
‘शाका लाका बूम बूम’ या लोकप्रिय टीव्ही शोमध्ये संजू या नावाने ओळखला जाणारा अभिनेता किंशुक वैद्य याने दीक्षा नागपालसोबत त्याच्या एंगेजमेंटची घोषणा केली आहे. अभिनेत्याने इंस्टाग्रामवर या जोडप्याचा एक जिव्हाळ्याचा फोटो शेअर केला, विशेष क्षण कॅप्चर केला असून, हे फोटो पाहून चाहत्यांना आनंद झाला आहे.
फोटोमध्ये, त्यांच्या हातांवर लक्ष केंद्रित केले आहे, या फोटोमध्ये दिसत असलेल्या एंगेजमेंट रिंग दर्शवित आहेत आणि या रिंगने चात्यांचे लक्ष वेधून घेतले आहे, जोडप्यांनी घातलेली या अंगठ्या एकमेकांशी असलेल्या त्यांच्या वचनबद्धतेचे प्रतीक आहे. या दोघांनीही निळ्या रंगाचा पोशाख परिधान केला आहे. दोघेही या पोशाखात खूप सुंदर आणि आकर्षित दिसत आहेत.
‘शाका लाका बूम बूम’ अभिनेता किंशुक वैद्य आणि दिक्षा नागपाल या दोघांनाही साखपुडा केला असून, यांची शेअर केलेली पोस्ट पाहून चाहत्यांची तसेच अनेक टीव्ही कलाकारांनी या दोघांना शुभेच्छा दिल्या आहेत.
हे देखील वाचा- नागार्जुनच्या हैदराबादमधील एन-कन्व्हेन्शन सेंटरवर बुलडोझर चालवला, अभिनेत्यावर केली कारवाई!
‘शका लाका बूम बूम’ ही भारतीय मुलांची कल्पनारम्य साहसी टेलिव्हिजन मालिका आहे. याचे लेखन आणि दिग्दर्शन विजय कृष्ण आचार्य यांनी केले होते. यात संजू (किंशुक वैद्य) नावाचा एक तरुण आणि दयाळू मुलगा दाखवण्यात आला आहे. या मालिकेची संपूर्ण कथा ही जादुई पेन्सिलवर आधारित आहे. ही मालिका मोठ्या माणसांपासून ते लहान मुलांपर्येंत पप्रत्येकाची आवडती होती . या मालिकेला चाहत्यांचा खूप प्रतिसाद मिळाला होता आणि ही त्यावेळेची प्रसिद्ध टीव्ही मालिका होती.