sri devi prasad and yo yo honey singh
देवी श्री प्रसाद (Devi sri Prasad) उर्फ रॉकस्टार डीएसपीच्या (Rockstar DSP) पुढच्या सांगितीक नजराण्याची सगळेच जण वाट बघत आहेत. ‘पुष्पा द राईज’ (Pushpa The Rise) चित्रपटातील श्रीवल्ली, ऊंअंतावा आणि सामी सामीसारख्या गाण्यांचे संगीतकार देवी श्री प्रसाद पुन्हा सुंदर गाण्यांच्या कामासाठी सज्ज झाले आहेत. पुष्पाच्या गाण्यांनी सगळ्यांनाचं वेड लावलं. आता आणखी कोणती नवीन गाणी ते रसिकांसाठी घेऊन येतात याची उत्सुकता आहे.
[read_also content=”‘पुणे टू गोवा’ चित्रपटाचा गोव्यामध्ये मुहूर्त, उलगडणार कलाकाराचा प्रवास https://www.navarashtra.com/movies/pune-to-goa-movie-muhurt-in-goa-nrsr-299822.html”]
मिळालेल्या माहितीनुसार, ‘रॉकस्टार डीएसपी (Rockstar DSP) आणि यो यो हनी सिंग (Yo Yo Honey Singh) सलमान खानच्या (Salman Khan) आगामी चित्रपटासाठी एकत्र काम करणार आहेत. ‘भाईजान’ (Bhaijaan) असं या चित्रपटाचं नाव आहे. आधी या चित्रपटाचं नाव ‘कभी ईद कभी दिवाली’ असं होतं. मात्र ते नंतर बदलून ‘भाईजान’ असं ठेवण्यात आलं. निर्मात्यांनी रॉकस्टार डीएसपी आणि यो यो हनी सिंगने बनवलेल्या म्युझिक ट्रॅकसाठी पसंती दर्शवली आहे. येत्या काही दिवसातच नवे गाणे आपल्या भेटीला येईल.
‘भाईजान’ या चित्रपटामध्ये सलमान खानसोबत पुजा हेगजे, राघव जुयाल, शहनाज गिल, पलक तिवारी इत्यादी कलाकारही झळकणार आहेत.Collaborate