phonebhoot
तुम्ही कधी सुंदर भूत पाहिले आहे का ? जर नसेल तर आता सज्ज व्हा, कारण एक्सेल एंटरटेनमेंटच्या बहुप्रतिक्षित हॉरर-कॉमेडी ‘फोन भूत’मध्ये (Phone Bhoot) कतरिना कैफ (Katrina Kaif) भूताची भूमिका साकारताना दिसणार आहे. या चित्रपटात सिद्धांत चतुर्वेदी आणि ईशान खट्टर यांच्यादेखील महत्त्वपूर्ण भूमिका असणार आहेत.
कतरिना, सिद्धांत आणि ईशान खट्टर अभिनित त्यांच्या फर्स्ट लूकसह त्यांच्या कास्टिंगबाबत प्रेक्षकांमध्ये बरीच उत्सुकता होती. त्याचवेळी, चित्रपटाच्या घोषणेपासून त्यांच्या शैलीबद्दलदेखील बरीच उत्सुकता होती. ‘फोन भूत’ हा चित्रपट एक मजेशीर हॉरर-कॉमेडी असल्याचं आता स्पष्ट झालं आहे.
[read_also content=”‘ब्रह्मास्त्र’च्या कमाईचा सगळ्यात मोठा रेकॉर्ड, अयान मुखर्जीने मानले प्रेक्षकांचे आभार https://www.navarashtra.com/movies/brahmastra-became-number-one-worldwide-movie-of-2022-nrsr-332598.html”]
‘फोन भूत’ हा चित्रपट बऱ्याच दिवसांपासून चर्चेत आहे. त्यामुळे या चित्रपटाची कथा आणि इतर तपशील याविषयी प्रेक्षकांना बरीच माहिती असली तरी, एक मोठे कुतूहल चित्रपटातील भुताच्या पात्राबद्दल दर्शकांमध्ये होते. मात्र आता प्रेक्षकांना या प्रश्नाचे उत्तर मिळणार आहे. कारण या चित्रपटात कतरिना कैफ एका सुंदर भूताच्या भूमिकेत दिसणार आहे. आतापर्यंत आपण कतरीनाला चित्रपटांमध्ये फक्त ग्लॅमरस भूमिकेत पाहिलं असून, कतरिना पहिल्यांदाच पडद्यावर भूताच्या भूमिकेत दिसणार आहे. या दिवाळीत हा चित्रपट प्रदर्शित होणार असल्याने, कतरिनाला पडद्यावर अशा अनोख्या भूमिकेत पाहणे दर्शकांसाठी खूप रोमांचक असेल.
बॉलीवूडमधील प्रसिद्ध अभिनेत्रींपैकी एक कतरिना आता भूताच्या रूपात चित्रपटामध्ये दिसणार आहे. ‘फोन भूत’ हा कतरिनाचा लग्नानंतरचा पहिला चित्रपट आहे. त्यामुळे देखील रसिकांमध्ये या चित्रपटाविषयी उत्सुकता आहे. अलीकडेच, इंटरनेटद्वारे समोर आलेल्या एका व्हिडिओमध्ये, कतरीना कैफ, सिद्धांत चतुर्वेदी आणि ईशान खट्टर सेटवर धम्माल करताना दिसले, ज्यामुळे या तिघांना चित्रपटात एकत्र पाहण्यासाठी प्रेक्षकांच्या उत्सुक आहेत.
गुरमीत सिंग दिग्दर्शित आणि रविशंकरन आणि जसविंदर सिंग बाथ लिखित, रितेश सिधवानी आणि फरहान अख्तर यांच्या एक्सेल एंटरटेनमेंटद्वारा निर्मित फोन भूत ४ नोव्हेंबर २०२२ रोजी सिनेमागृहात दाखल होणार आहे.