(फोटो सौजय -इन्स्टाग्राम)
नितेश तिवारी यांचा ‘रामायण’ चित्रपट गेल्या काही काळापासून चर्चेत आहे. अलिकडेच रणबीर कपूर आणि इतर कलाकारांनी पहिल्या भागाचे चित्रीकरण पूर्ण केले आहे. रामायणचा फर्स्ट लूक व्हिडिओ देखील निर्मात्यांनी रिलीज केला आहे. चित्रपटात वेगवेगळ्या भूमिका साकारणाऱ्या बहुतेक कलाकारांचे चेहरे समोर आले आहेत. आता बातमी अशी आहे की, रणबीर कपूरचा धाकटा भाऊ भरतसाठी मराठी अभिनेता आदिनाथ कोठारेला कास्ट करण्यात आले आहे. अभिनेत्याने स्वतः एका मुलाखतीत याची पुष्टी केली आहे. चला तर मग जाणून घेऊ आदिनाथ काय म्हणाला…
रामायणातील ‘भरत’ च्या भूमिकेत दिसणार आदिनाथ कोठारे
१३ मे १९८४ रोजी मुंबईत जन्मलेले आदिनाथ कोठारे हा मराठी चित्रपटसृष्टीतील एक प्रसिद्ध अभिनेता आहेत, ज्याने रणवीर सिंगच्या ‘८३’ या क्रीडा-नाटक चित्रपटातून बॉलीवूडमध्ये पदार्पण केले. आदिनाथ ज्येष्ठ अभिनेते आणि चित्रपट निर्माते महेश कोठारे यांचा मुलगा आहे. वडिलांच्या पावलावर पाऊल ठेवून त्याने केवळ अभिनयातच नशीब आजमावले नाही तर दिग्दर्शनातही प्रभुत्व मिळवले आहे. तसेच अभिनेत्याची ही खास भूमिका पाहण्यासाठी चाहते उत्सुक आहेत.
ऑनलाइन बेटिंग प्रकरणात राणा दग्गुबतीच्या वाढल्या अडचणी, ED समोर अभिनेता राहिला नाही हजर
आदिनाथ कोठारेचे चित्रपट
आदिनाथने बालकलाकार म्हणून ‘माझा छकुला’ चित्रपटातून पदार्पण केले. यानंतर तो ‘पानी’, ‘पछाडलेला’, ‘चंद्रमुखी’, ‘इश्क वाला लव्ह’ आणि ‘चिमणी पाखर’ या चित्रपटांमध्ये काम केले. याशिवाय त्याने ‘परस्पेक्टिव’ आणि ‘झपाटलेला 2’ सारखे चित्रपटही दिग्दर्शित केले आहेत. तसेच अभिनेत्याचा नुकताच ‘पाणी’ चित्रपट चर्चेत होता. ज्याला भरपूर अवॉर्ड्स मिळाले आहेत.
रामायणात भरतची भूमिका साकारणार
बॉलीवूड हंगामाला दिलेल्या मुलाखतीत आदिनाथ कोठारेने नितेश तिवारी यांच्या रामायणात भरतची भूमिका साकारत असल्याची पुष्टी केली. शूटिंगचा अनुभव सांगताना अभिनेत्याने सांगितले की, रामायण सारख्या चित्रपटांमध्ये काम करणे त्याच्यासाठी खूप मोठे आणि अनोखे काम आहे. या चित्रपटातून त्याला खूप काही शिकायला मिळाले आहे. आदिनाथने असेही सांगितले की नितेश तिवारी यांच्या रामायणात त्यांची एन्ट्री मुकेश छाब्रा यांच्यामुळे झाली आहे.
सहाव्या दिवशीही Saiyaara चा बॉक्स ऑफिसवर धमाका, १५० कोटींचा आकडा केला पार
रामायणातील संपूर्ण स्टारकास्ट
नितेश तिवारी यांच्या रामायणातील जवळजवळ सर्व मुख्य पात्रांसाठी स्टार्सनी एन्ट्री केली आहे. रणबीर कपूर (श्री राम), साई पल्लवी (माता सीता) आणि यश (रावण) व्यतिरिक्त, सनी देओल हनुमानाची भूमिका साकारत आहे. रवी दुबे लक्ष्मणची भूमिका साकारणार आहेत, अरुण गोविल राजा दशरथ, लारा दत्ता कैकेयी, काजल अग्रवाल मंदोदरी, इंदिरा कृष्णन कौशल्या, शीबा चड्ढा मंथरा, कुणाल कपूर इंद्र देव आणि रकुल प्रीत सिंह शूर्पणखा यांची भूमिका साकारणार आहेत.