प्रसिद्ध वॉईस ओव्हर आर्टिस्टचं निधन, लोकप्रिय कार्टून कॅरेक्टरला दिला होता आवाज
हॉलिवूड इंडस्ट्रीतून एक दु:खद बातमी समोर येत आहे. जगभरामध्ये ॲनिमेशन कार्टूनची क्रेझ फार जास्त आहे. ॲनिमेशन इंडस्ट्रीतील एका प्रसिद्ध कलाकाराचं निधन झालं आहे. Dragon Ball Z जपानीज ॲनिमेशन कार्टून तुम्हाला ठाऊक असेल, त्या कार्टूनमधील एका पात्राला आवाज देणाऱ्या कलाकाराचे निधन झाले आहे. वॉईस ओव्हर आर्टिस्ट डॉक हॅरिस यांचं (Doc Harris) निधन झालं आहे. डॉक हॅरिस यांचं वयाच्या ७६ व्या वर्षी प्राणज्योत मालवली आहे.
डॉक हॅरिस यांनी Dragon Ball Z जपानीज ॲनिमेशन कार्टूनमध्ये इंग्रजी आवृत्तीमध्ये आपला आवाज दिला होता. Dragon Ball Z जपानीज ॲनिमेशन कार्टूनचे अनेक भाषांमध्ये रिलीज झाले होते. नेमकं त्यांचं निधन कशामुळे झालं आहे, याबद्दलचे वृत्त कळू शकलेलं आहे. डॉक हॅरिस यांचं खरं नाव वेगळं आहे. गिल्बर्ट औचिनलेक असं आहे. त्यांनी १९९६ ते २००३ मधील अनेक लोकप्रिय ॲनिमेशन कार्टून सीरीजमध्ये २०० हून अधिक एपिसोडला आवाज दिला आहे.
डॉक हॅरिस यांचं निधन ५ ऑक्टोबर २०२४ ला झालेले आहे. त्याच्या निधनाचे वृत्त कळताच जगभरातील चाहत्यांनी त्यांना श्रद्धांजली वाहिली आहे. हॅरिस हे कॅनेडियन रेडिओमधील त्याच्या दीर्घ कारकीर्दीसाठी देखील ओळखले जाते, त्याच्या फिल्मी करियरची सुरुवात १९७१ मध्ये झाली १९७६ मध्ये त्याने स्वत:चं नाव बदलून डॉक हॅरिस असे ठेवले. कॉर्केट, ज्याने १९९६ ते १९९७ मध्ये ड्रॅगन बॉल झेडमध्ये गोकूचा इंग्रजी आवाज दिला. IMDb नुसार, हॅरिस माय लिटल पोनी: फ्रेंडशिप इज मॅजिक आणि नीड फॉर स्पीडः हॉट पर्सुइट 2 सारख्या व्हिडीओ गेम्समध्ये देखील दिसला आहे.