(फोटो सौजन्य- सोशल मीडिया)
2024 च्या शेवटच्या तीन महिन्यांत काही मोठे चित्रपट प्रदर्शित होणार आहेत, ज्याबद्दल सोशल मीडियावर जोरदार चर्चा सुरू आहे. यामध्ये ‘सिंघम अगेन’ आणि ‘भूल भुलैया 3’ची नावे आघाडीवर आहेत, जी या दिवाळीत धमाका करण्यास सज्ज आहेत. यानंतर ‘पुष्पा: द रुल’चा धमाका होणार आहे, ज्याबाबत निर्मात्यांनी एक अपडेट शेअर केला आहे. हा चित्रपट देखील दिवाळीनंतर लगेचच प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहे.
अल्लू अर्जुन स्टारर ‘पुष्पा 2’ हा या वर्षातील बहुप्रतिक्षित चित्रपटांपैकी एक आहे. चित्रपट प्रदर्शित होण्यास अजून वेळ आहे, मात्र जसजसे दिवस पुढे जात आहेत तसतशी लोकांची या चित्रपटाबद्दलची क्रेझही वाढत आहे. पुष्पा 2 चित्रपटातील गाणी यापूर्वीच प्रदर्शित झाली आहेत. हा चित्रपट डिसेंबरमध्ये प्रदर्शित होणार आहे. दरम्यान, निर्मात्यांनी सांगितले की, चित्रपटाचा पूर्वार्ध पूर्ण झाला आहे. यासोबतच पुष्पा 2 चे नवीन पोस्टर देखील शेअर करण्यात आले आहे.
‘पुष्पा 2’चे नवीन पोस्टर समोर आले आहे
‘पुष्पा: द रुल’ हा चित्रपट याच वर्षी ऑगस्टमध्ये रिलीज होणार होता. मात्र कथेचे काम बाकी असल्याने तारीख पुढे ढकलण्यात आली. हा चित्रपट आता ६ डिसेंबरला प्रदर्शित होणार आहे. पुष्पा 2 चित्रपटगृहात येण्यासाठी 100 पेक्षा कमी दिवस शिल्लक आहेत. दरम्यान, अल्लू अर्जुनचे नवीन पोस्टर शेअर करताना निर्मात्यांनी कॅप्शनमध्ये लिहिले की, ‘पुष्पा 2: द रुल’चा पहिला भाग लॉक, लोड आणि फायरने भरलेला आहे. पुष्पा भारतीय बॉक्स ऑफिसवर तुफान नाव कमावणार असल्याने इतिहास घडवताना पाहण्यासाठी सज्ज व्हा. यामुळे भारतीय चित्रपटसृष्टीत एक नवा अध्याय लिहिला जाणार आहे. हा चित्रपट 6 डिसेंबरपासून चित्रपटगृहात दाखल होणार आहे.
The first half of #Pushpa2TheRule is locked, loaded, and packed with fire 🔥
Get ready to witness history in the making as Pushpa will take the Indian box office by storm 💥💥
He will ignite a new chapter in Indian Cinema ❤️🔥
THE RULE IN CINEMAS on 6th DEC 2024.
Icon Star… pic.twitter.com/Ad81Uk8Ymh
— Pushpa (@PushpaMovie) October 8, 2024
या पोस्टरमध्ये अल्लू अर्जुन डोंगरावर उभा असलेला दिसत आहे. तो जिथे उभा आहे तिथून थोड्या अंतरावर एक कुत्राही आहे. त्याचवेळी पोस्टरमध्ये अभिनेता अल्लू अर्जुनसमोर आग दिसत आहे.
हे देखील वाचा- Gaarud Movie : गूढ, रहस्यमयी स्वप्नांचा शोध कोणकोणते कलाकार घेणार ? ‘गारुड’चा नवीन मोशन पोस्टर रिलीज
छावा चित्रपटाला देणार टक्कर
अल्लू अर्जुनचा ‘पुष्पा 2’ विकी कौशलच्या ‘छावा’सोबत चित्रपटगृहात प्रदर्शित होणार आहे. तसेच हे दोन्ही चित्रपट एकमेकांना चित्रपटगृहात टक्कर देणार आहे. परंतु चाहत्यांना हे चित्रपट पाहण्याची उत्सुकता लागली आहे.