गुजरातच्या जामनगरला सध्या उत्सवाचं स्वरुप प्राप्त झालं आहे. देशातील सर्वात मोठे उद्योगपती मुकेश अंबानींचे छोटे सुपुत्र अनंत अंबानी आणि राधिका मर्चेंट यांचं प्री-वेडिंग फंक्शन धुमधडाक्यात करण्यात येत आहे. दोन दिवसापासून सुरू असलेल्या या रंगारंग कार्यक्रमाची संपूर्ण जगात चर्चा सुरू आहे. हॉलीवूडपासून बॉलीवूडपर्यंतच्या कलाकार मंडळींनी या कार्यक्रमाला हजेरी लावली. काल, दुसऱ्या दिवशी अख्ख बॅालिवूड स्टेजवर उतरल्याचं पाहायला मिळालं. यावेळी बॉलीवूडच्या सेलिब्रिटींचा जबरदस्त डान्स पाहायला मिळाला. याचे व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर तुफान व्हायरल झाले आहेत.
अनंत-राधिका यांच्या संगीत सोहळ्याचा दुसरा दिवस बॅालिवूड सेलेब्रिटींनी गाजवला. शनिवारी तसेच बॉलीवूडच्या तारका प्रसिद्ध डिझायनर मनीष मल्होत्रासह (Manish Malhotra Dance In Anant Radhika Pre-Wedding) थिरकताना दिसल्या. यावेळी, स्टेजवर अभिनेत्री अनन्या पांडे, सारा अली खान, खुशी कपूर, जान्हवी कपूर आणि मनीष मल्होत्रा डान्स करताना पाहायला मिळत आहे. करण जोहरच्या ‘कभी खुशी कभी गम’ चित्रपटातील ‘बोले चुडिया’ या गाण्यावर त्यांनी डान्स करत आहेत. यांच्या या डान्स व्हिडीओने सध्या सगळ्यांचं लक्ष वेधून घेतलं आहे. हा व्हिडिओ पाहून नेटकरीही कंमेट करण्यापासून स्वतला थांबवू शकले नाहीत.
अनंत अंबानी-राधिका मर्चंट यांच्या प्री-वेडिंगचा आज शेवटचा दिवस आहे. आज ‘टस्कर ट्रेल्स’ आणि ‘हस्ताक्षर’ हा कार्यक्रम आहे. ‘टस्कर ट्रेल्स’ हा आउडोअर कार्यक्रम असून यात पाहुण्यांना जामनगर फिरवलं जाणार आहे. तर दुसरा कार्यक्रम भारतीय पेहरावात असणार आहे.