फोटो सौजन्य - Jio Cinema
बिग बॉस १८ : होस्ट सलमान खानचा चर्चेत असलेला रिऍलिटी शो बिग बॉस १८ सोशल मीडियावर बराच गाजत असतो. सध्या सोशल मीडियावर अनेक चर्चा बिग बॉस १८ च्या संदर्भात सुरु आहेत. बिग बॉस १८ वीकेंड का वारवर, सलमान खानने अविनाश, चाहत पांडे आणि करणवीर मेहरा यांच्याशी या आठवड्यात घरात घडलेल्या मुद्द्यांवर चर्चा केली. यादरम्यान सलमान खानने करणवीर मेहरासोबत दीर्घ संवाद साधला. त्याला सलमानने समोरून खेळण्यासाठी सांगितले.
हेदेखील वाचा – Bigg Boss 18 : तिसऱ्या आठवड्यात बिग बॉस 18 च्या घरात हे टॉप 5 स्पर्धक! प्रेक्षक Ormax वर संतापले
सलमान खान म्हणाला की करणवीर घराच्या प्रत्येक कोपऱ्यात जाऊन लोकांशी बोलून कथा मांडतो. संवादादरम्यान सलमान खानने करणवीर मेहराला नंदवीर मेहरा असे संबोधले. त्याच्या वैयक्तिक आयुष्यावरही भाष्य केले. त्याचबरोबर सलमान खानने अविनाश मिश्रावर सुद्धा निशाणा साधला आहे.
Karanveer ne kiya harsh truth ka samnaa, jab mila unko Salman Khan se reality check. 🙌🏼
Dekhiye #BiggBoss18, Mon-Fri raat 10 baje aur Sat-Sun 9:30 baje, sirf #Colors aur @JioCinema par.@bellavita_org #Vaseline @Parle2020cookie #ChingsSecret #BlueHeavenCosmetics #Harpic… pic.twitter.com/G0lDZZujuD
— ColorsTV (@ColorsTV) October 26, 2024
बिग बॉस १८ चा आता नवा प्रोमो प्रदर्शित झाला आहे यामध्ये घरच्यांना करणवीर मेहरा आणि व्हीव्हीएन डिसेना या दोघांमधील कोणाचे ह्रदय काळे आहे हे सांगायचं आहे. या टास्कमध्ये चाहत पांडेने व्हिव्हियन डिसेनाचे हृदय काळे आहे असे सांगितले आहे. तेजिंदर बग्गा यांनी सुद्दा व्हिव्हियन डिसेनाचे हृदय काळे आहे असे त्यांनी सांगितले. त्यानंतर अभिनेत्री शिल्पा शिरोडकर यांनी स्पस्ट केलं की माझा निर्णय व्हिव्हियन डिसेनाच्या विरोधात असेल. तर नायरा बॅनर्जीने करणवीर मेहराचे हृदय काळे असल्याचे त्यांनी सांगितले. त्याचबरोबर रजतने सुद्धा व्हिव्हियन डिसेनाच हृदय काळे आहे असे त्यांनी सांगितले. इशा सिंहने सांगितले की व्हिव्हियन डिसेना जे त्यांच्या मनात आहे तर त्यांच्या तोंडावर आहेत. त्यामुळे करणवीर मेहराचे हृदय काळे आहे असे त्यांनी सांगितले.
Contestants ne kiya ghar mein kaale dil ko recognise, kisko milega iss task ka prize? 🏆
Dekhiye #BiggBoss18, Mon-Fri raat 10 baje aur Sat-Sun 9:30 baje, sirf #Colors aur @JioCinema par.#BiggBoss18 #BiggBoss #BB18@BeingSalmanKhan@ChahatPofficial @THE_SHEHZADA @KaushikAlice… pic.twitter.com/p7H5MLTn4K
— ColorsTV (@ColorsTV) October 26, 2024
बिग बॉसच्या घरामध्ये आज रोहित शेट्टी आणि अजय देवगण त्याच्या आगामी सिनेमा सिंघमचा येणारा नवा भागाचे प्रमोशन करण्यासाठी येणार आहेत. यामध्ये रोहित शेट्टीने घरामधील सदस्यांना करंट दिला आहे. या टास्कमध्ये जो सदस्य त्याचे उत्तर नाही असेल ते त्यांना करंट दिले जाणार आहे. यामध्ये करणवीर मेहरा, श्रुतिका अर्जुन, चाहत पांडे यांना विजेचा शॉक दिला जाणार आहे.