३२ वर्षीय सुप्रसिद्ध गायिका केव्हाच होऊ शकणार आई, "बाळाला जन्म देऊ शकत नाही..." म्हणत केला खुलासा
तिने दिलेल्या माहितीनुसार, तिला ल्यूपस नावाचा आजार आहे. या आजारामध्ये, मानवाच्या शरीरातली रोगप्रतिकारक शक्ती स्वत:च्या उतींवरच हल्ला करते. ज्यामुळे माणसाला अनेक आजारांचा सामना करावा लागतो. ल्यूपस आजारामुळे सेलेनावर २०१७ साली किडनी ट्रान्सप्लांटची शस्त्रक्रिया यशस्वी रित्या पार पडली. शिवाय तिला बायपोलर डिसऑर्डर नावाचा आजारही होता. या आजारावरील असलेल्या औषधांमुळे तिला आई होण्यास अडचणी होत असल्याचं तिला २०२२ मध्ये सांगण्यात आलं होतं.
हे देखील वाचा – रश्मिका मंदान्नाचा अपघात, स्वत:च दिली माहिती; म्हणाली, “दररोज आनंदात जगा…”
शिवाय सेलेनाने मुलाखतीमध्ये वेगवेगळ्या पद्धतीने आई होण्याच्या पर्यायांवरही भाष्य केलं आहे. ती म्हणाली, ” मी स्वत:ला खूप भाग्यवान समजते. मी सरोगसी किंवा मुल दत्तक घेण्याच्या पर्यायाचाही विचार करू शकते. या दोन्हीही पर्यायांचा अवलंब करत मी सोप्या पद्धतीने आई होऊ शकते.