(फोटो सौजय -इन्स्टाग्राम)
प्रभाससोबत संजय दत्तही ‘द राजा साब’ या आगामी चित्रपटात महत्त्वाची भूमिका साकारताना दिसणार आहे. मंगळवार, २९ जुलै रोजी संजय दत्त त्याचा ६५ वा वाढदिवस साजरा करत आहे. या निमित्ताने चित्रपटाच्या निर्मात्यांनी त्याचा पहिला लूक पोस्टर रिलीज केला आहे. हा एक हॉरर कॉमेडी चित्रपट आहे जो मारुती दिग्दर्शित आहे. हा चित्रपट पाहण्यासाठी चाहते उत्सुक आहेत. तसेच चित्रपटाचे नवीन पोस्टर रिलीज झाल्यांनतर त्याला भरभरून प्रतिसाद देत आहे.
चित्रपटात संजय दत्तची भूमिका कोणती ?
‘द राजा साब’ हा चित्रपट बहुप्रतिक्षित चित्रपट आहे. त्यात प्रभास, संजय दत्त, मालविका मोहनन आणि रिद्धी कुमार सारखे कलाकार दिसणार आहेत. चित्रपटात संजय दत्त प्रभासच्या आजोबांच्या भूमिकेत दिसणार आहे. अभिनेता संजय दत्तच्या वाढदिवसानिमित्त, चित्रपटातील त्याच्या भूमिकेची पहिली झलक समोर आली आहे. चाहत्यांना अभिनेत्याच्या या धक्कादायक लूकने चकीत केले आहे.
Team #TheRajaSaab wishes the Powerhouse and versatile Sanju Baba – @DuttSanjay a very Happy Birthday 💥💥
Get ready to witness a terrifying presence that will shake you to the core this Dec 5th in cinemas 🔥🔥#TheRajaSaabOnDec5th#Prabhas @DirectorMaruthi @AgerwalNidhhi… pic.twitter.com/PFgPzOnqea
— The RajaSaab (@rajasaabmovie) July 29, 2025
कधी होणार चित्रपट प्रदर्शित
नवीन पोस्टरमध्ये संजय दत्त एका वृद्ध लूकमध्ये दिसत आहे. त्याचे केस वाढलेले आहेत. हा हॉरर कॉमेडी चित्रपट ५ डिसेंबर २०२५ रोजी संपूर्ण भारतात प्रदर्शित होणार आहे. हा चित्रपट अनेक भाषांमध्ये प्रदर्शित होणार आहे. यात प्रभास श्रीनु, बोमन इराणी, व्हीटीव्ही गणेश, सप्तगिरी, समुथिरकणी सारखे कलाकार देखील आहेत. तसेच या चित्रपटाची कथा प्रेक्षकांचं नक्कीच भरभरून मनोरंजन करणार आहे.
फराह खान Cloud 9 वर, बिग बींकडून खास भेट, व्हिडिओ शेअर करत म्हणाली, ‘मी मस्करीत म्हटले पण….’
संजय दत्तचे आगामी चित्रपट
पीपल मीडिया फॅक्टरीद्वारे मोठ्या प्रमाणात तयार केलेल्या या चित्रपटाचे संगीत थमन यांनी दिले आहे. संजय दत्तच्या कामाबद्दल बोलायचे झाले तर, ‘द राजा साब’ व्यतिरिक्त, त्याच्याकडे इतर अनेक मनोरंजक चित्रपट आहेत. यामध्ये ‘अखंड २’, ‘धुरंधर’, ‘बागी ४’ आणि बोयापती श्रीनु दिग्दर्शित ‘बाप’ यांसारख्या समावेश आहे. टायगर श्रॉफ अभिनीत ‘बागी ४’ चित्रपटात तो पुन्हा एकदा खलनायकाच्या भूमिकेत दिसणार आहे. त्याचबरोबर, तो रणवीर सिंग अभिनीत आणि आदित्य धर दिग्दर्शित ‘धुरंधर’ मध्येही नकारात्मक भूमिका साकारणार आहे.