Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • bigg boss marathi 6 |
  • IPL 2026 |
  • Gold Rate |
  • Ashok Kharat |
  • US-Israel Iran War
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

Gaarud Movie : गूढ, रहस्यमयी स्वप्नांचा शोध कोणकोणते कलाकार घेणार ? ‘गारुड’चा नवीन मोशन पोस्टर रिलीज

स्वप्नांच्या दुनियेत वावरत असताना एखाद्या शोधात गुरफटत गेलेली एक रहस्यमय कथा 'गारुड' या चित्रपटातून समोर येणार आहे. नुकतीच या चित्रपटातील कलाकारांची नावे समोर आली आहेत.

  • By चेतन बोडके
Updated On: Oct 09, 2024 | 02:04 PM
गूढ, रहस्यमयी स्वप्नांचा शोध कोणकोणते कलाकार घेणार ? 'गारुड'चा नवीन मोशन पोस्टर रिलीज

गूढ, रहस्यमयी स्वप्नांचा शोध कोणकोणते कलाकार घेणार ? 'गारुड'चा नवीन मोशन पोस्टर रिलीज

Follow Us
Close
Follow Us:

शोध हा कधीच संपत नाही. माणूस नेहमीच कशा ना कशाच्या शोधात असतो. बरेचदा हे शोध पूर्ण होतात तर काहीवेळा ही गणिते न उलगडणारी असतात. अशातच एका रात्रीतील अनेक गूढ लवकरच मोठया पडदयावर उलगडण्यास सज्ज होत आहेत. हो कारण रहस्य उलगडणारा ‘गारुड’ हा सिनेमा येत्या २५ ऑक्टोबरपासून चित्रपटगृहांमध्ये प्रदर्शित होणार आहे. स्वप्नांच्या दुनियेत वावरत असताना एखाद्या शोधात गुरफटत गेलेली एक रहस्यमय कथा ‘गारुड’ या चित्रपटातून समोर येणार आहे. नुकतीच या चित्रपटातील कलाकारांची नावे समोर आली आहेत. काळोखातील प्रकाशाच्या शोधातील हे ‘गारुड’ चित्रपटाचे मोशन पोस्टर आणि कलाकारांची नावे समोर आल्याने चित्रपटाबाबतची उत्सुकता अधिकच वाढवत आहे.

हे देखील वाचा – “मानवत मर्डर्स” मधील समिंद्रीने जिंकले प्रेक्षकांचे मन; म्हणून सई ठरतेय आजच्या पिढीतली स्मिता पाटील!

‘किमयागार फिल्म्स’, ‘एल एल पी’ आणि ‘ड्रीमव्हीवर’ निर्मित आणि ‘सनशाईन स्टुडिओ’ प्रस्तुत या चित्रपटाची निर्मिती निर्माते ध्रुव दास, तृप्ती संजय राऊत, श्वेता देवेंद्र गुजर-शाह यांनी केली आहे. तसेच सह निर्माते म्हणून स्मृती प्रमोद खाडिलकर, अमोद चंद्रशेखर परांजपे, श्रुती ओंकार संगोराम यांनी बाजू सांभाळली. चित्रपटात राष्ट्रीय पुरस्कार विजेते, अभिनेते गिरीश कुलकर्णी, दमदार अभिनेते शशांक शेंडे यांसह पायल पांडे, सचिन वळंजू, धनंजय सरदेशपांडे ही कलाकारांची फौज कथेमागील रहस्य गडद करताना दिसणार आहेत. तर तृप्ती राऊत, संतोष आबाळे, उमा नामजोशी, पंडित ढवळे, वैष्णवी जाधव, सार्थक शिंदे हे सहकलाकार चित्रपटात झळकणार आहेत. तर दिग्दर्शक प्रताप विठ्ठलराव सोनाळे यांनी चित्रपटाचे दिग्दर्शन केले आहे. तर चित्रपटाची कथा डॉ. प्रमोद खाडिलकर लिखित असून रहस्यमय अशा लक्षवेधी संगीताची जबाबदारी ओंकार संगोराम यांनी संभाळली आहे. चित्रपटाच्या संगीताबरोबरचं पार्श्वसंगीत हे वाखाणण्याजोगे आहे. ही पार्श्वसंगीताची धुरा संकेत पाटीलने संभाळली आहे.

 

चित्रपटाबाबत बोलताना दिग्दर्शक प्रताप सोनाळे म्हणाले की, “हा एक काल्पनिक चित्रपट आहे. पण मग यात विशेष असे काय आहे तर याची हाताळणी. ही हाताळणी आपल्या आजच्या वास्तविकतेशी मिळतीजुळती आहे, यातील प्रत्येक गूढ पात्र इतर पात्रांसोबत होणाऱ्या देवाणघेवाणीतून उलगडत जातं. त्यातूनच त्यांच्या कथेच्या, त्यांच्या शोधाच्या आवृत्त्या सादर होतात, पण ते शोध प्रेक्षकांच्या समोर येतात एका रंजक, गूढ, रहस्यमयी वेशात. त्याचं ‘गारूड’ आपल्या संवेदनांवर पकड घेतंच पण आपल्या मेंदूवरही आणि एक वास्तवकथाच पाहील्याची अनुभूती मिळते”, असं म्हणत त्यांनी सुंदर अशा रहस्यमय कथेची ओळख करुन दिली आहे. ‘गारुड’ हा रहस्यमय चित्रपट येत्या २५ ऑक्टोबरपासून महाराष्ट्रातील चित्रपटगृहांमध्ये प्रदर्शित होणार आहे.

Web Title: Girish kulkarni and shashank shendye starrer gaarud marathi movie motion released social media

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Oct 09, 2024 | 02:04 PM

Topics:  

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.