Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Dussehra |
  • Navratri |
  • Ind vs Wi test |
  • Bihar Election 2025 |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

“मारकडवाडीकरांनी क्रांतीची तुतारी फुंकत बंडाची पहिली मशाल पेटवली”, मराठमोळ्या अभिनेत्याची पोस्ट चर्चेत…

मारकडवाडीच्या समर्थनार्थ शिवसेना ठाकरे गटाचे नेते आणि मराठी अभिनेता किरण मानेने एक भलीमोठी पोस्ट इन्स्टाग्रामवर शेअर केलेली आहे. शेअर केलेल्या पोस्टमध्ये अभिनेत्याने गावकऱ्यांच्या मागणीचे कौतुक केले आहे.

  • By चेतन बोडके
Updated On: Dec 03, 2024 | 03:47 PM
"मारकडवाडीकरांनी क्रांतीची तुतारी फुंकत बंडाची पहिली मशाल पेटवली", मराठमोळ्या अभिनेत्याची पोस्ट चर्चेत...

"मारकडवाडीकरांनी क्रांतीची तुतारी फुंकत बंडाची पहिली मशाल पेटवली", मराठमोळ्या अभिनेत्याची पोस्ट चर्चेत...

Follow Us
Close
Follow Us:

विधानसभा निवडणुकीत माळशिरस तालुक्यातील मारकडवाडी येथील ग्रामस्थांनी गावातच बॅलेट पेपरवर मतदान घेण्याची तयारी केली. २० नोव्हेंबर २०२४ रोजी झालेल्या मतदान प्रक्रियेत या गावाने केलेल्या मतदानात आणि लागलेल्या निकालात तफावत आढळून आल्याचा आरोप गावकऱ्यांकडून करण्यात येत आहे. त्यासाठी गावकऱ्यांनी पुन्हा एकदा मतदान प्रक्रिया राबवण्याची संपूर्ण तयारीही केली होती. आज सकाळी मतदान प्रक्रियेला सुरूवात होणार, त्यापूर्वीच गावात पोलीस प्रशासन दाखल झाले, गावात जमावबंदी लागू करण्यात आली.

मारकडवाडीच्या समर्थनार्थ शिवसेना ठाकरे गटाचे नेते आणि मराठी अभिनेता किरण मानेने एक भलीमोठी पोस्ट इन्स्टाग्रामवर शेअर केलेली आहे. या शेअर केलेल्या पोस्टमध्ये अभिनेत्याने गावकऱ्यांच्या मागणीचे कौतुक केले आहे.

शेअर केलेल्या पोस्टमध्ये किरण मानेने लिहिले की, “मारकडवाडीच्या ग्रामस्थांना सलाम! हुकूमशाही भित्री असते. बुळगी असते. फक्त तिच्यावर चाल करुन जायला असे निधड्या छातीचे, ताठ कण्याचे, सत्यवचनी बाण्याचे लोकशाहीचे खंदे सुपूत्र लागतात. भले ते हुकूमशहांच्या ‘सो कॉल्ड’ महाशक्तीपुढे संख्येनं कमी असतील… पण ते या शैतानाच्या टोळीला घाम फोडू शकतात. ‘आमच्या गांवातनं भाजपाला ऐंशी टक्के मतदान होऊच शकत नाही. इव्हीएम मशिनमध्ये काहीतरी गडबड असल्याचा संशय आहे. भलेही आमचा उमेदवार जिंकूदेत… पण आमच्या गांवातनं त्याला कमी झालेले मतदान हा आमच्या खुद्दारीवर लागलेला कलंक आहे.. आमचे गांव गद्दारी करणार नाही आणि गद्दारांना साथ देणार नाही.’ ही अस्वस्थता त्यांचं मन खाऊ लागली… शेवटी सगळ्या गांवानं ठरवलं की आपल्यापुरतं बॅलेट पेपरवर मतदान घेऊया. किमान आपल्या काळजाला लागलेली टोचणी तरी थांबेल.’ “ “मतदानाची तारीख पक्की झाली : तीन डिसेंबर आणि काल अचानक पाच डिसेंबरपर्यंत मारकडवाडीवर जमावबंदीचा आदेश लादला गेला आहे. मराठा मोर्चावर झालेला लाठीचार्जासारखं बातम्यात ‘प्रशासन-प्रशासन’ असं म्हणायचे आदेश आले असावेत. पण प्रशासनाला कुणाचे आदेश जातात हे पब्लिकला कळतं. तरीही ग्रामस्थांनी निर्धार केला आहे, “लाठीचार्ज सहन करू, गोळ्या झेलू… पण मतदान होणारच!” ही खरी छ. शिवरायांच्या आणि शाहु फुले आंबेडकरांच्या विचारांची भुमी ! इतिहासातनं प्रेरणा घ्यायची असते ती अशी. अहो, औरंगजेब सुद्धा महाशक्ती होता. जगातल्या पाच महाबलाढ्य बादशहांपैकी एक. अफगाणिस्तानपासून आसामपर्यंत त्याची सत्ता होती. शिवरायांकडचे अनेक सरदार, सरंजामदार, वतनदार ईडीला घाबरुन पळाल्यागत औरंगजेबाला सामील झाले होते. महाराष्ट्राची माती त्याला विकायची सगळी तजवीज त्या गद्दारांनी केली होती… पण अशाच लढवय्या वृत्तीच्या मुठभर मावळ्यांना सोबत घेउन छ. शिवराय आणि शंभुराजे पितापुत्रांनी औरंग्याला तब्बल अठ्ठावीस वर्ष झुंजवलं होतं. शेवटी त्याची कबर या महाराष्ट्रात खणावी लागली ! मारकडवाडीकरांनी क्रांतीची तुतारी फुंकत बंडाची पहिली मशाल पेटवली आहे. त्यांच्या उद्याच्या पिढ्या अभिमानानं सांगतील की लोकशाहीची हत्या होत असताना मारकडवाडी गांवानं आपलं इमान आणि सत्त्व जागं ठेवलं होतं.”

Web Title: Kiran mane shared markadwadi supporting social media post

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Dec 03, 2024 | 03:47 PM

Topics:  

  • Kiran Mane

संबंधित बातम्या

“अनाजीपंता, कितीबी आग लाव…” ठाकरे बंधूंच्या विजयी मेळाव्यानंतर किरण मानेंची पोस्ट
1

“अनाजीपंता, कितीबी आग लाव…” ठाकरे बंधूंच्या विजयी मेळाव्यानंतर किरण मानेंची पोस्ट

शरद उपाध्ये- निलेश साबळे वादावर किरण मानेंची पोस्ट; म्हणाला, “टीकाकारांना उंच कोलून टाक आणि म्हण…”
2

शरद उपाध्ये- निलेश साबळे वादावर किरण मानेंची पोस्ट; म्हणाला, “टीकाकारांना उंच कोलून टाक आणि म्हण…”

‘ऑपरेशन सिंदूर’नंतर किरण मानेची इन्स्टाग्राम पोस्ट व्हायरल, पोस्ट शेअर करत भारतीय लष्कराचे केले अभिनंदन
3

‘ऑपरेशन सिंदूर’नंतर किरण मानेची इन्स्टाग्राम पोस्ट व्हायरल, पोस्ट शेअर करत भारतीय लष्कराचे केले अभिनंदन

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.