Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Maharashtra Local Body Election |
  • Marathi news |
  • Political news |
  • Ind Vs Sa |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

‘गोदावरी’च्या शिरपेचात आणखी एक मानाचा तुरा, न्यूयॉर्क इंडियन फिल्म फेस्टिव्हलमध्ये जितेंद्र जोशीने पटकावला सर्वोत्कृष्ट अभिनेत्याचा पुरस्कार

‘गोदावरी’ (Godavari) चित्रपटाचे अभिनेता जितेंद्र जोशी (Jitendra Joshi) यांची न्यूयॉर्क इंडियन फिल्म फेस्टिव्हल(NYIFF) २०२२ च्या सर्वोकृष्ट अभिनेता (Best Actor) म्हणून निवड करण्यात आली आहे.

  • By साधना
Updated On: May 16, 2022 | 03:59 PM
jitendra joshi in godavari

jitendra joshi in godavari

Follow Us
Close
Follow Us:

जिओ स्टुडिओजच्या (Jio Studios) बहुप्रतीक्षित अशा ‘गोदावरी’ (Godavari) चित्रपटाने जगभरातील अनेक नामांकित राष्ट्रीय -आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवात आपलं नाव कमावल्यानंतर चित्रपटाचे अभिनेता जितेंद्र जोशी (Jitendra Joshi) यांची न्यूयॉर्क इंडियन फिल्म फेस्टिव्हल (NYIFF) २०२२ च्या सर्वोकृष्ट अभिनेता (Best Actor) म्हणून निवड करण्यात आली आहे. त्यामुळे आता ‘गोदावरी’च्या शिरपेचात पुन्हा एकदा मानाचा तुरा रोवला गेला आहे.

[read_also content=”चित्रपटातील ‘त्या’ प्रसंगानंतर…’धर्मवीर’ अर्धवट सोडून उद्धव ठाकरे आले थिएटर बाहेर https://www.navarashtra.com/movies/uddhav-thackeray-left-dharmaveer-screening-after-that-scene-nrak-280600.html”]

ब्लू ड्रॉप फिल्म्स आणि जितेंद्र जोशी पिक्चर्स निर्मित, निखिल महाजन दिग्दर्शित या चित्रपटात जितेंद्र जोशी, विक्रम गोखले, नीना कुळकर्णी, संजय मोने, प्रियदर्शन जाधव, गौरी नलावडे यांच्या प्रमुख भूमिका आहेत.

‘गोदावरी’बाबत दिग्दर्शक निखिल महाजन म्हणतात, “ ‘गोदावरी’ या चित्रपटाला जगभरातून अनेक पुरस्कारांनी गौरवण्यात आले आहे. अनेक चित्रपट महोत्सवांमध्ये सहभागी झाल्यानंतर आता नामांकित अशा कान्स चित्रपट महोत्सवात स्क्रिनिंगसाठी निवडलेल्या पहिल्या पाच चित्रपटांमध्ये ‘गोदावरी’चा समावेश करण्यात आला आहे. माझा अगदी जिवलग मित्र आणि या चित्रपटाचा अभिनेता जितेंद्र जोशी याला देखील न्यूयॉर्क इंडियन फिल्म फेस्टिवल (NYIFF) २०२२ च्या सर्वोकृष्ट अभिनेता म्हणून निवड झाल्याबदल मला फार आनंद होत आहे.आयुष्य आणि मृत्य यांच्यातील गुंता सोडवण्याचा प्रयत्न ‘गोदावरी’मध्ये करण्यात आला आहे. हा चित्रपट केवळ सतरा दिवसांमध्ये चित्रित करण्यात आला आहे.”

यापूर्वी या चित्रपटाला अनेक पुरस्कारांनी गौरवण्यात आले आहे. ‘इफ्फी २०२१’ मध्ये सर्वोत्कृष्ट अभिनेता जितेंद्र जोशी आणि दिग्दर्शनातील विशेष ज्युरी पुरस्कार निखिल महाजन यांनी पटकावला आहे. तर न्यूयॉर्क इंडियन फिल्म फेस्टिवलमध्ये २०२२ मध्ये ‘गोदावरी’ या चित्रपटाची ओपनिंग फिल्म म्हणून निवड करण्यात आली होती. वॅनक्योवर इंटरनॅशनल फिल्म फेस्टिव्हलमध्ये २०२१ मध्ये वर्ल्ड प्रीमिअर आणि न्यूझीलंड इंटरनॅशनल फिल्म फेस्टिवलमध्ये एशिया पॅसिफिक प्रीमिअरही दाखवण्यात आले. पुणे आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवात दिग्दर्शक निखिल महाजन यांना सर्वोत्कृष्ट दिग्दर्शक तर शमीम कुलकर्णी यांना सर्वोत्कृष्ट छायाचित्रणकाराच्या पुरस्काराने गौरवण्यात आले आहे.

Web Title: Jitendra joshi wins best actor award in newyork indian film festival nrsr

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: May 16, 2022 | 03:51 PM

Topics:  

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.