प्रसिद्ध अभिनेत्रीचा राहत्या घरी मृत्यू, दुर्गंधीमुळे शेजाऱ्यांना कळाला मृतदेह; काय आहे गूढ ?
प्रसिद्ध पाकिस्तानी अभिनेत्री आयेशा खान यांचं निधन झालं आहे. कराची येथील राहत्या घरी ७७ वर्षीय आयेशा खान यांचा मृतदेह आढळून आला आहे. ७ दिवसांपूर्वीच म्हणजेच (१८ जून बुधवार) त्यांचा मृत्यू झाल्याची धक्कादायक बाब समोर आली. अभिनेत्रीच्या निधनाचे वृत्त पोलिसांनीच दिले आहे. त्यांनी अनेक गाजलेल्या पाकिस्तानी मालिकांमध्ये काम केलं होतं.
बॉक्स ऑफिसवर धुमाकूळ घालणारा ‘अल्याड पल्याड’ पुन्हा रिलीज होणार
न्यूज १८ ने दिलेल्या वृत्तानुसार, पोलिस अधिकाऱ्यांनी सांगितले की, मृत्यूच्या एका आठवड्यानंतर आयेशा यांचा मृतदेह कुजण्यास सुरुवात झाली होती. घरातून दुर्गंधी येत असल्याने तिच्या शेजाऱ्यांनी पोलिसांना माहिती दिली. पोलिसांनी नेमका कसला दुर्गंध येतोय, हे तपासले असता आयेशा खान मृतावस्थेत तिथे आढळल्या. अभिनेत्रीला मृतावस्थेत पाहून सर्वांच्याच पायाखालची जमिनच सरकली. आयेशा खान यांचं निधन ७ दिवसांपूर्वीच म्हणजेच (१८ जून बुधवार) झाल्याचं स्पष्ट झालं आहे. ७ दिवस त्यांचा मृतदेह फ्लॅटमध्येच कुजत होता. अभिनेत्रीच्या निधनाचे गुढ अद्याप गुलदसत्यात असून पोलिस नातेवाईक आणि शेजरच्यांकडून सविस्तर माहिती गोळा करत आहे.
“सुंदरा” गाण्याचा टीझर रिलीज, गौतमीची ठसकेबाज लावणी आणि निकची खतरनाक हुकस्टेपचा होणार मिलाप
आयशा खान अनेक वर्षांपासून कराचीतील ‘गुलशन ए इकबाल’ अपार्टमेंटमध्ये एकट्या राहत होत्या. त्यांना वयोमानानुसार अनेक आजारांच्याही समस्या होत्या. अभिनेत्रीचे पार्थिव सध्या जिन्ना पोस्ट ग्रॅज्युएट मेडिकल सेंटरमध्ये पोस्टमॉर्टमसाठी पाठवण्यात आले आहे, जेणेकरून मृत्यूचे खरे कारण कळू शकेल. आयेशा यांचा मुलगा परदेशात राहत असून तो पाकिस्तानात आल्यानंतरंच आयेशा यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार केले जाणार आहेत. आयशा खानचा जन्म २२ नोव्हेंबर १९४८ रोजी झाला. ‘आखिरी चट्टान’, ‘टिपू सुलतान: द टायगर लॉर्ड’, ‘दहीज’, ‘बोल मेरी मछली’ आणि ‘एक और आसमान’ यांसारख्या शोमधील तिच्या अभिनयाचे खूप कौतुक झाले. तिने ‘मुस्कान’, ‘फातिमा’ आणि ‘राजू बन गया जेंटलमन’ या भारतीय चित्रपटातही काम केले होते. ती दिवंगत अभिनेत्री खलिदा रियासतची मोठी बहीण होत्या, त्या पाकिस्तानी मनोरंजनसृष्टीतील लोकप्रिय चेहरा होत्या.