Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • रवि, 20 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • asian games 2026 |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • IND vs AFG
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

केके यांनी गायलेलं शेवटचं मराठी गाणं पुण्यतिथीच्या दिवशी रिलीज, ‘एकांत हवा’ गाण्यामुळे चाहते झाले भावूक

मराठीत केके यांनी अवघी दोन गाणी गायली आहेत. त्यातं पहिलं 8 वर्षांपूर्वी 2014मध्ये आलं होतं. तर दुसरं गाणं थेट आत्ता ‘अंब्रेला’ चित्रपटाच्या माध्यमातून प्रेक्षकांच्या भेटीला आलं आहे. आज 31 मे रोजी केके यांची पुण्यतिथी आहे. यानिमित्ताने ‘अंब्रेला’च्या टीमकडून लाडक्या केकेंना ही एक श्रद्धांजलीच ठरावी!

  • By साधना
Updated On: May 31, 2023 | 12:55 PM
केके यांनी गायलेलं शेवटचं मराठी गाणं पुण्यतिथीच्या दिवशी रिलीज, ‘एकांत हवा’ गाण्यामुळे चाहते झाले भावूक
Follow Us
Follow Us:

गायक केके (Singer KK) अर्थात कृष्णकुमार कुन्नथ यांच्या गाण्यांची जादू काय असते, हे आजच्या पिढीला माहीत आहे. त्यांच्या निधनानंतर अवघ्या देशभरातून शोक व्यक्त करण्यात आला होता. मात्र, केके यांनी देशातील इतर अनेक भाषांसोबतत मराठी भाषेतही गाणं गायलं होतं, ही बाब फार थोड्या लोकांना माहिती असावी. मराठी सिनेरसिकांसाठी केकेच्या गाण्याचं सरप्राईज घेऊन येत्या 9 जून रोजी भेटीला येतोय आजच्या पिढीचा ‘अंब्रेला’ (Umbrella) चित्रपट. केके यांनी गायलेलं शेवटचं गाणं (KK Last Song) ‘एकांत हवा’ नुकतंच रिलीज करण्यात आलं आहे. (Singer KK Death Anniversary)

देशातल्या जवळपास 9 भाषांमध्ये केके यांनी गायन केलं. त्यात हिंदी तर अर्थात आहेच. पण त्यासोबतच, तमिळ, तेलुगु, मल्याळम, आसामी, ओरिया अशा भाषांचा समावेश आहे. आता मराठी भाषेचाही या यादीत समावेश झाला आहे. मराठीत केके यांनी अवघी दोन गाणी गायली आहेत. त्यातं पहिलं 8 वर्षांपूर्वी 2014मध्ये आलं होतं. तर दुसरं गाणं थेट आत्ता ‘अंब्रेला’ चित्रपटाच्या माध्यमातून प्रेक्षकांच्या भेटीला आलं आहे. आज 31 मे रोजी केके यांची पुण्यतिथी आहे. यानिमित्ताने ‘अंब्रेला’च्या टीमकडून लाडक्या केकेंना ही एक श्रद्धांजलीच ठरावी!

‘माचिस’मधल्या छोड आए हम किंवा ‘हम दिल दे चुके सनम’मधल्या तडप तडप के या गाण्यांमधून आपल्याला भेटलेल्या केकेंहून ‘अंब्रेला’मधून आपल्याला भेटणारे केके फार वेगळे आहेत. त्यांच्या आवाजातल्या ‘एकांत हवा’ गण्यातून तरुणाईच्या मनातला उद्वेग अगदी थेट काळजापर्यंत जाऊन भिडतो. चित्रपटाच्या कथानकाला केके यांच्या आवाजातल्या गाण्यामुळे वेगळीच ताकद मिळाली आहे. मराठी भाषेतलं केके यांनी गायलेलं हे गाणं प्रत्यक्ष चित्रपटाचा भाग म्हणून प्रदर्शित होणारं पहिलं गाणं ठरलं आहे. त्यामुळेच ते एकमेवाद्वितीय ठरलं आहे!

अभिनेता अभिषेक सेठीया आणि अभिनेत्री हेमल इंगळे यांच्यातल्या प्रेमाची केमिस्ट्री प्रेक्षकांना चित्रपटात पाहायला मिळणार आहेच. पण अरुण नलावडे आणि सुहिता थत्ते यांच्या कसदार अभिनयाची मेजवानीही प्रेक्षकांना चित्रपटाचा पुरेपूर आनंद देणारी ठरेल. चित्रपटाची निर्मिती, दिग्दर्शन, संवाद आणि पटकथा लेखन मनोज विशेंनी केलं आहे. स्वरनादची प्रस्तुत या चित्रपटाची गाणी मंगेश कंगणे यांनी लिहिली असून ती संतोष मुळेकर यांनी संगीतबद्ध केली आहेत.

Web Title: Kk last song released on his death anniversary nrsr

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: May 31, 2023 | 12:52 PM

Topics:  

  • Singer KK

संबंधित बातम्या

Kishor Kumar Song Ban : 01 वर्षे सरकारी माध्यमांवर बंदी करण्यात आली होती गाणी ? कोण होता तो गायक , कोणत्या गायकाची गाणी होती बंद
1

Kishor Kumar Song Ban : 01 वर्षे सरकारी माध्यमांवर बंदी करण्यात आली होती गाणी ? कोण होता तो गायक , कोणत्या गायकाची गाणी होती बंद

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.