(फोटो सौजन्य - सोशल मीडिया)
रणबीर कपूर आणि दीपिका पदुकोणचा ‘ये जवानी है दिवानी’ हा चित्रपट पुन्हा एकदा 2024 मध्ये थिएटरमध्ये प्रदर्शित होणार आहे. अयान मुखर्जी दिग्दर्शित हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर पुन्हा एकदा धुमाकूळ घालत आहे. वरुण धवनच्या नुकत्याच प्रदर्शित झालेल्या बेबी जॉनपेक्षा हा चित्रपट दररोज अधिक व्यवसाय करत असताना दिसत आहे. तसेच हा चित्रपट पाहण्यासाठी चाहते अजूनही सिनेमागृहात गर्दी करत आहेत. तसेच या चित्रपटाने चाहत्यांची मने आधीच जिंकली आहेत.
स्क्रीन्सची संख्या वाढली
हा चित्रपट पाहण्यासाठी प्रेक्षक मोठ्या संख्येने येत आहेत, त्यामुळे चित्रपटाच्या स्क्रीन काउंटमध्येही वाढ करण्यात आली आहे. या चित्रपटाने पहिल्या वीकेंडला 6 कोटी 85 लाखांचा व्यवसाय केला आहे. त्याचवेळी, आता चित्रपटाच्या सोमवारचे आकडेही समोर आले आहेत. हा चित्रपट सिनेमागृहात धुमाकूळ घालताना दिसत आहेत. चाहते या चित्रपटाला भरभरून प्रतिसाद देताना दिसत आहेत.
हुबेहूब इंदिरा गांधी… कंगना रणौतने माजी पंतप्रधानांच्या भूमिकेसाठी ‘अशी’ घेतली मेहनत; Video Viral
चित्रपटाची आतापर्यंतची कमाई
सोमवारी या चित्रपटाने 1 कोटी 25 लाखांचा व्यवसाय केला आहे. अशाप्रकारे, चित्रपटाची एकूण कमाई (2014 आणि पुन्हा रिलीजसह) आता 197 कोटींवर पोहोचली आहे. हा चित्रपट २०० कोटींच्या क्लबमध्ये सामील होण्यासाठी फक्त तीन कोटींनी कमी आहे. हा चित्रपट सोनू सूदच्या ‘फतेह’ला टक्कर देणार का हे पाहणे उत्सुकतेचे ठरणार आहे. आगामी काळात ‘ये जवानी है दिवानी’ 200 कोटींच्या क्लबमध्ये सहज सामील होईल अशी अपेक्षा आहे. हा चित्रपटांच्या कलाकारांवर आणि त्यांच्या पात्रांवर अजूनही चाहते प्रेम करत आहेत.
हे कलाकार दिसणार आहेत.
करण जोहरच्या धर्मा प्रॉडक्शन अंतर्गत निर्मित ‘ये जवानी है दिवानी’ या चित्रपटामध्ये रणबीर कपूर आणि दीपिका पदुकोण व्यतिरिक्त आदित्य रॉय कपूर, कल्की केकलन आणि कुणाल रॉय कपूर हे देखील महत्त्वाच्या भूमिकेत दिसले होते. चित्रपटाचे संगीत प्रीतमने दिले आहे. या चित्रपटातील सर्वच गाणी प्रेक्षकांच्या पसंतीस उतरली आहे. आणि अजूनही ही गाणी चाहत्यांच्या मनावर राज्य करत आहेत.
Irrfan Khan: काय आहे इरफान खानचे अधुरे स्वप्न? पत्नी सुतापाने केले शेअर, जुन्या आठवणीत झाली भावुक!
रणबीरचे आगामी चित्रपट
वर्कफ्रंटबद्दल बोलायचे झाले तर रणबीर सध्या त्याच्या ‘रामायण’ या चित्रपटामुळे चर्चेत आहे. नितेश तिवारी या चित्रपटाचे दिग्दर्शन करत आहेत. याशिवाय त्याचा ‘ॲनिमल पार्क’ नावाचा चित्रपटही आहे. दोन्ही चित्रपट बॉक्स ऑफिसवर धमाकेदार कमाई करू शकतील अशी अपेक्षा आहे. अभिनेत्याचे हे दोन्ही चित्रपट पाहण्यासाठी चाहत्यांची उत्सुकता आता पासूनच वाढली आहे.