
Cannes 2023 : ‘द कश्मीर फाइल्स’चे (The Kashmir Files) दिग्दर्शक विवेक अग्निहोत्री (Vivek Agnihotri) आपल्या वक्तव्यामुळे अनेकदा वादात सापडले आहेत. यावेळी त्यांनी कान्स फिल्म फेस्टिव्हलमधील (Cannes Festival) अभिनेत्री ऐश्वर्या राय बच्चनच्या ड्रेसबाबत ट्विट केले आणि त्यानंतर ट्विटरवर ऐश्वर्याच्या चाहत्यांनी विवेक अग्निहोत्रींच्या ट्विटवर सडेतोड उत्तर दिलं.
विवेक अग्निहोत्रीने आपल्या ट्विटमध्ये ऐश्वर्याच्या रेड कार्पेट वरील फोटो शेअर केला होता. या फोटोमध्ये ऐश्वर्या सिल्व्हर गाऊनमध्ये रेड कार्पेटवर पोज देताना दिसत आहे. त्यावेळी तिचा असिस्टंट तिच्या गाऊनचा मोठा हुड सांभाळताना दिसत आहे. हा फोटो शेअर करत विवेक अग्निहोत्रीने लिहिले की, ‘costume Slave’ असा शब्द तुम्ही ऐकला आहे का? ज्यात बहुतांश मुली असतात. आधी भारतात हे नव्हते मात्र, आता हे भारतातही दिसायला लागले आहे. फॅशनसाठी आपण इतके मूर्ख आणि लाचार का आहोत?” असा सवालही त्यांनी ट्विटरमध्ये केला आहे.
Have you guys heard of a term called ‘Costume Slaves’. They are mostly girls (a suited man in this case). You can see them now in India too with almost every female celeb. Why are we becoming so stupid and oppressive just for such uncomfortable fashion? pic.twitter.com/bWYavPYjvS — Vivek Ranjan Agnihotri (@vivekagnihotri) May 19, 2023
ऐश्वर्याच्या चाहत्यांनी विवेक अग्निहोत्रीला केले लक्ष्य
विवेक अग्निहोत्री यांच्या ट्विटनंतर त्यांच्या पोस्टवर कमेंट्सचा वर्षाव केला आहे. जिथे काही लोक फिल्ममेकरला सपोर्ट करताना दिसले. त्याचवेळी काहींनी त्याला चांगलेच फैलावर घेतले. एका यूजरने कमेंट करताना विचारले म्हटलं आहे, ‘तुम्हाला का हेवा वाटत आहे?’ दुसऱ्याने लिहिले, “मला वाटते की ब्रँड त्यांना कार्पेटवर दिसण्यासाठी पैसे देतात. शेवटी, हा शो-बिझचा एक भाग आहे..”
ट्रोल झाल्याबद्दल विवेक अग्निहोत्रीने स्पष्टीकरण दिले
दुसरीकडे, विवेक अग्निहोत्रीने आपल्या ट्विटवर वाद वाढत असल्याचे पाहून स्पष्टीकरण दिले आहे. त्यांनी आणखी एक ट्विट करून लिहिले की, ‘माझ्या कमेंटचा एआरबीशी काहीही संबंध नाही.. हे फक्त costume Slave या संकल्पनेबद्दल आहे.
My comment has nothing to do with ARB. It’s only about the weird concept of ‘costume slavery’. And ARB is not responsible for it. She is just a model/fashion ambassador. — Vivek Ranjan Agnihotri (@vivekagnihotri) May 19, 2023
ऐश्वर्या राय कान्स 2023
लेबलच्या अधिकृत इंस्टाग्राम पेजनुसार, हा costume त्यांच्या कान्स कॅप्सूल कलेक्शनचा एक भाग आहे. गेल्या अनेक वर्षांपासून कान्स फिल्म फेस्टिव्हलमध्ये सहभागी होणारी ऐश्वर्या या आठवड्याच्या सुरुवातीला मुलगी आराध्या बच्चनसोबत फ्रेंच रिव्हिएरा येथे पोहोचली.