हरियाणाची प्रसिद्ध डान्सर आणि गायिका सपना चौधरीच्या अडचणी सध्या वाढत आहेत. सपना चौधरी लखनऊला पोहोचली आहे. कोर्टाने डान्सिंग क्वीनविरोधात अटकेसाठी अजामीनपात्र वॉरंट जारी केले आहे. खरं तर लखनऊ कोर्टाने नुकतेच सपनाविरुद्ध अजामीनपात्र वॉरंट जारी केले होते आणि या वॉरंटपासून अटकेची भीती सतावत आहे. लखनऊ पोलीस सपना चौधरीचा शोध घेत असल्याचे बोलले जात आहे. सपना चौधरी स्वतः कोर्टात हजर न राहिल्यास पोलिस तिला अटक करतील.
वास्तविक, लखनऊमधील आशियाना पोलिस ठाण्यात सपना चौधरी आणि इतरांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला होता. त्याचवेळी तिच्याविरुद्ध फसवणुकीच्या गुन्ह्यात एफआयआर दाखल करण्यात आली होती. पैसे घेऊनही डान्स शोमध्ये न पोहोचल्याने तिच्याविरोधात एफआयआर नोंदवण्यात आली होती. त्यानंतर ती अद्याप न्यायालयात हजर झालेली नाही.
ही बाब 13 ऑक्टोबर 2018 ची आहे. त्यावेळी आशियाना येथील एका खासगी क्लबमध्ये सपना चौधरीचा शो आयोजित करण्यात आला होता आणि त्या शोची तिकिटे ऑनलाइन आणि ऑफलाइन विकली गेली होती. मात्र, त्या कार्यक्रमात सपना दुपारी तीन वाजता येणार होती आणि त्यानंतर हा कार्यक्रम रात्री दहा वाजेपर्यंत चालणार होता. सपना चौधरीच्या शोचे आयोजन जुनैद अहमद, नवीन शर्मा, अमित पांडे, रत्नाकर उपाध्याय आणि पहल इन्स्टिट्यूटचे इवाद अली यांनी केले होते.
सपना शोमध्ये पोहोचली नाही आणि त्यानंतर प्रेक्षक संतप्त झाले आणि त्यांनी गोंधळ घातला. तसेच तिकिटाचे पैसे परत करण्याची मागणी केली. एवढेच नाही तर यावेळी उपस्थितांनी आयोजकांवर फसवणुकीचा आरोप करत जोरदार तोडफोडही केली. मात्र, घटनास्थळी पोहोचलेल्या पोलीस-प्रशासनाच्या अधिकाऱ्यांनी लोकांना शांत केले.