(फोटो सौजन्य - अकाउंट)
अक्षय कुमार, वीर पहारिया, सारा अली खान आणि निमरत कौर स्टारर ‘स्काय फोर्स’ या चित्रपटाने पहिल्याच दिवशी बॉक्स ऑफिसवर दमदार कमाई केली आहे. प्रजासत्ताक दिनाच्या आठवड्याच्या शेवटी शुक्रवारी हा चित्रपट सिनेमागृहात प्रदर्शित झाला. चित्रपटाच्या पहिल्या दिवसाच्या कलेक्शनने थिएटरमध्ये उत्साहाचे वातावरण निर्माण केले होते, जिथे त्याची पहिल्या दिवशीची निव्वळ कमाई १० कोटी रुपयांपेक्षा जास्त झाली आहे. हा चित्रपट चाहत्यांना किती पसंत पडला आहे आणि लोकांनी त्याला काय प्रतिसाद दिला आहे. हे आपण जाणून घेऊयात.
Akshay Kumar मालामाल, दुप्पट किंमतीत विकला मुंबईतला फ्लॅट; किंमत ऐकून व्हाल थक्क…
पहिल्या दिवशी चित्रपटाने १० कोटींची कमाई केली
सॅकॅनिल्कच्या अहवालानुसार, चित्रपटाने पहिल्या दिवशी चांगली कमाई केली आहे आणि १० कोटींचा टप्पा ओलांडला आहे. हा अॅक्शन आणि ड्रामाने भरलेला चित्रपट १९६५ च्या भारत आणि पाकिस्तान युद्धादरम्यान सरगोधा एअरबेसवरील हल्ल्यावर आधारित आहे. हा चित्रपट दिनेश विजय आणि अमर कौशिक यांनी तयार केला आहे, तर तो मॅडॉक फिल्म्स आणि जिओ स्टुडिओजच्या बॅनरखाली बनवला गेला आहे. चित्रपटाच्या पहिल्या दिवसाच्या ऑक्युपन्सीबद्दल बोलायचे झाले तर, २ डी आवृत्तीमध्ये सकाळच्या शोमध्ये १०.२६%, दुपारच्या शोमध्ये १४.१२% आणि संध्याकाळच्या शोमध्ये २२.७६% आसन क्षमता होती, तर आयमॅक्स २ डी आवृत्तीमध्ये एकूण १४.८२% आसन क्षमता होती. चित्रपटाने जोरदार सुरुवात केली आहे.
वीर पहारियाने जिंकले चाहत्यांचे मन
या चित्रपटात वीर पहारियाचा पहिलाच चित्रपटात आहे आणि त्याने त्याच्या भूमिकेने चाहत्यांचे मन जिंकले आहे. अभिनेता या भूमिकेबद्दल म्हणाला, ‘ही एक अतिशय वैयक्तिक आणि मानवी कथा आहे. हा चित्रपट कुटुंब, बंधुता, मैत्री आणि निष्ठा याबद्दल आहे. मी सर्वांना विनंती करतो की त्यांनी हा चित्रपट पहावा जेणेकरून त्यांना काहीतरी नवीन शिकता येईल. हे एक गंभीर पात्र आहे, जे अज्जमादा बोपय्या देवय्या यांच्यावर आधारित आहे.’ असे अभिनेत्याने म्हटले आहे. प्रेक्षकांना त्याचे पात्र खूपच आवडले आहे.
Toxic: यश आणि गीतू मोहनदासच्या ‘टॉक्सिक’चा भाग बनली नयनतारा, अक्षय ओबेरॉयने केला खुलासा!
अक्षय कुमारने चित्रपटाबद्दल काय म्हटले?
एचटी सिटीशी बोलताना अक्षय कुमारने देशभक्तीवर चित्रपटांबद्दलचे आपले विचार मांडले. अभिनेता म्हणाला, ‘मी स्वतःला भाग्यवान समजतो की मला अनेक वेगवेगळ्या भूमिका साकारण्याची संधी मिळते. देवाचे आभार, मला श्रीकृष्ण आणि शिवजींची भूमिका साकारण्याची संधी मिळाली आहे आणि मला वाटते की जर मला इतक्या सुंदर संधी मिळत असतील तर मी त्या का सोडू?’ असे अभिनेत्यानेही या चित्रपटामध्ये चांगले काम केले आहे. तसेच या चित्रपटामध्ये त्याच्या पत्राने लक्षवेधी भूमिका साकारली आहे.