सूरज चव्हाणचा "झापुक झूपूक" सिनेमा केव्हा येणार ? केदार शिंदे यांनी केली मोठी घोषणा !
रिलस्टार आणि बिग बॉस मराठी ५ चा विजेता सूरज चव्हाण ‘राजा राणी’ चित्रपटातून प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. या चित्रपटातून सूरजने मराठी फिल्म इंडस्ट्रीमध्ये डेब्यू केले आहे. लवकरच या चित्रपटातून सूरज प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. खेळाडूवृत्ती, मितभाषी, कोणाशी पंगा न घेणारा, प्रामाणिक, मातीशी जोडलेला गोलीगत सूरज चव्हाण नेहमीच बिग बॉस मराठीच्या घरात चर्चेत राहिला आहे. सूरजने बिग बॉस मराठीची ट्रॉफी जिंकल्यानंतर सूरजचा आणखी एक नवा सिनेमा प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.
बिग बॉस मराठी ५ च्या ग्रँड फिनालेवेळी दिग्दर्शक केदार शिंदे यांनी सूरज चव्हाणच्या अपकमिंग सिनेमाची घोषणा केली होती. आता अशातच केदार शिंदे यांनी इन्स्टाग्रामवर पोस्ट शेअर करत चित्रपटाची घोषणा केली असून त्यांनी सूरज चव्हाणचा चित्रपट केव्हा रिलीज होणार ? याची ही माहिती दिली आहे. केदार शिंदे यांनी पोस्ट शेअर करत लिहिले की, “आणि एक नवीन प्रवासाला सुरूवात झाली आहे… केदार शिंदे प्रोडक्शन आणि जिओ सिनेमा मराठी सादर करीत आहेत “झापूक झूपूक” ‘बाईपण भारी देवा’ नंतरची ही माझी कलाकृती. २०२५ मध्ये तुमच्या भेटीला येणार”
शेअर केलेल्या पोस्टमध्ये, केदार शिंदे यांनी सुरज चव्हाणसोबतचा फोटो पोस्ट केलाय. त्यांच्यासोबत जियो स्टुडिओजचे प्रमुख निखिल साने सुद्धा दिसत आहेत. केदार शिंदे यांनी तिघांचाही एकत्र फोटो पोस्ट करत चित्रपटाची घोषणा केली आहे. केदार शिंदे दिग्दर्शित “झापूक झूपूक” सिनेमा २०२५ मध्ये रिलीज होणार आहे. केदार शिंदे यांचा “बाईपण भारी देवा”चित्रपटानंतर “झापूक झूपूक” हा अपकमिंग सिनेमा येणार आहे.