बिग बॉस १७ च्या घरात गाजलेला प्रसिद्ध स्टँडअप कॉमेडियन मुनव्वर फारुकी(Munnavar Faruqui ) हा सोशल मीडियावर कोणत्या ना कोणत्या कारणामुळे चर्चेत असतो. काही दिवसांपूर्वी मुनव्वरची तब्येत बिघडल्याने त्याला रुग्णालयात दाखल करण्यात आले होते.पण मुनव्वरची प्रकृती आता व्यवस्थित असल्याचे सांगण्यात आले आहे. मुनव्वरचे खाजगी आयुष्य पुन्हा एकदा चर्चेत आले आहे. अशातच मुनव्वर फारुकीबद्दल एक मोठी बातमी समोर आली आहे. मिळालेल्या माहितीनुसार मुनव्वर फारुकीने दुसऱ्यांदा विवाह केला आहे.
मुनव्वर फारूक हा सोशल मीडियावर नेहमीच सक्रिय असतो. इंस्टाग्राम त्याचा मोठा फॅन फॉलोवर आहे. अशातच मुनव्वर बद्दल एक धक्कादायक माहिती समोर आली आहे. मुनव्वर फारुकी दुसऱ्यांदा विवाह बंधनात अडकला आहे. त्याचे काही फोटो सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहेत. काही दिवसांपूर्वी मुनव्वरची तब्येत बरी नसल्याने त्याला रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. पण त्यानंतर मुनव्वरचे विवाह सोहळ्यातील काही फोटो सोशल मीडियावर आल्यानंतर चाहत्यांना मोठा धक्का बसला आहे. लग्न सोहळ्यासाठी त्याच्या जवळचे नातेवाईक आणि मित्रांना आमंत्रित देण्यात आल्याचे बोलले जात आहे.
[read_also content=”अनंत-राधिकाच्या दुसऱ्या प्री-वेडिंगची जय्यत तयारी, इटलीमध्ये रंगणार 4 दिवसाचा मेगा सोहळा https://www.navarashtra.com/photos/anant-and-radhikas-second-pre-wedding-538986.html”]
१२ दिवसांपूर्वी मुनव्वरने विवाह केल्याचे सांगण्यात आले आहे. दुसऱ्यांदा विवाह सोहळा केल्याने त्याने महाजबीन कोतवाला हिच्यासोबत लग्न केले आहे. ती एक मेकअप आर्टिस्ट असल्याचे बोलले जात आहे. मुनव्वरने विवाह केल्याचे गुपित ठेवल्याने चाहत्यांना फोटो पाहून धक्का बसला आहे. मुन्नावर यांचे लग्न मुंबईतील आयटीसी मराठा येथे झाले. बिग बॉस 17’ जिंकल्यानंतर मुनव्वर फारुकीचे सोशल मीडियावर मोठ्या संख्येने फॅन फॉलोवर वाढले. तसेच त्याला सगळीकडे प्रसिद्धी मिळाली.