Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • वर्ल्ड
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • वेब स्टोरीज
    • व्हायरल
    • करिअर
    • धर्म
    • टेक
    • ऑटो
    • फोटो
    • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Ganesh Chaturthi 2025 |
  • Independence Day 2025 |
  • Shravan 2025 |
  • Today's Gold Rate |
  • Ind vs Eng
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

‘सुपरस्टार सिंगर 3’मध्ये, 12 वर्षांच्या अथर्वने जिंकली सर्वांची मने

27 मे रोजी सुरू होत असलेल्या ‘पुकार दिल से दिल तक’ या आगामी नाट्यमय मालिकेत वेदिका ही व्यक्तिरेखा साकारणार्‍या सायली साळुंखे या अभिनेत्रीचे देखील रंगमंचावर स्वागत करण्यात येईल.

  • By शुभांगी मेरे
Updated On: May 26, 2024 | 01:48 PM
‘सुपरस्टार सिंगर 3’मध्ये, 12 वर्षांच्या अथर्वने जिंकली सर्वांची मने
Follow Us
Close
Follow Us:

‘सुपरस्टार सिंगर 3′ चा विजेता : या रविवारी, सोनी एन्टरटेन्मेंट टेलिव्हिजनवरील, ‘सुपरस्टार सिंगर 3’ मधील छोटे स्पर्धक ‘रफी नाईट’ या खास एपिसोडमध्ये दिग्गज गायक मोहम्मद रफी यांना हृदयस्पर्शी श्रद्धांजली वाहतील. प्रसिद्ध गीतकार आणि कवी मनोज मुंतशिर, सुप्रसिद्ध अभिनेता रझा मुराद आणि प्रसिद्ध गायक शब्बीर कुमार आणि विनीत सिंह हे या शो ची शोभा वाढवतील आणि रफीजी आणि त्यांच्या प्रसिद्ध गाण्यांबद्दलचे काही रोचक किस्से सांगतील. 27 मे रोजी सुरू होत असलेल्या ‘पुकार दिल से दिल तक’ या आगामी नाट्यमय मालिकेत वेदिका ही व्यक्तिरेखा साकारणार्‍या सायली साळुंखे या अभिनेत्रीचे देखील रंगमंचावर स्वागत करण्यात येईल. ही मालिका दर सोमवार ते शुक्रवार रात्री 8.30 वाजता प्रसारित करण्यात येणार आहे.

कॅप्टन पवनदीप राजनच्या टीममधील, हजारीबाग, झारखंडहून आलेल्या विलक्षण प्रतिभावान 12 वर्षीय अथर्व बक्षीने आपल्या ‘हम दोनो’ आणि ‘हसते जख्म’ या चित्रपटांतील, ‘अभी ना जाओ छोडकर’ आणि ‘तुम जो मिल गए हो’ या गाण्यांवरील हृदयस्पर्शी सादरीकरणाने प्रेक्षकांना मंत्रमुग्ध केले.

[read_also content=”हार्दिक पांड्याचं ट्रम्प कार्ड, असं झालं तर नताशाला संपत्ती मिळणार नाही… https://www.navarashtra.com/sports/hardik-pandya-natasa-stankovic-divorce-ipl-2024-trolling-538498.html”]

त्याच्या कामगिरीने प्रभावित झालेला मनोज मुंतशिर टाळ्या वाजवून त्याचे कौतुक करत म्हणाला, “अथर्व गात असताना माझ्या मागे बसलेले लोक एकमेकांना सांगत होते की हा तर ‘नन्हा रफी’ आहे. त्यामुळे हा किताब मी त्यांच्याकडून उधार घेत आहे, तू खरोखरच छोटा रफी आहेस. तू जयदेव साहेब आणि मदन मोहन साहेब या दिग्गज संगीतकारांची गाणी सादर केलीस. या गाण्यांची निर्मिती तुझ्या जन्माच्या बर्‍याच आधी झाली होती, पण तू ती गाणी खुद्द जयदेव साहेब आणि मदन मोहन साहेब यांच्याबरोबर त्यांच्या म्युझिक स्टुडिओमध्ये बसून शिकला असावा असे वाटत होते. तू खूपच छान गायलास. तुला अनेक आशीर्वाद!”

त्याच्या परफॉर्मन्सने मंत्रमुग्ध झालेल्या सुपरजज नेहा कक्कडने त्याचे कौतुक करत म्हटले, “रफी साहेबांची ही दोन्ही गाणी इतकी विलक्षण आहेत आणि तू ती खूप मनापासून गायलास. अशा वैविध्यातूनच गायकाची ओळख होते. दोन पूर्णपणे वेगळ्या प्रकारची गाणी एका मंचावर सदर करणे म्हणजे कमाल आहे, यामधून तू किती विलक्षण आणि अष्टपैलू गायक आहेस हे कळते. अथर्व, आज मला तुला काहीतरी सांगायचे आहे, ‘बैठो ना दूर हमसे, देखो खफा ना हो, किस्मतसे मिल गए हो, मिलके जुदा न हो’”

[read_also content=”कोलकाता विरुद्ध हैदराबादचा महामुकाबला, जाणून घ्या कधी आणि कुठे पाहणार मोफत Online Streaming https://www.navarashtra.com/sports/kolkata-knight-riders-vs-sunrisers-hyderabad-grand-match-know-when-and-where-to-watch-free-online-streaming-538443.html”]

कॅप्टन सलमान अलीने देखील पुष्टी जोडली, “हा जेव्हा गातो तेव्हा काहीतरी विलक्षण घडतेच, त्यामुळे मी त्याला ‘अथर्व जी’ म्हणेन. मी कायमच त्याच्याकडे आदराने आणि कौतुकाने बघतो. अनेक गायक उत्तम सादरीकरण करतात, पण एखाद्याबद्दल आपुलकी वाटणे आणि काहीतरी खास वाटणे दुर्मिळ आहे. अथर्वने आपल्या गायकीने तो आदर कमावला आहे. मी तुझी कितीही स्तुती केली तरी ती कमीच आहे, कारण जेव्हा तू परफॉर्म करतोस तेव्हा विलक्षण वातावरण निर्मिती होते. खूप छान, प्रभावशाली कामगिरी!”

त्याच्या मंत्रमुग्ध करणार्‍या कामगिरीनंतर, गायक शब्बीर कुमारने अथर्वला स्वतः तयार केलेले मोहम्मद रफीजींचे स्केच बक्षीस दिले. शो ची लज्जत वाढवण्यासाठी ‘पुकार दिल से दिल तक’ मधील वेदिका उर्फ सायलीने अथर्व आणि देवांश्रीयाला आपल्या मालिकेतील आई आणि दोन मुलींमधील मार्मिक बंध जिवंत करणारे अंगाईगीत गाण्याची खास विनंती केली.

Web Title: In superstar singer 3 12 year old atharva won everyones hearts

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: May 26, 2024 | 01:48 PM

Topics:  

  • indian television show

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.