(फोटो सौजन्य- इन्स्टाग्राम)
अष्टपैलू अभिनेत्री आणि प्रतिभेचे पॉवरहाऊस, विद्या बालन ‘भूल भुलैया 3’ मध्ये ओजी मंजुलिका म्हणून पुनरागमन करत आहे. हॉरर-कॉमेडी फ्रँचायझीमधला या चित्रपटाचा तिसरा भाग लवकरच दिवाळीत सिनेमागृहात प्रदर्शित होणार आहे. या चित्रपटात अभिनेत्री विद्या बालन 17 वर्षांनंतर फ्रँचायझीमध्ये परतली आहे. आणि अभिनेत्रीने नुकताच रिलीज झालेल्या चित्रपटाच्या ट्रेलरमधून चाहत्यांची मने जिंकली आहेत. या चित्रपटाच्या ट्रेलर लाँच कार्यक्रमादरम्यान, विद्या बालनने फ्रँचायझीमध्ये पुनरागमन करण्याबाबत व्यक्त होताना दिसली.
चित्रपटाबाबत अभिनेत्री म्हणाली की, “मी 17 वर्षांनंतर फ्रँचायझीमध्ये परतले आहे याचा मला आनंद आहे, आणि गेल्या काही वर्षांत चित्रपटाने मला खूप प्रेम दिले आहे. 17 पुनरागमन करूनही मला प्रेक्षकांचे आणखी प्रेम मिळत आहे याची जाणीव झाली.” असे अभिनेत्रीने सांगितले. विद्या भूल भुलैया चित्रपटामध्ये मंजुलिका पात्रात दिसली होती आणि आता अभिनेत्री पुन्हा ‘भूल भुलैया 3’ मध्ये हे पात्र साकारणार आहे. चाहते अभिनेत्रीला पुन्हा मंजुलिकाच्या भूमिकेत पाहण्यासाठी आतुर झाले आहेत.
OG मंजुलिका म्हणून विद्या बालनची जागा कोणीच घेऊ शकत नाही. आणि ‘भूल भुलैया 3’ मधील तिच्या उपस्थितीने चित्रपटात भय आणि थराराचे घटक जोडले गेले आहेत. अभिनेत्रीने साकारलेली प्रत्येक व्यक्तिरेखा प्रेक्षकांना आवडली आहे. पण मंजुलिकाच्या भूमिकेने तिच्या अभिनयाने त्यांच्या हृदयात विशेष स्थान निर्माण केले आहे. तसेच या चित्रपटामध्ये विद्या बालनसह बॉलीवूड सुंदरी माधुरी दीक्षित देखील झळकणार आहे. माधुरी आणि विद्यामधील एक रोमांचक सामना या चित्रपटातून प्रेक्षकांना पाहायला मिळणार आहे.
हे देखील वाचा- स्त्री २ ची नशा आता ओटीटीवर! या ऑनलाईन प्लॅटफॉर्मवर झाली प्रदर्शित
हा चित्रपट दिवाळीत सिनेमागृहात रिलीज होण्याच्या तयारीत आहे आणि त्यात कार्तिक आर्यन आणि तृप्ती दिमरी मुख्य भूमिकेत दिसणार आहेत. अनीस बज्मी दिग्दर्शित या चित्रपटाची निर्मिती टी-सीरीजने केली आहे. तसेच, ‘भूल भुलैया 3’ मध्ये प्रेक्षकांना हॉरर, कॉमेडी, ड्रामा, रोमान्स आणि मजेदार संवादांनी परिपूर्ण मेजवानी मिळणार आहे.