क्रिती सेनन लवकरच अडकणार विवाहबंधनात? लग्नापूर्वीच गेली सासू-सासऱ्यांना भेटायला, Video Viral
कायमच अभिनय आणि आपल्या सौंदर्यामुळे चाहत्यांमध्ये चर्चेत राहणारी क्रिती सेनन सध्या तिच्या खासगी आयुष्यामुळे चर्चेत आली आहे. गेल्या अनेक महिन्यांपासून अभिनेत्रीच्या बिझनेसमन कबीर बहियासोबतच्या अफेअरच्या चर्चा सुरु आहेत. पण अद्यापही, ना क्रितीकडून किंवा कबीरकडून कधीही त्यांच्या नात्याबद्दल अधिकृत रित्या अद्याप भाष्य करण्यात आलेलं नाही. पण, ते अनेकदा एकत्र स्पॉट झालेलेही आहेत. कौटुंबिक कार्यक्रमांपासून ते पार्ट्यांपर्यंत, दोघेही एकत्र एन्जॉय करताना दिसलेही आहेत. अशातच आता दोघेही लवकरच लग्नबंधनात करणार असल्याच्या चर्चांना उधाण आलंय.
वादग्रस्त टिप्पणीनंतर अपूर्वा मखीजाला जबरदस्त धक्का, IIFA च्या Ambassador च्या यादीतून नाव वगळले
पिंकव्हिलाच्या वृत्तानुसार, दोघेही आपआपल्या कुटुंबीयांना भेटण्यासाठी दिल्लीला गेले आहेत. कृती आणि कबीरला अलीकडेच पापाराझींच्या कॅमेऱ्यात एअरपोर्टवर एकत्र स्पॉट करण्यात आले आहेत. यावेळी, कृतीने मास्क घातला होता. त्यासोबतच ब्लॅक गॉगल आणि टोपी घातली होती. शिवाय, डेनिम जीन्स आणि काळ्या जॅकेटने तिचा लूक पूर्ण केला होता. कबीर बहिया देखील पूर्णपणे काळ्या लूकमध्ये दिसला. त्यांच्या लग्नाच्या बातम्यांदरम्यान ते त्यांच्या पालकांना भेटायला गेल्याच्या चर्चा सुरू आहेत. २०२५ च्या अखेरीस दोघेही लग्न करणार असल्याचं सांगण्यात येतंय.
अलीकडेच, क्रिती आणि कबीर बेंगळुरूमध्ये एका लग्नात एकत्र स्पॉट झाले होते. दोघांचाही एक व्हिडिओ समोर आला होता. यामध्ये दोघेही रंगीत पोशाखात दिसले. ते लग्नाच आनंद घेताना दिसले. अलीकडेच क्रिती आणि कबीर बाहिया मुंबईतील एका रेस्टॉरंटबाहेर दिसले. नंतर दोघेही एकाच गाडीतून जाताना दिसले. कबीर बहिया हे युकेमधील एक व्यावसायिक असल्याची माहिती आहे. कृती आणि कबीरच्या अफेअरच्या बातम्या तेव्हा येऊ लागल्या जेव्हा ते दोघेही अभिनेत्रीच्या वाढदिवसाला ग्रीसला गेले होते. तिथून दोघांचेही फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाले.
‘छावा’ पाहण्यासाठी विकेंडला प्रेक्षकांची थिएटरमध्ये गर्दी; सलग दुसऱ्या दिवशीही रेकॉर्डब्रेक कमाई