Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Dussehra |
  • Navratri |
  • Ind vs Wi test |
  • Bihar Election 2025 |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

“ना रहेगा बास, ना बजेगी बासुरी…”, कंगना रणौत ‘इंडियन आयडॉल 15’ मंचावर कोणावर बरसली…

'इंडियन आयडॉल 15' या म्युझिक रिॲलिटी शो मध्ये ‘सेन्सेशनल 70s’ हा विशेष भाग साजरा होणार आहे. या भागात बॉलिवूड अभिनेत्री आणि कंगना रणौत ‘इमर्जन्सी’ चित्रपटानिमित्त चित्रपटाच्या टीमसोबत उपस्थिती लावणार आहे.

  • By चेतन बोडके
Updated On: Jan 10, 2025 | 02:07 PM
“ना रहेगा बास, ना बजेगी बासुरी...”, कंगना रणौत 'इंडियन आयडॉल 15' मंचावर कोणावर बरसली...

“ना रहेगा बास, ना बजेगी बासुरी...”, कंगना रणौत 'इंडियन आयडॉल 15' मंचावर कोणावर बरसली...

Follow Us
Close
Follow Us:

या वीकएंडला सोनी एन्टरटेन्मेंट टेलिव्हिजनवरील ‘इंडियन आयडॉल 15’ या देशातल्या अत्यंत लोकप्रिय म्युझिक रिॲलिटी शो मध्ये ‘सेन्सेशनल 70s’ हा विशेष भाग साजरा होणार आहे, ज्यात ७० च्या काळातील गाजलेली गाणी स्पर्धक सादर करणार आहेत. या भागात बॉलिवूड अभिनेत्री आणि मंडी लोकसभा खासदार कंगना रणौत उपस्थिती लावणार आहे, जी ‘इमर्जन्सी’ या आगामी चित्रपटाची लेखक, दिग्दर्शक असून त्यात मुख्य भूमिका देखील साकारत आहे. तिच्यासोबत तिचे सह-कलाकार अनुपम खेर आणि श्रेयस तळपदे देखील या चित्रपटाच्या प्रमोशनसाठी येणार आहेत.

 

L&T अध्यक्षांच्या रविवारी काम करण्याच्या सल्ल्यावर दीपिका पादुकोणची संतप्त प्रतिक्रिया, म्हणाली “महत्वाच्या पदावरील लोकं जर…”

या भागात एका मजेदार संभाषणात ‘आयडॉल की क्रेझी गर्ल’ मानसी घोष हिने कंगनाला सांगितले की ती कंगनाची मोठी फॅन आहे. ती कंगनाला उद्देशून म्हणाली, “मी बऱ्याच मुलाखतींमध्ये हे ऐकले आहे की, दिग्दर्शक अशी तक्रार करतात की तुम्ही ज्या चित्रपटात काम करता, त्या चित्रपटाचे दिग्दर्शन आणि पटकथा यात देखील तुम्ही ढवळाढवळ करता. त्यामुळे तुमच्यासोबत काम करायला अनेक दिग्दर्शकांना आवडत नाही. त्यामुळे तुम्ही स्वतःच दिग्दर्शन करायचे ठरवले का?” त्यावर कंगनाने खेळकरपणे उत्तर दिले, “सारा सियाप्पा खतम करो.. याचा अर्थ तुला माहितीये ना? ना रहेगा बास, ना बजेगी बासुरी.” हसत हसत कंगना पुढे म्हणाली, “हे काही खरे नाही. ज्यांच्यासोबत मी काम केले आहे, त्या सगळ्यांविषयी मला खूप आदर आहे. त्यांनी मला नेहमीच प्रेरित केले आहे. काही उत्तम दिग्दर्शकांसोबत काम करण्याची मला संधी मिळाली. ‘क्वीन’, ‘तनु वेड्स मनू’, ‘फॅशन’ आणि ‘गॅंगस्टर’ यांसारखे चित्रपट त्यातील अद्भुत फिल्मोग्राफीबद्दल नावाजले गेले. यामुळे स्वतः दिग्दर्शन करण्याची स्फूर्ती मला मिळाली.”

