(फोटो सौजन्य- इन्स्टाग्राम)
भारतातील सर्वात मोठा स्वदेशी व्हिडिओ स्ट्रीमिंग मंच आणि बहुभाषिक कथाकार ZEE5 ने पहिल्या हंगामाच्या यशानंतर रोमांचक दुसऱ्या सीझनसाठी मानसशास्त्र विषयावरील नाट्य ‘मिथ्या’ परतणार असल्याची घोषणा केली. ही मालिका महत्त्वाकांक्षा, विश्वासघात आणि सूड भावनेने पछाडलेल्या दोन सावत्र बहिणींमधील अशांत नात्याभोवती फिरते.
कपिल शर्मा दिग्दर्शित आणि रोझ ऑडिओ व्हिज्युअल प्रॉडक्शनच्या सहकार्याने अप्लॉज एंटरटेनमेंटद्वारे निर्मित, मिथ्याच्या दुसऱ्या सीझनमध्ये रजित कपूर आणि इंद्रनील सेनगुप्ता यांच्या प्रमुख भूमिकांसह सावत्र बहिणी साकारणाऱ्या हुमा कुरेशी आणि अवंतिका दासानी झळकणार आहेत. या नव्याकोऱ्या सीझनमध्ये नवीन कस्तुरिया दिसणार असून, तो या दोन बहिणींच्या जीवनाला अधिक मसालेदार करणारी एक रहस्यमय व्यक्तिरेखा साकारणार आहे.
दुसरा हंगाम सर्व महत्त्वपूर्ण पात्रांच्या गुंतागुंतीच्या आणि अकार्यक्षम आंतरवैयक्तिक संबंधांचा सखोल अभ्यास करतो. तणाव वाढत असताना आणि पूर्वीपेक्षा जास्त धोका असल्याने, ‘मिथ्या सीझन 2’ चा प्रीमियम लवकरच ZEE5वर होणार आहे.
ZEE5 चे चीफ बिझनेस ऑफिसर मनीष कालरा या सिरीजबाबत म्हणाले, “प्रेक्षकांकडून पहिल्या यशस्वी सीझनला भरभरून मिळालेले प्रेम पाहिल्यानंतर, अधिक रोमांचक कथेसह ‘मिथ्या’ पुन्हा सादर करण्यासाठी आम्ही उत्साही आहोत. आपल्या प्रभावी कामगिरीमुळे, कलाकारांनी गुंतागुंतीच्या आणि अनेक रहस्य असलेल्या कथानकाला जिवंत केले आहे. ज्यामुळे ही मालिका सर्जनशील कथाकथनावर आमचे लक्ष केंद्रित असल्याचे बोलके उदाहरण ठरते. ‘मिथ्या सीझन 2’ हा देखील ‘अप्लॉज एंटरटेनमेंट’ आणि ‘रोझ ऑडिओ व्हिज्युअल’ सोबतच्या आमच्या दीर्घकालीन आणि सर्जनशील भागीदारीचा भाग आहे. आम्ही अपवादात्मक कथा सादर करण्याच्या आमच्या वचनबद्धतेला बळकटी देताना मी ‘मिथ्या सीझन 2’ ला प्रेक्षकांचा प्रतिसाद मिळेल अशी प्रतिक्षा करतो.” असे ते म्हणाले.
रोझ ऑडिओ व्हिज्युअल’चे निर्माते गोल्डी बहल म्हणाले, “मिथ्या’चा सीझन 2 पुन्हा सादर करण्यासाठी आम्ही रोमांचित आहोत. ही मालिका नेहमीच सत्य, फसवणूक आणि मानवी मनाच्या धूसर कप्प्यांचा शोध घेणारी आहे आणि या नवीन सीझनसह, आम्ही आणखी खोलवर जात आहोत. पहिल्या सीझनला मिळालेला प्रतिसाद अविश्वसनीय होता. यामुळे आम्हाला यावेळी मोठी सर्जनशील जोखीम घेण्यास भाग पाडले आहे. आम्ही एक अशी कथा तयार केली आहे, जी अधिक गडद, अधिक तीव्र आणि आश्चर्यांनी भरलेली आहे. पुढे काय घडते हे प्रेक्षक कधी एकदा अनुभवतात असे झाले आहे.” असे ते या सीझनच्या दुसऱ्या भागाबद्दल म्हणाले.
हे देखील वाचा- गोविंदाला हॉस्पिटलमधून मिळाला डिस्चार्ज, अभिनेता व्हीलचेअरवर बसलेला दिसला!
दिग्दर्शक कपिल शर्मा म्हणाले, “आम्ही आमच्या प्रेक्षकांना नवीन सीझनकडे वळवण्यासाठी पूर्णपणे उत्साही आहोत. हा सीझन केवळ कथानकांमुळेच समृद्ध नसून नेत्रदीपक देखील आहे. चित्तथरारक दार्जिलिंगवर आधारित,कथानकाची तीव्रता उंचावणारी दृश्ये आणि थरारासह प्रतिभावान कलाकारांच्या काही अद्भुत कामगिरी टिपल्या आहेत. ‘मिथ्या’ च्या पुनरागमनाची चर्चा प्रचंड आहे. आमच्या प्रेक्षकांच्या अपेक्षा एक पायरी वर नेण्याचे आमचे उद्दिष्ट आहे.” असे ते म्हणाले. आता ‘मिथ्या’ सिझन 2 लवकरच प्रेक्षकांच्या भेटीस येणार असून, या सीझनमध्ये नक्की काय घडणार हे पाहण्यासाठी चाहते आतुर आहेत.