घरात नियम तोडणाऱ्यांना शिक्षा मिळणार, सूरज म्हणतोय बिग बॉस बोलणार तसं मी वागणार
‘बिग बॉस’च्या घरातील स्पर्धकांचा खेळ आता आणखीनच बदलताना दिसत आहे. सातव्या आठवड्यात बिग बॉसच्या घरात पहिल्या वाईल्ड कार्ड स्पर्धकाची एन्ट्री झाली आहे. त्याच्या एन्ट्रीने सर्वांच्याच गेममध्ये मोठा फरक पडलेला दिसत आहे. त्याच्या एन्ट्रीचा फटका बिग बॉसच्या घरात निक्की तांबोळी आणि अरबाज पटेलला जास्त पडलेला दिसत आहे. सातव्या आठवड्यात झालेल्या टास्क दरम्यान काही स्पर्धकांनी घरातील नियम तोडले आहेत. त्यांना आजच्या एपिसोडमध्ये बिग बॉस शिक्षा देणार आहेत. शिवाय, सूरजनेही स्पर्धकांना वागण्यावरून सज्जड दम देखील देऊन ठेवला आहे.
हे देखील वाचा – थलपथी विजयच्या ‘GOAT’चा चित्रपटगृहात धुमाकूळ, जगभरातील कमाईचा जादुई आकडा केला पार!
काही तासांपूर्वीच समोर आलेल्या प्रोमोमध्ये, शिक्षेस पात्र असणाऱ्या स्पर्धकांनीही बिग बॉसच्या घरातले महागडे प्रोडक्ट्स चोरल्याचा आरोप बिग बॉसने केलेला आहे. टास्क दरम्यान, नॉमिनेट झालेले काही स्पर्धक देखील त्या प्रोमोमध्ये घरातील स्पर्धकांच्या वस्तू चोरताना दिसत आहे. अनेक स्पर्धक असं वागल्यामुळे आता बिग बॉस त्या स्पर्धकांना शिक्षा सुनावणार आहे. त्यासोबतच ह्या आठवड्यातला कॅप्टन सूरज चव्हाण आहे. यावेळी तो कॅप्टनच्या नात्याने म्हणतो, “चुकी नाही झाली पाहिजे, तुम्ही म्हणाल तसं मी वागतो. बिग बॉस बोलणार तसं मी वागणार…”
सूरज बिग बॉसच्या घरात कॅप्टन झाल्यानंतर उत्तम पद्धतीने आपली जबाबदारी सांभाळताना तो दिसत आहे. सध्या त्याच्या खेळण्याचे आणि त्याच्या वागण्याचे अख्खा महाराष्ट्र कौतुक करताना दिसत आहे. आजच्या एपिसोडमध्ये, अंकिता सूरजला म्हणते की, “हे बघ मला बेडकुळी आली मला. अरबाजला ढकलले आहे मी सोपे आहे का? तुला पण ढकलीन थोड्या दिवसांनी आता तू पण सांभाळून राहा. त्यावर सुरज म्हणतोय की ,” राहतो की सांभाळून… पण अरबाज आणि वैभवाची बॉडी पावडर खाऊन झाली आहे.”
तेच पुढे अंकिताला DP दादा बोलवतात. तर अंकिताला म्हणते की ,” बेडकुळी आलेल्या माणसाला असे बोलावतात का?आदराने बोलवा मला. DP दादा आणि वैभव अंकिताला सेट मारायला सांगतात. आजच्या UNSEEN UNDEKHA मध्ये तुम्ही अंकिताने कसे सेट मारले हे पाहू शकता.