1971 च्या भारत-पाकिस्तान युद्धावर आधारित बॉर्डर हा चित्रपट 1997 मधील दुसरा सर्वाधिक कमाई करणारा चित्रपट होता. जेपी दत्ता दिग्दर्शित या चित्रपटात सनी देओल, सुनील शेट्टी, जॅकी श्रॉफ आणि अक्षय खन्ना यांसारख्या कलाकारांच्या महत्त्वपूर्ण भूमिका होत्या. तब्बल 2वर्षाच्9 वर्षांनंतर बॉर्डरचा सीक्वल आता प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. काही काळापूर्वी निर्मात्यांनी बॉर्डर 2 ची घोषणा केली होती. या चित्रपटात सनी देओलची भूमिका निश्चित झाली असली तरी इतर नवीन चेहरे या चित्रपटामध्ये दिसणार आहेत. सनी देओलसोबत ड्रीम गर्ल अभिनेता आयुष्मान खुराना एका महत्त्वाच्या भूमिकेत दिसणार असल्याची बातमी होती, पण आता तो या चित्रपटातून बाहेर पडला आहे. आता त्याची जागा बॉलीवूड स्टार वरुण धवनने घेतली आहे.
बॉर्डर २ मध्ये वरुण धवन एका सैनिकाच्या भूमिकेत दिसणार आहे
आयुष्मान खुरानाने या चित्रपटाला नकार दिल्यापासून वरुण धवनला बॉर्डर २ मध्ये साईन केल्याची चर्चा होती. आता भेडिया स्टार वरुण धवनने शुक्रवारी एका घोषणा व्हिडिओसह बॉर्डर 2 मधील त्याच्या प्रवेशाची पुष्टी केली आहे. त्याने सोशल मीडियावर एक घोषणा व्हिडिओ शेअर केला आहे आणि चित्रपटाशी जोडल्याचा आनंद व्यक्त केला आहे.
चौथीच्या वर्गात बॉर्डर पाहिली
बॉर्डर 2 च्या घोषणेचा व्हिडिओ शेअर करताना वरुण धवनने लिहिले की, “मी चौथीच्या वर्गात होतो, जेव्हा मी चंदन सिनेमात गेलो होतो आणि बॉर्डर पाहिला आणि त्याचा माझ्यावर खूप प्रभाव पडला. मला अजूनही आठवते की हॉलमध्ये आम्ही सर्वांनी राष्ट्रीय गौरव कसा केला. मी आमच्या सशस्त्र दलांना आदर्श मानायला सुरुवात केली आणि आजही ते आमचे संरक्षण कसे करतात आणि आमच्या सीमेवर किंवा नैसर्गिक आपत्तीच्या वेळी आम्हाला सुरक्षित ठेवतात यासाठी मी त्यांना सलाम करतो.” असे अभिनेत्याने लिहिले.
तसेच वरुणने पुढे लिहिले की, “जेपी सर आणि भूषण कुमार यांनी बनवलेल्या बॉर्डर 2 मध्ये भूमिका साकारणे हा माझ्या आवडत्या चित्रपटांपैकी एक आहे पाजी (सनी देओल),ज्यामुळे ते आणखी खास बनले. एका शूर सैनिकाची कथा पडद्यावर आणण्यासाठी मी उत्सुक आहे, ज्यामध्ये भारतातील सर्वात मोठा युद्ध चित्रपट असल्याचे वचन दिले आहे.” असे त्याने सांगितले.
हे देखील वाचा- सोनू सूदची हरियाणाहून मुंबईला चालत आलेल्या पॅरा-ॲथलीटशी हृदयस्पर्शी भेट!
आता ‘बॉर्डर’ या चित्रपटाच्या तब्बल २९ वर्षांच्या यशानंतर ‘बॉर्डर 2’ हा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहे. या चित्रपटाची नवी कथा नवे कलाकार पाहण्यासाठी चाहते आतुर झाले आहेत. तसेच हा चित्रपट लवकरच सिनेमागृहात दाखल होईल.