स्वर कोकिळा लता मंगेशकर (Lata Mangeshkar) आता आपल्यात नाहीत पण त्यांचा आवाज, अविस्मरणीय गाणी आणि आठवणी कायम आपल्यासोबत राहतील. अलीकडेच, लता मंगेशकर यांची धाकटी बहीण आशा भोसले (Asha Bhosle) यांनीही त्यांच्याशी संबंधित एक अतिशय सुंदर आठवण सोशल मीडियावर चाहत्यांसोबत शेअर केली आहे. आशा भोसले यांनी लतादीदींच्या आठवणीत लता मंगेशकर यांच्यासोबतचा त्यांचा लहानपणापासूनचा एक न पाहिलेला थ्रोबॅक फोटो शेअर (Throwback Photo Sharing) करून एक अतिशय भावनिक नोट शेअर केली आहे.
आशा भोसले यांनी शेअर केलेला बालपणीचा (Childhood) फोटो हा कृष्णधवल फोटो आहे. यामध्ये आशा भोसले आणि लता मंगेशकर दोघीही कॅमेऱ्याकडे बघत पोझ देताना दिसत आहेत. दोघींच्याही चेहऱ्यावरचा निरागसपणा दिसतो. या मिलियन डॉलर फोटोसोबत आपल्या बालपणीच्या दिवसांची आठवण करून देत आशा भोसले यांनी कॅप्शनमध्ये लिहिले, “काय होते बालपणीचे दिवस. मी आणि दीदी.” या कॅप्शनसोबत त्यांनी हार्ट इमोजीही सोबत दिला आहे.
[read_also content=”लता मंगेशकर यांनी शेवटचं गायलं ‘हे’ गाणं, विशाल भारद्वाजने शेअर केले न रिलीज झालेले गाणे https://www.navarashtra.com/movies/lata-mangeshkar-last-unreleased-song-and-released-film-song-album-nrvb-233439.html”]
आशा भोसले यांच्या लता मंगेशकर यांच्यासोबत असलेल्या बालपणीच्या या फोटोवर चाहत्यांसह सेलेब्स प्रेमाचा वर्षाव करत आहेत आणि त्यांना या कठीण क्षणी खंबीर राहण्याचा सल्ला देत आहेत. हृतिक रोशनने फोटोवर कमेंटमध्ये हार्ट इमोजी शेअर केला आहे. सिद्धांत कपूरने लिहिले, “लव्ह यू आजी.”
[read_also content=”हिंदी चित्रपटसृष्टीत प्रवेश करताना लता दिदींचे बदलण्यात आले नाव!; लता दीदींचे खरे नाव दुसरेच https://www.navarashtra.com/movies/lata-didis-name-was-changed-while-entering-hindi-cinemalata-didis-real-name-is-another-nrvb-233721.html”]
युजर्स देखील सर्वांचा आवडता आवाज गानकोकिळेच्या आठवण काढत आहेत. एका यूजरने लिहिले की, “आम्ही सर्व तुमच्यासोबत आहोत मॅडम. लताजी आमच्या हृदयात आहेत आणि नेहमीच राहतील.”
दुसर्या युजरने लिहिले, “आठवणी… त्या फक्त सोबत राहतात… सुंदर चित्र.”