Deepika Padukone : L&T अध्यक्षांच्या रविवारी काम करण्याच्या सल्ल्यावर दीपिका पादुकोणची संतप्त प्रतिक्रिया, म्हणाली “महत्वाच्या पदावरील लोकं जर...”
सध्या लार्सन आणि टर्बो कंपनीचे (Larcen And Turbo Company) चेअरमन एस. एन. सुब्रम्हण्यम (Chairman SN Subrahmanyan) त्यांच्या विधानामुळे चर्चेत आले आहेत. त्यांनी ऑफिसमधील वर्क कल्चर आणि कर्मचाऱ्यांच्या रविवारच्या सुट्टीवरून केलेल्या विधानावरुन चर्चेत आले आहेत. ‘कर्मचाऱ्यांनी आठवड्यातील ९० तास काम करावे. शिवाय रविवारीही कामावर यावे’, असं त्यांनी विधान केलं आहे. त्यांनी केलेल्या ह्या विधानाची सध्या सोशल मीडियावर जोरदार चर्चा होत आहे. सर्वच स्तरातून एल अँड टी कंपनीच्या चेअरमन यांच्यावर टीकेचा भडीमार केला जात आहे. आता अशातच बॉलिवूड इंडस्ट्रीतूनही त्यांच्या विधानामुळे त्यांच्यावर टीका केली जात आहे.
एल अँड टी कंपनीचे चेअरमन एस. एन. सुब्रमण्यम यांनी ऑफिसमधील वर्क कल्चर आणि कर्मचाऱ्यांच्या रविवारच्या सुट्टीवरून केलेल्या विधानावरुन बॉलिवूड अभिनेत्री दीपिका पादुकोणने त्यांना चांगलेच खडेबोल सुनावलेय. पत्रकार फैज डिसोझाने शेअर केलेल्या इन्स्टाग्राम पोस्टचा हवाला घेत अभिनेत्रीने इन्स्टा स्टोरी शेअर केली आहे की, “कंपनीच्या महत्वाच्या पदावर बसलेल्या लोकांच्या तोंडून असं विधान ऐकणं धक्कादायक आहे. मानसिक आरोग्य सुद्धा महत्वाचे आहे ना…” एल अँड टी कंपनीच्या चेअरमनचं विधान सोशल मीडियावर वाऱ्यासारखं व्हायरल झाल्यानंतर कंपनीकडून अधिकृत प्रतिक्रियाही देण्यात आली आहे. त्यावरही अभिनेत्रीने आपलं मत मांडलं आहे. “त्यांनी आता हे प्रकरण आणखी बिघडवलंय” अशी कमेंट अभिनेत्रीने केली.
Yuzvendra Chahal: घटस्फोटाच्या बातम्यांदरम्यान चहलचा या आरजेसोबतचा फोटो व्हायरल, चाहते झाले चकित!
लार्सन अँड टर्बो कंपनीचे चेअरमन काय म्हणाले ?
लार्सन आणि टर्बो कंपनीचे चेअरमन एस. एन. सुब्रम्हण्यम यांनी एका चर्चासत्रामध्ये हजेरी लावली होती. यावेळी कर्मचाऱ्यांसोबत संवाद साधताना सुब्रम्हण्यम यांना अब्जावधी डॉलर्सची उलाढाल असलेल्या लार्सन अँड टर्बो कंपनीतल्या कर्मचाऱ्यांना शनिवारीही का कामावर यावं लागतं ? असा प्रश्न विचारण्यात आला होता. या प्रश्नावर त्यांनी उत्तर दिलं की, “चीन अशाच पद्धतीने काम करून अमेरिकेला मागे टाकत आहे. चीनी लोकं आठवड्यातून ९० तास काम करतात, तर अमेरिकन लोकं आठवड्यात फक्त ५० तास काम करतात.” पुढे भाष्य करताना ते म्हणाले की, “रविवारी मी माझ्या कर्मचाऱ्यांना ऑफिसला बोलवत नाही किंवा त्यांना काम करायला लावत नाही याचा मला पश्चाताप आहे. कारण मी स्वत: रविवारी घरातबसून काम करतो. कर्मचारी घरी बसून काय करता ? तुम्ही तुमच्या बायकोकडे किती वेळ बघणार आहेत ? किंवा तुमची बायको तुमच्याकडे किती वेळ पाहत बसणार आहे ? त्यापेक्षा ऑफिसला या आणि कामाला लागा…”