(फोटो सौजन्य- सोशल मीडिया)
प्रसिद्ध गायक सोनू निगमचा एक व्हिडिओ चर्चेत आहे. खरं तर ही त्याच्या घरच्या मंदिराची क्लिप आहे. नवरात्रीदरम्यानच्या पूजेचा व्हिडिओ गायकाने इन्स्टाग्रामवर शेअर केला आहे. जो त्याच्या मुलीने बनवला आहे. तसेच, नवरात्रीत पूजा करण्याची हीच पद्धत आहे असे देखील गायक म्हणाला आहे. मात्र सर्वांचे लक्ष त्यांच्या घरातील मंदिरात असलेल्या फोटोकडे गेले. जिथे लता मंगेशकर, ओशो, मोहम्मद रफी आणि मायकल जॅक्सन यांचे पुतळे दिसत आहेत. व्हिडिओमध्ये सोनू निगम सर्वांची पूजा करताना दिसत आहे.
सोनू निगम अतिशय आध्यात्मिक आहे. त्याची उपासनेवर प्रचंड श्रद्धा आहे. कोणताही सण असो किंवा विशेष प्रसंग, तो पूर्ण समर्पणाने पूजा करतो. यावेळी त्यांनी पूजा रुमची एक झलक सोशल मीडियावर शेअर केली आहे.
सोनू निगमने पूजेचा व्हिडीओ केला शेअर
सोनू निगमने हा व्हिडिओ दोन भागात शेअर केला आहे. ही क्लिप बनवण्यासाठी त्यांची मुलगी राणी तिशा निगमने बनवला आहे. नवरात्रीत हा त्याचा दिनक्रम असल्याचे त्यांनी सांगितलं आहे. सोनू निगम धोतर घालून पूजा करताना दिसत आहेत. सर्व देवी-देवतांना टिळक लावताना गायक दिसत आहे. हे सगळं झाल्यानंतर सर्वाना दिवे लागवताना दिसत आहे.
सोनू निगम यांच्या घरातील मंदिर
व्हिडीओमध्ये सोनू निगम घराच्या मंदिरात येताच पूजा करण्यास सुरुवात करतो. सर्वप्रथम सोनू निगम त्याच्या आई पुढे नतमस्तक झाला. यानंतर तिलक लावून लाल ओढणी अर्पण केली. आणि नंतर त्यांनी मंदिरात उपस्थित असलेल्या सर्व मूर्तींची विधीपूर्वक पूजा केली. पण मंदिरातील अनेक प्रसिद्ध ताऱ्यांची छायाचित्रे पाहून लोकांचे लक्ष वेधून घेतले.
हे देखील वाचा- ‘रांझन’ गाण्यातील शाहीर शेख आणि क्रिती सेनॉनची धमाकेदार केमिस्ट्री पाहून चाहते झाले चकित!
सोनू निगम लता मंगेशकर आणि गुलशन कुमार यांची पूजा करताना दिसले
सोनू निगमच्या मंदिरात राम परिवार, भगवान गणेश, हनुमानजी आणि माता देवीच्या मूर्ती आहेत. अनेक म्युझिक इंडस्ट्री आणि फिल्म स्टार्सचे फोटोही आहेत. गायक या सर्व सेलिब्रिटींची पूजा करताना दिसला. यामध्ये आशा भोसले, लता मंगेशकर, ओशो, गुलशन कुमार, मोहम्मद रफी आणि मायकल जॅक्सन यांचाही समावेश आहे.