
gayatri datar
प्रत्येक खेळाडूच्या संयमाची कसोटी पाहणाऱ्या नवनवीन खेळांमुळे मराठी ‘बिग बॉस मराठी ३’(Bigg Boss Marathi 3) मधील रंगत दिवसेंदिवस वाढत चालली आहे. खेळ जिंकण्यासाठी प्रत्येक खेळाडू कसोशीने प्रयत्न करत असून या सगळ्यात गायत्री दातार(Gayatri Datar ) अव्वल ठरत आहे.
[read_also content=”Wedding Photos – जयदीप आणि गौरीचं लग्न थाटामाटात पडणार पार,‘सुख म्हणजे नक्की काय असतं’ मालिकेमध्ये खास विवाह सोहळा https://www.navarashtra.com/movies/jaydeep-and-gauri-wedding-in-sukh-mhanje-nakki-kay-aste-serial-nrsr-207926.html”]
मागील आठवड्यात कॅप्टनपदाची जबाबदारी गायत्रीवर(Gayatri Datar Best Captain) होती. कॅप्टन आणि बिग बॅासकडून दिल्या जाणाऱ्या टास्कचीड संचालक अशा दुहेरी जबाबदाऱ्या तिने उत्तमरित्या निभावल्या. जसजसा बिग बॉसचा खेळ पुढे सरकत आहे, तसा गायत्रीचा उत्तम खेळ आपल्याला पाहायला मिळत आहे.
कॅप्टनपदाची भूमिका तिने चोख निभावली याबद्दल बिगबॉसमधील बाकीच्या खेळाडूंसह सुत्रसंचालक महेश मांजरेकर (Mahesh manjrekar) यांनीही तिचे कौतुक केले. याशिवाय प्रेक्षकही तिच्या खेळाचे कौतुक करत आहेत. कॅप्टन असताना तिने कोणावरही अन्याय होऊ दिला नाही. गायत्रीच्या या उत्तम खेळामुळे तिचे चाहते तिच्यावर भलतेच खुश आहेत.