(फोटो सौजन्य - सोशल मीडिया)
अभिनेता सैफ अली खानवर त्याच्याच घरात एका अज्ञात व्यक्तीने हल्ला केला आहे. सैफ त्याच्या वांद्रे येथील घरी होता. हल्ल्याची बातमी येताच चाहत्यांना त्यावेळी करीना कपूर कुठे होती हे जाणून घेण्याची उत्सुकता निर्माण झाली. करीनाने इंस्टाग्राम स्टोरी पोस्ट केली आहे. ज्यामध्ये या प्रकारणेदरम्यान अभिनेत्री कुठे होती हे स्पष्ट झाले आहे. या बातमीने सोशल मीडियावर खळबळ उडाली आहे.
करीना कपूर पार्टी करत होती.
अभिनेता सैफ अली खानवर हल्ला झाला तेव्हा त्याची पत्नी अभिनेत्री करीना कपूर खान तिच्या बहिणी करिश्मा कपूर, रिया कपूर आणि सोनम कपूरसोबत पार्टी करत होती. त्याचे फोटो करिश्मा कपूरने तिच्या इंस्टाग्राम अकाउंटवर शेअर केले आहेत. ज्यात लिहिले आहे – ‘शुभ रात्री.’ या इंस्टाग्राम स्टोरीवर चाहत्यांचे लक्ष वेधले गेले आहे. अभिनेत्री सैफ अली खानसह का नव्हती असे प्रश्न चाहत्यांना पडले आहेत.
Breaking: सैफ अली खानवर जीवघेणा हल्ला; अज्ञाताने चाकूने केला वार, जखमी सैफ लीलावतीत दाखल
इंस्टाग्राम स्टोरीवर दिलेले अपडेट
तिने रात्री उशिरा इंस्टाग्रामवर एक स्टोरी पोस्ट केली, ती सोनम कपूर, रिया कपूरसोबत पार्टी करत होती. या चित्रात, एक जेवणाचे टेबल सजवलेले आहे, ज्यामध्ये अनेक प्रकारचे पदार्थ आणि पेये ठेवली आहेत. हे कॅन्डललाइट डिनरसारखे दिसले आहेत. आता करीना कपूरचा हा फोटो पाहून अनेक चाहते आश्चर्यचकित झाले आहेत. आणि त्यांच्या मनात अनेक प्रश्न निर्माण झाले आहेत.
सैफ अली खानवर हल्ला झाला
बॉलिवूड अभिनेता सैफ अली खानवर त्याच्या घरात घुसलेल्या चोरांनी चाकूने हल्ला केला आहे. त्यांना मुंबईतील रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे, जिथे त्यांच्यावर उपचार सुरू आहेत. वांद्रे डीसीपी म्हणाले, हे खरे आहे, एक अज्ञात व्यक्ती पहाटे २.३० वाजता सैफ अली खानच्या घरात घुसला. यादरम्यान एका चोराने सैफ अली खानवर चाकूने हल्ला केला. यानंतर, त्यांना मुंबईतील लीलावती रुग्णालयात दाखल करण्यात आले, असे डीसीपीने सांगितले. तथापि, या दुखापती इतक्या गंभीर नाहीत. हाणामारीत त्याला चाकूने वार करण्यात आले की जखमी झाली आहे हे अद्याप स्पष्ट झालेले नाही. या बातमीने अभिनेत्याचे चाहते चांगलेच चकित झाले आहेत.