कंगना पुढे म्हणते, “जेव्हा तुम्ही दहा लोकांसोबत काम करता, तेव्हा त्यातील दोघा-तिघांशी तुमच्या तारा नाही जुळत, पण तसे होणे ही सामान्य बाब आहे. तुम्ही सगळ्यांचे आवडते होण्यासाठी तुम्हाला स्वतः बदलण्याची गरज नाही. मी २००५ मध्ये फिल्म इंडस्ट्रीमध्ये आले आणि आता २०२५ उजाडले आहे. पण इथे अजूनही काही बोटावर मोजण्याइतकेच दिग्दर्शक, अभिनेत्री आणि अभिनेते आहेत, ज्यांनी खरोखर खूप चांगलं काम केले आहे. तुम्ही त्यांच्या अवतीभवती ‘चक्की पीसिंग’ करत राहता. त्यामुळे मी विचार केला, की नवीन प्रतिभा तयार करू या.”

Game Changer: सगळा खेळ पलटला राम चरण ३ वर्षांनी परतला; ‘गेम चेंजर’च्या कथेत अनेक रहस्य होतील उघड!

कंगनाने पुढे अभिमानाने सांगितले की, “तुम्ही माझा चित्रपट ‘इमर्जन्सी’ बघितलात, तर तुम्हाला लक्षात येईल की, आम्ही जगभरातून उत्तमोत्तम प्रतिभा या चित्रपटात एकत्र केली आहे. आमच्या DoP (डायरेक्टर ऑफ फोटोग्राफी) ने अकादमी अवॉर्ड जिंकले आहे. माझा प्रोस्थेटिक मेकअप आर्टिस्ट जगात सर्वश्रेष्ठ आहे. चित्रपटात, अनुपम जी आणि श्रेयस तळपदे सारखे राष्ट्रीय पुरस्कार विजेते कलाकार आहेत. मला पटकथा लेखनात ज्यांनी मदत केली, ते देशातले उत्तम लेखक आहेत. कधी कधी मला वाटतं की आपले चित्रपट आपल्याला निराश करू शकतात पण 20 वर्षे इथे काम केल्यानंतर मी विचार केला की काहीतरी नवीन करू या.” शेवटी ती आत्मविश्वासाने म्हणाली, “असं नाही आहे की, ज्यांच्यासोबत काम करावं असे फारसे लोक माझ्याकडे नाहीत. पण मला फक्त काहीतरी नवीन करायचं होतं, इतकंच.”

या भागात मस्ती, प्रेरणा आणि प्रामाणिकपणा दर्शविणारे क्षण आहेत, त्यामुळे चाहत्यांनी हा एपिसोड अवश्य बघावा. इंडियन आयडॉल 15 चा हा भाग अवश्य बघा, या वीकएंडला रात्री 8:30 वाजता फक्त सोनी एन्टरटेन्मेंट टेलिव्हिजनवर!

Web Title: Indian idol season 15 manasi ghosh questions kangana ranut on directors boycotting her and not wanting to work with her the actress response will shock you

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jan 10, 2025 | 02:07 PM

Topics:  

  • Kangana Ranaut

संबंधित बातम्या

Kangana Ranaut on Rahul Gandhi: ‘राहुल गांधी देशासाठी कलंक, ते सर्वत्र देशाची…’, कंगना राणौतची जोरदार टीका
1

Kangana Ranaut on Rahul Gandhi: ‘राहुल गांधी देशासाठी कलंक, ते सर्वत्र देशाची…’, कंगना राणौतची जोरदार टीका

मानहानी प्रकरणात कंगनावर न्यायालयाची कडक कारवाई, व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे हजर राहण्याची केली विनंती
2

मानहानी प्रकरणात कंगनावर न्यायालयाची कडक कारवाई, व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे हजर राहण्याची केली विनंती

फहाद अहमदने कंगनाला म्हटले वाईट राजकारणी, पत्नी स्वरा भास्कर लगेच फटकारले; म्हणाली ‘तिचा प्रवास कौतुकास्पद…’
3

फहाद अहमदने कंगनाला म्हटले वाईट राजकारणी, पत्नी स्वरा भास्कर लगेच फटकारले; म्हणाली ‘तिचा प्रवास कौतुकास्पद…’

‘तुम्ही आगीत आणखी तेल ओतलं…’ कंगना रणौतला सुप्रीम कोर्टाने फटकारलं; अभिनेत्री स्वतःच्याच जाळ्यात फसली
4

‘तुम्ही आगीत आणखी तेल ओतलं…’ कंगना रणौतला सुप्रीम कोर्टाने फटकारलं; अभिनेत्री स्वतःच्याच जाळ्यात फसली

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.