(फोटो सौजन्य- इन्स्टाग्राम)
शशांक खेतान दिग्दर्शित आणि धर्मा प्रॉडक्शन्स व मेंटॉर डिसायपल एंटरटेनमेंट निर्मित सनी संस्कारी की तुलसी कुमारी हा चित्रपट २ ऑँक्टोबर रोजी दसऱ्याच्या दिवशी प्रदर्शित झाला. वरुण धवन आणि जान्हवी कपूर यांच्या प्रमुख भूमिका असलेल्या या रोमँटिक कॉमेडी चित्रपटाने ओपनिंग दिवशी ९.२५कोटींची कमाई केली होती.
जगभरात हा आकडा १५ ते २० कोटी रुपये इतका असल्याचे सांगितले जात असले तरी चित्रपट अजूनही ८० कोटींच्या बजेटपासून खूप दूर आहे. चित्रपटाच्या कलेक्शनमध्ये आठवड्याच्या शेवटी वाढ होण्याची अपेक्षा आहे. ‘सनी संस्कारी की तुलसी कुमारी’ हा २०२५ चा दुसरा सर्वाधिक ओपनिंग करणारा रोमँटिक चित्रपट ठरला आहे. त्याने ‘परम सुंदरी’, ‘भूल चुक माफ’ यांसारख्या चित्रपटांना मागे टाकले आहे.
चित्रपटात वरुण आणि जान्हवी त्यांच्या एक्स पार्टनर्स – सान्या (सान्या मल्होत्रा) आणि रोहित (रोहित सराफ) यांना जळवण्यासाठी एकत्र येतात. ही सगळी गोष्ट विनोद, प्रेम आणि थोड्याशा नाट्यावर आधारित आहे.
पहिल्या दिवशी दमदार सुरुवात झाल्यानंतर दुसऱ्या दिवशी चित्रपटाच्या कमाई घट झाल्याचे पाहायला मिळाले.
मात्र तिसऱ्या दिवशी (शनिवारी) पुन्हा चित्रपटाने ७.२५ कोटी कमावले. एकूण ३दिवसांत चित्रपटाची भारतातील कमाई २२ कोटींवर पोहोचली आहे.ट्रेड ट्रॅकिंग साइट Sacnilk नुसार, सनी संस्कारी की तुलसी कुमारी ने शनिवारी भारतात ७.२५ कोटी कमाई केली, ज्यामुळे चित्रपटाची एकूण घरगुती कमाई २२ कोटींवर पोहोचली आहे.
कांतारा ते सैयारा, भारतात Netflixवर ट्रेंड करत असलेल्या ४ जबरदस्त चित्रपटांची यादी
वरुण धवन आणि जान्हवी कपूर हे ‘सनी संस्कारी की तुलसी कुमारी’पूर्वी अॅमेझॉन प्राइमवरील ‘बवाल’ चित्रपटात दिसले होते. त्या चित्रपटाला संमिश्र प्रतिसाद मिळाला. ‘सनी संस्कारी की तुलसी कुमारी’बद्दल बोलायचे झाले तर, चित्रपटाची गाणी सोशल मीडियावर ट्रेंड करीत आहेत, प्रेक्षकांना ‘बिजुरिया’ हे गाणे खूप आवडले आहे.
‘सनी संस्कारी की तुलसी कुमारी’ या चित्रपटात वरुण धवन, जान्हवी कपूर, सान्या मल्होत्रा, रोहित सराफ, मनीष पॉल व अक्षय ओबेरॉय हे कलाकार महत्त्वाच्या भूमिकेत आहेत.