मराठमोळी अभिनेत्री मिताली मयेकर हिने आपल्या अभिनयाच्या जोरावर प्रेक्षकांच्या मनावर अधिराज्य गाजवले. कायमच अभिनयामुळे चर्चेत राहणाऱ्या मितालीने इन्स्टाग्रामवर काही सुंदर फोटोज शेअर केले आहेत.
Mitali Mayekar Photos

मराठमोळी प्रसिद्ध सिने आणि मालिका अभिनेत्री मिताली मयेकरने आपल्या अभिनयाच्या जोरावर प्रेक्षकांच्या मनावर अधिराज्य गाजवले. कायमच तिच्या फॅशनची चाहत्यांमध्ये जोरदार चर्चा होते.

सध्या ‘फसक्लास दाभाडे’मुळे चर्चेत राहिलेली मिताली चित्रपटाच्या प्रमोशनमध्ये व्यग्र आहे. तिने चित्रपटाच्या प्रमोशनसाठी खास लूक करत फोटोशूट केले आहे.

ब्लू कलरची डिझायनिंग स्टायलिश साडी नेसून अभिनेत्रीने कॅमेऱ्यासमोर हटके फोटो पोजेस देत चाहत्यांचे लक्ष वेधून घेतले आहे.

अभिनेत्रीने शेअर केलेल्या फोटोंमध्ये ऑक्सफर्ड दागिने वेअर करत एका पेक्षा एक हटके अंदाजात फोटो शेअर केले आहेत.

“magic of the magic hours” असं कॅप्शन देत अभिनेत्रीने फोटो शेअर केले आहेत. तिने शेअर केलेल्या फोटोंचे चाहते कौतुक करीत आहेत.

मिताली मयेकरने शेअर केलेल्या फोटोंवर चाहत्यांकडून लाईक्स आणि कमेंट्सचा वर्षाव चाहते करीत आहे.






