(फोटो सौजय -इन्स्टाग्राम)
अलिकडेच अभिनेत्री शहनाज गिलने तिच्या सोशल मीडियावर प्रसिद्ध रॅपर हनी सिंगसोबतचे काही फोटो शेअर केले आहेत. हे फोटो पाहून चाहते चकीत झाले आहेत. तसेच असे म्हटले जात आहे की रॅपर अभिनेत्रीच्या आगामी ‘एक कुडी’ चित्रपटासाठी एक गाणं गाणार आहे. आता हे गाणं काय आहे आणि या दोघांची केमिस्ट्री या गाण्यात पाहायला मिळेल का हे पाहण्यासाठी चाहते उत्सुक आहेत.
गायिका-अभिनेत्री शहनाज गिल तिच्या आगामी ‘एक कुडी’ या चित्रपटामुळे खूप चर्चेत आहे. हा चित्रपट काही महिन्यांत प्रदर्शित होणार आहे. अलिकडेच, अभिनेत्रीने इन्स्टाग्रामवर काही फोटो शेअर केले आहेत, जे सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहेत. यामध्ये अभिनेत्री प्रसिद्ध रॅपर हनी सिंगसोबत दिसत आहे. काही मीडिया रिपोर्ट्समध्ये असे म्हटले जात आहे की हनी सिंग अभिनेत्रीच्या आगामी चित्रपटासाठी एक ब्लॉकबस्टर गाणे घेऊन येणार आहे. हे पाहण्यासाठी चाहते आता उत्सुक आहेत.
आयपीएस अधिकाऱ्यांची टीम पोहचली आमिर खानच्या घरी? अभिनेत्याने स्वतःच सांगितले कारण, म्हणाला…
हनी सिंग ‘एक कुडी’ साठी गाणे घेऊन येत आहे
हे फोटो शेअर करताना शहनाज गिलने हनी सिंगला टॅग केले आणि कॅप्शन लिहिले की ‘हे हास्य देसी आहे’. ही पोस्ट व्हायरल होताच काही मीडिया रिपोर्ट्समध्ये असे म्हटले जात आहे की हनी सिंग अभिनेत्रीच्या आगामी ‘एक कुडी’ चित्रपटासाठी एक उत्तम गाणे घेऊन येणार आहे. हे गाणं काय असेल कसे असेल हे अद्यापही समोर आलेले नाही आहे.
‘पतीने काम करावे आणि पत्नीने मुलांना सांभाळावे…’ सुनील शेट्टी हे काय म्हणाला… ऐकून नेटकरी हैराण !
‘एक कुडी’ चित्रपटाबद्दल जाणून घ्या
शहनाज गिलचा हा पंजाबी चित्रपट १९ सप्टेंबर २०२५ रोजी प्रदर्शित होणार आहे. यापूर्वी हा चित्रपट १३ जून रोजी प्रदर्शित होणार होता. या चित्रपटाचे दिग्दर्शन अमरजीत सिंग करत आहेत आणि त्यांनीच त्याची कथाही लिहिली आहे. अभिनेत्रीसोबतच तिचे चाहतेही या चित्रपटाची आतुरतेने वाट पाहत आहेत. तसेच या चित्रपटामधील हनी सिंगचे गाणे जाणून घेण्यासाठी चाहते आतुर आहेत.