मालमत्ता महिलेच्या कुटुंबाला हस्तांतरित केली.
शहनाज गिलच्या आगामी चित्रपटामध्ये दिसणार हनी सिंगची झलक? अभिनेत्रीच्या पोस्टने उडवली खळबळ
संजय दत्तचे आगामी चित्रपट
संजय दत्तने १९८१ मध्ये ‘रॉकी’ चित्रपटाद्वारे बॉलीवूडमध्ये पदार्पण केले होते. अलीकडेच अभिनेत्याचा ‘द भूतनी’ आणि ‘हाऊसफुल ५’ चित्रपट प्रदर्शित झाला, जो प्रेक्षकांना खूप आवडला. सध्या संजय दत्त अनेक प्रकल्पांशी संबंधित प्रोजेक्ट प्रेक्षकांसाठी घेऊन येत आहे. त्याचे ‘अखंड २’, ‘धुरंधर’ आणि ‘द राजा साब’ हे चित्रपट या वर्षाच्या अखेरीस प्रदर्शित होणार आहेत. तसेच अभिनेता २०२६ मध्ये प्रदर्शित होणाऱ्या ‘केडी-द डेव्हिल’ या कन्नड चित्रपटात देखील खास भूमिकेत दिसणार आहे.