यश अन् सनी देओल कधी सुरु करणारं 'रामायण' चं शूट? तारीख आली समोर
Sunny Deol And Yash Ramayana Movie Shooting Start Date : नितेश तिवारी दिग्दर्शित ‘रामायण’ (Ramayan)चित्रपटाची चाहत्यांना उत्सुकता लागून राहिली आहे. घोषणा झाल्यापासून प्रेक्षक चित्रपटाची आतुरतेने वाट पाहत आहेत. प्रभू श्रीरामाची भूमिका रणबीर कपूर साकारणार असून सीतामातेची भूमिका साई पल्लवी साकारणार आहे. नुकतंच दोघांचंही पहिल्या शेड्यूलिंगची शुटिंग पुर्ण झाली असून आता बाकीच्या स्टारकास्टच्याही शुटिंगचं आता अपडेट समोर आलं आहे.
रणबीर कपूर आणि साई पल्लवीचा ‘रामायण’ चित्रपट दोन भागांत असणार आहे. पहिल्या भागाची ९० टक्के शुटिंग पूर्ण झाली असून रावणाची भूमिका साकारणारा यश आणि हनुमानाचे पात्र साकारणारा सनी देओल चित्रपटाच्या शुटिंगला केव्हापासून सुरूवात करणार याचं अपडेट आता आलं आहे. २०२४ च्या शेवटी यश त्याचं पहिलं शेड्युल पूर्ण करणार आहे. यश चित्रपटामध्ये प्रमुख भूमिकेत देखील असून तो चित्रपटाचा सहनिर्माता देखील आहे. बॉलिवूडमध्ये यशची एन्ट्री पौराणिक कथांमधील शक्तिशाली आणि भयानक खलनायकाच्या भूमिकेतून होणार आहे. त्यामुळे चाहते त्याच्या डेब्यूसाठी खास आतुर आहेत.
हे देखील वाचा – घरात नियम तोडणाऱ्यांना शिक्षा मिळणार, सूरज म्हणतोय बिग बॉस बोलणार तसं मी वागणार
पिंकव्हिलाने दिलेल्या वृत्तानुसार, अभिनेता यशचे ‘रामायण’ चित्रपटामध्ये असणाऱ्या भूमिकेच्या लूक टेस्ट झालेल्या आहेत. डिसेंबर २०२४ पासून अभिनेता चित्रपटाच्या शुटिंगला सुरुवात करणार आहेत. यश ‘रामायण’ व्यतिरिक्त ‘टॉक्सिक’ नावाच्या चित्रपटातूनही प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. त्या चित्रपटाचं शुटिंग झाल्यानंतर यश ‘रामायण’ चित्रपटाच्या पहिल्या भागाच्या टीममध्ये सामील होईल. रामायणातील सर्वात महत्वाची भूमिका साकारण्यासाठी तो खूप उत्सुक आहे. यश २०२५ च्या मार्च किंवा एप्रिल महिन्यापर्यंत चित्रपटाचे शूटिंग पुर्ण करणार आहे.
त्यानंतर २०२५ च्या उन्हाळ्यापासून सनी देओल त्याच्या सीन्सचे शूटिंग पूर्ण करणार आहे. रामायणात सनी देओल हनुमानाची भूमिका साकारणार आहे. ‘बॉर्डर’चा सिक्वेल ‘बॉर्डर २’चे शूटिंग पूर्ण झाल्यानंतर सनी देओल ‘रामायण’ चित्रपटाच्या टीममध्ये सामील होणार आहे. त्याने नितीश तिवारी आणि नमित मल्होत्रा यांना शूटिंगसाठी मोठ्या प्रमाणात तारखा दिल्या आहेत. याशिवाय रिपोर्टमध्ये असेही सांगण्यात आले आहे की 2025 च्या मध्यात केव्हाही सनी देओल आणि यशसोबत रणबीर कपूरचे सीन शूट केले जातील. तिघांचेही टाईम मॅनेजमेंट करून ही शुटिंग आटोपण्यात येईल.
हे देखील वाचा – थलपथी विजयच्या ‘GOAT’चा चित्रपटगृहात धुमाकूळ, जगभरातील कमाईचा जादुई आकडा केला पार!
असं सांगण्यात येत आहे की, निर्माते ‘रामायण’ चित्रपट २०२६ मध्ये प्रदर्शित करण्याची शक्यता आहे. रामायणातील प्रत्येक पात्राचे शूटिंग ऑगस्ट २०२५ पर्यंत पूर्ण होईल. चित्रपटाच्या व्हिएफएक्सवर निर्माते, दिग्दर्शक आणि त्यांची ग्राफिक्स टीम लवकरच काम करायला घेणार आहेत. नितेश तिवारी सध्या ‘रामायण’ चित्रपटाच्या घोषणेच्या (Announcement) व्हिडिओवर काम करत आहेत. हा व्हिडिओ लवकरच सोशल मीडियावर रिलीज करण्यात येणार आहे. चित्रपटात जटायूच्या भूमिकेला बिग बी अमिताभ बच्चन आवाज देणार असल्याचे बोलले जात आहे.
दरम्यान, रणबीरच्या वर्कफ्रंटबद्दल बोलायचं तर, ‘रामायण’मधील पहिल्या पार्टची शुटिंग पूर्ण झाल्यानंतर रणबीर संजय लीला भन्साळी यांच्या ‘लव्ह अँड वॉर’ चित्रपटाच्या शूटिंगला सुरुवात करणार आहे. ऑक्टोबरच्या पहिल्या आठवड्यापासून रणबीर ‘लव्ह अँड वॉर’च्या शुटिंगला सुरुवात करणार आहे. चित्रपटामध्ये रणबीर व्यतिरिक्त आलिया भट्ट आणि विकी कौशल देखील महत्त्वाच्या भूमिकेत दिसणार आहे.