Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • वर्ल्ड
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • वेब स्टोरीज
    • व्हायरल
    • करिअर
    • धर्म
    • टेक
    • ऑटो
    • फोटो
    • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Ganesh Chaturthi 2025 |
  • Bihar Election 2025 |
  • Shravan 2025 |
  • Today's Gold Rate |
  • Ind vs Eng
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

सोशल मीडियावरचे प्रेम, पण खऱ्या प्रेमाचे मात्र ब्रेकअप; ‘लेट्स मीट’मधून उलगडणार कोडं

नातेसंबंधावर आधारित इंटरनेट आणि सोशल मीडियाच्या माध्यमातून प्रेमाची सुंदर कथा सांगणारे 'लेट्स मीट' या चित्रपटाचे पोस्टर लाँच करण्यात आले आहे.

  • By चेतन बोडके
Updated On: Jan 08, 2025 | 06:18 PM
सोशल मीडियावरचे प्रेम, पण खऱ्या प्रेमाचे मात्र ब्रेकअप; 'लेट्स मीट'मधून उलगडणार कोडं

सोशल मीडियावरचे प्रेम, पण खऱ्या प्रेमाचे मात्र ब्रेकअप; 'लेट्स मीट'मधून उलगडणार कोडं

Follow Us
Close
Follow Us:

इंटरनेटच्या युगात सोशल मीडियाचा ट्रेंड वाढल्याने मानवी नातेसंबंधांच्या व्याख्याच बदलल्या आहेत. इंटरनेटमुळे नवीन नाती जुळत आहेत तर कधी कधी जुनी नाती तुटत आहेत. ह्या नातेसंबंधावर आधारित इंटरनेट आणि सोशल मीडियाच्या माध्यमातून प्रेमाची सुंदर कथा सांगणारे ‘लेट्स मीट’ या चित्रपटाचे पोस्टर लाँच करण्यात आले आहे.

२०२३ मध्ये प्रदर्शित झालेल्या संजय मिश्रा यांच्या ‘गुठली लड्डू’ या चित्रपटाच्या निर्मात्यांनी UV फिल्म्सच्या बॅनरखाली निर्मित ‘लेट्स मीट’ या चित्रपटात आधुनिक युगातील तरुण- तरुणींची सोशल मीडियावर फुलणाऱ्या प्रेमाची कहाणी दाखवण्यात आली आहे. ह्या व्हर्च्युअल दुनियेत फुलणाऱ्या या नात्याला खऱ्या जगाच्या गुंतागुंतीचा सामना करण्याची हिंमत आहे की नाही? हे नाते व्हर्च्युअल जगात आहे तितकेच खऱ्या जगातही प्रेमळ राहील का? या गुंतागुंतीच्या पण महत्त्वाच्या प्रश्नांची उत्तरे लेट्स मीट ह्या चित्रपटात पाहायला मिळणार आहेत.

‘तारक मेहता का…’ फेम गुरुचरण सिंग रुग्णालयात दाखल, व्हिडिओ शेअर करत केला खुलासा

चित्रपटाच्या पोस्टर मध्ये अभिनेता निखिल (तनुज विरवानी) आणि रिया हे दोघेही त्यांच्या घराच्या खिडकीत उभे आहेत आणि बाहेरील जग पाहत आहेत. त्यांचे चेहरे दाखवले गेले नाही आहेत. मुलीच्या खोलीचा रंग निळा आणि मुलाच्या खोलीचा रंग गुलाबी आहे. पोस्टरमध्ये मागून नायक-नायिकेचे चित्रण चित्रपटाचे शीर्षक आणि संकल्पना अतिशय चांगल्या प्रकारे परिभाषित केली आहे. जे लोक त्यांचे चेहरे उघड न करता सोशल मीडियासारख्या आभासी जगात त्यांच्या भावना कशा प्रकारे व्यक्त करतात हे दाखवण्याचा प्रयत्न करत आहे.

चित्रपटाचे निर्माते प्रदीप रंगवानी आणि दिग्दर्शक रवींद्र संधू म्हणाले, “इंटरनेट आणि सोशल मीडियामुळे कधी न बोलणाऱ्या व्यक्तींना वाचा फुटली आहे. आपले मत विचार मांडताना बाचकणारे लोक बेधडक बोलताना दिसत आहेत. सोशल मीडियाने त्यांना आत्मविश्वास दिला आहे. ‘लेट्स मीट’ हा चित्रपट आजच्या पिढीला दर्शवत आहे. ज्यात ऑनलाइन प्रेमाच्या समस्येवर उपाय शोधण्याचा प्रयत्न आहे. सोशल मीडियाच्या माध्यमातून प्रेमात पडणे ही आजच्या काळातील वास्तविकता आहे आणि हे सत्य आम्ही आमच्या चित्रपटात नाटकीय आणि मनोरंजक शैलीत दाखवण्याचा प्रयत्न केला आहे.

सरकार आणि सानिकाच्या प्रेमाला सर्वेशचं ग्रहण? दोघांमध्ये खेळणार मोठा डाव

चित्रपटाचे निर्माते प्रदीप रंगवानी हे आउट ऑफ द बॉक्स चित्रपट बनवण्यासाठी ओळखले जातात. प्रदीप रंगवानी यांनी शिक्षणाच्या महत्त्वावर आधारित ‘गुठली लड्डू’ हा चित्रपट बनवून प्रेक्षकांची मने जिंकली आहेत. प्रसिद्ध आणि अनुभवी अभिनेता संजय मिश्रा अभिनीत ‘गुठली लड्डू’ या चित्रपटाचे फिल्म रिव्यू करणाऱ्यांनी देखील स्तुती केली आहे.

यूव्ही फिल्म्स आणि प्रदीप रंगवानी प्रस्तुत ‘लेट्स मीट’ चे दिग्दर्शन रवींद्र संधू (रिकी) यांनी केले आहे आणि प्रदीप रंगवानी निर्मित आहेत. अनिल बी अक्की यांनी चित्रपटाची कथा लिहिली असून चित्रपटाचा स्क्रीनप्ले आणि डायलॉग रवींद्र संधू (रिकी) यांनी लिहिले आहेत. चित्रपटाचे संगीत प्रिनी सिद्धांत माधव आणि रोहन & रोहन यांनी दिले आहे आणि नवीन त्यागी यांचे गीत प्रसिद्ध गायक जावेद अली, नकाश अझीझ आणि रोहन प्रधान यांच्या मधुर आवाजाने सजले आहेत. चित्रपटाचे सिनेमॅटोग्राफर अनिल बी अक्की आहेत. मेकर्स ने सांगितले की, चित्रपटाचे संपूर्ण शूटिंग मुंबईत झाले आहे. 07 फेब्रुवारी रोजी हा चित्रपट हिंदी भाषेतील चित्रपटगृहांमध्ये प्रदर्शित होणार आहे.

शेवटी तो बापच… आमिर खानने लेक जुनैदचा ‘लव्हयापा’ चित्रपट सुपरहिट होण्यासाठी केला नवस

Web Title: Lets meet motion poster out now film set to release on 7 feb 2025

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jan 08, 2025 | 06:18 PM

Topics:  

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.