Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • वर्ल्ड
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • टेक
      • ऑटो
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Ganesh Chaturthi 2025 |
  • Bihar Election 2025 |
  • Asia cup 2025 |
  • Today's Gold Rate |
  • bigg boss 19
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

डेझी शहाची मराठी पडद्यावर धमाकेदार एन्ट्री, ‘दगडी चाळ २’ मधील ‘या’ गाण्यावर थिरकरणार

" क्षितिज पटवर्धन यांनी गाण्याचे बोल इतके उत्स्फूर्त लिहिले की, त्याला संगीतही त्याच ताकदीचे लागणार होते. मुग्धानेही या गाण्याला उत्तम न्याय दिला आहे आणि मात्र त्यात अधिक रंगत आणली आहे ती डेझीच्या बहारदार नृत्याने. अंसं संगीतकार अमितराज या गाण्याबद्दल म्हणाले.

  • By Pravina Shirpurkar
Updated On: Aug 07, 2022 | 02:24 PM
डेझी शहाची मराठी पडद्यावर धमाकेदार एन्ट्री, ‘दगडी चाळ २’ मधील ‘या’ गाण्यावर थिरकरणार
Follow Us
Close
Follow Us:

‘दगडी चाळ २’ (Dagadi Chawl 2)  हा चित्रपट येणार असल्याचे समजल्यापासूनच यातील प्रमुख व्यक्तिरेखा कोण साकारणार, याची सर्वच प्रेक्षकांना उत्सुकता लागली होती आणि नुकतेच यातील प्रमुख चेहरे आपल्या समोर आले. आता या चित्रपटातील पहिले आणि जबरदस्त गाणे संगीतप्रेमींच्या भेटीला आले आहे.

‘ राघू पिंजऱ्यात आला ‘ असे या गाण्याचे बोल असून ” डेझी शाह ” या बॅालिवूडमधील नामांकित चेहऱ्याने या गाण्याच्या निमित्ताने मराठी सिनेसृष्टीत पदार्पण केले आहे. अमितराज यांनी संगीतबद्ध केलेल्या या गाण्याला मुग्धा कऱ्हाडे हीचा आवाज लाभला आहे. तर अवघ्या बॉलीवूडला आपल्या तालावर नाचवणाऱ्या आदिल शेख यांनी या गाण्याचे नृत्य दिग्दर्शन केले आहे. गाण्याचे भन्नाट बोल, डेझीचा सीझलिंग परफॉर्मन्स आणि घायाळ करणाऱ्या तिच्या अदा या सगळ्यामुळे हे गाणे ग्लॅमरस बनले आहे. मंगलमूर्ती फिल्म्स आणि संगीता अहिर निर्मित, चंद्रकांत कणसे दिग्दर्शित ‘दगडी चाळ २’ येत्या १८ ऑगस्ट रोजी चित्रपटगृहात प्रदर्शित होणार आहे.

[read_also content=”सिनेरंग : ‘सिंहासन’ची सिक्वेल मालिका होईल इतक्या घटना… https://www.navarashtra.com/blogs/there-will-be-a-sequel-series-of-marathi-movie-sinhasan-nrvb-312882.html”]

या गाण्याबद्दल निर्मात्या संगीता अहिर म्हणतात, ” जेव्हा या गाण्याचा आम्ही या चित्रपटात समावेश करण्याचे ठरवले, तेव्हा सर्वात आधी माझ्यासमोर डेझी शाहचा चेहरा आला. याबाबत आम्ही तिला विचारणा केली आणि तिनेही त्वरित होकार दिला. हिंदी चित्रपटातील अभिनेत्रीने मराठी पडद्यावर काम करायला इतक्या लगेच होकार देणे, ही आमच्यासाठी आनंदाची गोष्ट आहे. गाण्याची टीमच इतकी अफलातून आहे की, हे गाणे, डेझीचे नृत्य प्रेक्षकांना नक्कीच आवडेल. प्रत्येकाला थिरकायला लावणारे हे गाणे आहे.”

[read_also content=”‘यासाठी’ मागितले शिक्षकाला पैसे; झेडपी सीईओने दिले बदलीचे आदेश https://www.navarashtra.com/maharashtra/the-teacher-asked-for-money-for-this-zp-ceo-gave-transfer-orders-nrdm-313026.html”]

संगीतकार अमितराज या गाण्याबद्दल म्हणतात, ” क्षितिज पटवर्धन यांनी गाण्याचे बोल इतके उत्स्फूर्त लिहिले की, त्याला संगीतही त्याच ताकदीचे लागणार होते. मुग्धानेही या गाण्याला उत्तम न्याय दिला आहे आणि मात्र त्यात अधिक रंगत आणली आहे ती डेझीच्या बहारदार नृत्याने. हे गाणे ऐकताना कोणाचेच पाय जमिनीवर स्थिर राहू शकत नाहीत. सगळ्यांना ठेका धरायला लावणारे हे गाणे आहे.”या चित्रपटात मकरंद देशपांडे, अंकुश चौधरी आणि पूजा सावंत यांच्या प्रमुख भूमिका आहेत.

Web Title: Daisy shahs big entry on the marathi screen she will rock the song from dagdi chaal 2 nrps

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Aug 07, 2022 | 02:24 PM

Topics:  

  • dagadi chawl 2

संबंधित बातम्या

‘डॅडी’ आता तुरुंगाबाहेर! शिवसेना नेत्याच्या हत्या प्रकरणात अरुण गवळीला जामीन मंजूर; सर्वोच्च न्यायालयाचा निर्णय
1

‘डॅडी’ आता तुरुंगाबाहेर! शिवसेना नेत्याच्या हत्या प्रकरणात अरुण गवळीला जामीन मंजूर; सर्वोच्च न्यायालयाचा निर्णय

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.