Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Mumbai Crime |
  • Lifestyles |
  • Marathi News |
  • crime news |
  • devendra fadnavis
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

‘गोदावरी’ ठरला विक्रम गोखलेंचा अखेरचा सिनेमा, साकारलेली जितेंद्र जोशीच्या आजोबांची भूमिका

काही दिवसांपूर्वी प्रदर्शित झालेल्या गोदावरी (Godavari)) या चित्रपटामध्ये विक्रम गोखले (Vikram Gokhale) यांनी महत्वाची भूमिका साकारली. या चित्रपटामध्ये विक्रम गोखले यांच्याबरोबरच जितेंद्र जोशी, अभिनेत्री गौरी नलावडे, अभिनेता संजय मोने यांनी देखील प्रमुख भूमिका साकारली आहे.  याशिवाय ‘तुझेच मी गीत गात आहे’ या मालिकेत त्यांनी पंडीत मुकुल नारायण नारायण ही भूमिका साकारली होती. ही त्यांनी काम केलेली अखेरची मालिका होती.

  • By साधना
Updated On: Nov 26, 2022 | 04:44 PM
godavari

godavari

Follow Us
Follow Us:

पुणे: ज्येष्ठ अभिनेते विक्रम गोखले (Vikram Gokhale) यांचं आज वयाच्या ७७ व्या वर्षी निधन झालं आहेगेल्या १५ दिवसांपासून (Pune) दिनानाथ मंगेशकर रुग्णालयात (Dinanath Mangeshkar Hospital) विक्रम गोखले मृत्यूशी झुंज देत होते. आज त्यांची प्राणज्योत मालवली.

[read_also content=”Breaking : ज्येष्ठ अभिनेते विक्रम गोखले यांचं निधन; पुण्यातील दिनानाथ मंगेशकर रुग्णालयात घेतला अखेरचा श्वास https://www.navarashtra.com/movies/veteran-actor-vikram-gokhale-passes-away-at-dinanath-mangeshkar-hospital-in-pune-nrvb-347753.html”]

विक्रम गोखले यांनी आजवर अनेक सिनेमांमध्ये, नाटकांमध्ये आणि मालिकांमध्येही काम केलं. जितेंद्र जोशीचा ‘गोदावरी’ हा विक्रम गोखलेंनी अभिनय केलेला अखेरचा सिनेमा ठरला आहे. या चित्रपटामध्ये त्यांनी जितेंद्र जोशींच्या आजोबांची भूमिका निभावली होती. संपूर्ण चित्रपटामध्ये त्यांचा ‘मारुतीच्या पायाला पाणी लागलं ?’ हा डायलॉग मनाला काहूर लागलेल्या आणि गोदावरीच्या पूरामुळे हाल झालेल्या माणसाचे वर्णन करणारा आहे. याशिवाय स्टार प्रवाहवरील ‘तुझेच मी गीत गात आहे’ ही त्यांनी काम केलेली अखेरची मालिका ठरली आहे.

विक्रम गोखले यांना अभिनयाचा वारसा त्यांच्या कुटुंबाकडून मिळाला. त्यांची पणजी दुर्गाबाई कामत या भारतीय चित्रपटसृष्टीतील पहिल्या अभिनेत्री होत्या. तर त्यांचे वडील चंद्रकांत गोखले हे मराठी चित्रपटसृष्टीतील प्रसिद्ध अभिनेते होते.

‘स्वामी’ हे विक्रम गोखले यांचे पहिलं गाजलेलं व्यावसायिक नाटक  होतं. अभिनयासोबत त्यांनी अनेक नाटकांचे दिग्दर्शन देखील केलं. ‘नकळत सारे घडले’, ‘महासागर’, ‘समोरच्या घरात’ ही त्यांची नाटकं गाजली. ‘अकेला’, ‘ईश्वर’, ‘हम दिल दे चुके सनम’, ‘घर आया मेरा परदेसी’ या हिट हिंदी चित्रपटांमध्ये देखील त्यांनी काम केलं. तसंच ‘या सुखांनो या’, ‘अग्निहोत्र’, ‘संजीवनी’ , ‘सिंहासन’ या मालिकामधील विक्रम गोखले यांच्या अभिनयाला प्रेक्षकांची पसंती मिळाली. ‘नटसम्राट’, ‘माहेरची साडी’ , ‘वजीर’ हे त्यांचे मराठी चित्रपट लोक आजही आवडीनं बघतात.

काही दिवसांपूर्वी प्रदर्शित झालेल्या गोदावरी या चित्रपटामध्ये विक्रम गोखले यांनी महत्वाची भूमिका साकारली. या चित्रपटामध्ये विक्रम गोखले यांच्याबरोबरच जितेंद्र जोशी, अभिनेत्री गौरी नलावडे, अभिनेता संजय मोने यांनी देखील प्रमुख भूमिका साकारली आहे.  याशिवाय ‘तुझेच मी गीत गात आहे’ या मालिकेत त्यांनी पंडीत मुकुल नारायण नारायण ही भूमिका साकारली होती. ही त्यांनी काम केलेली अखेरची मालिका होती.

Web Title: Godavari was the last cinema in which vikram gokhale done role of jitendra joshis grandfather nrsr

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Nov 26, 2022 | 03:34 PM

Topics:  

  • Vikram Gokhale

संबंधित बातम्या

Vikram Gokhale Last Movie: दिवंगत विक्रम गोखले यांची अखेरची पडद्यावरील झलक; ‘बेवारस – सत्य एका वळणावरचं’चा टीजर लाँच
1

Vikram Gokhale Last Movie: दिवंगत विक्रम गोखले यांची अखेरची पडद्यावरील झलक; ‘बेवारस – सत्य एका वळणावरचं’चा टीजर लाँच

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.