‘तारक मेहता का…’ फेम गुरुचरण सिंग रुग्णालयात दाखल, व्हिडिओ शेअर करत केला खुलासा
‘तारक मेहता का उल्टा’ मालिका गेल्या १५ वर्षांपेक्षा अधिक काळापासून प्रेक्षकांचे निखळ मनोरंजन करीत आहे. मालिकेमुळे मालिकेतील कलाकारांनाही मोठ्या प्रमाणावर प्रसिद्धी मिळाली आहे. अशातच मालिकेमध्ये गुरूचरण सिंह सोढीचं पात्र साकारणारा अभिनेता गुरुचरण सिंग सध्या चर्चेत आला आहे. अभिनेता रुग्णालयात दाखल झाला असून त्याने मंगळवारी व्हिडिओ शेअर करत चाहत्यांना माहिती दिली आहे.
सरकार आणि सानिकाच्या प्रेमाला सर्वेशचं ग्रहण? दोघांमध्ये खेळणार मोठा डाव
गुरुचरण सिंगने शेअर केलेल्या व्हिडिओमध्ये त्याच्या हाताला सलाईन लावलेली दिसत आहे. हॉस्पिटलमधूनच अभिनेत्याने एक व्हिडिओ शेअर केलेला आहे. शेअर केलेल्या व्हिडिओमध्ये तो म्हणतो की, “माझी तब्येत खूपच खराब झाली आहे. डॉक्टरांनी सांगितलेल्या अनेक तपासण्या केल्या आहेत. लवकरच मी तुम्हाला हेल्थ अपडेट देईन.” व्हिडिओ शेअर करताना कॅप्शनमध्ये लिहिले की, “काल गुरुपूरबच्या दिवशी, गुरु साहेबांनी मला नवं जीवन दिलं. मी त्यांचे अनेक वेळा आभार मानतो. आपणा सर्वांनाही धन्यवाद, गुरु साहेबांच्या कृपेने आज मी जिवंत आहे. सर्वांना दिल से नमस्कार आणि धन्यवाद.”
एप्रिल २०२४ मध्ये, अभिनेता कमालीचा चर्चेत आला होता. अभिनेता २५ दिवस बेपत्ता होता. अभिनेता दिल्लीतील त्याच्या घरातून एका मिटिंगसाठी बाहेर पडला होता आणि बराच वेळ परतलाच नव्हता. त्या २५ दिवसांत अभिनेत्याने गुरूद्वारेत सेवा करण्यासाठी आणि आध्यात्मिक प्रवासासाठी गेलो असं त्याने स्वत: सांगितले होते. अभिनेत्याने घर सोडून जाण्याचे कारण सांगितले होते. अभिनेत्याने त्याच्यावर १ ते १.५ कोटींचे कर्ज झाले होते असे सांगितले होते. या तणावामुळे त्याने एका महिन्यापेक्षा जास्त काळापासून त्याने जेवण सोडले होते. त्याने याकाळात फक्त लिक्विड डाएट घेतला होता असे सांगितलं.
कर्जाच्या टेंशनमुळे अभिनेता दूध, चहा आणि नारळपाणी इतकंच प्यायचा. कोणत्याही गोष्टीत अपयशच मिळत असल्यामुळे तो पूर्णपणे खचून गेला होता. “गेल्या चार वर्षांत मी फक्त अपयशच पाहिलं आहे. मी वेगवेगळ्या गोष्टी करण्याचा प्रयत्न केला, व्यवसाय करण्याचा प्रयत्न केला पण मला कशातच यश मिळालं नाही. आता मी थकलो आहे आणि आता मला पैसे कमवायचे आहेत,” असं गुरुचरण सिंग एका मुलाखतीत म्हणाला होता.
शेवटी तो बापच… आमिर खानने लेक जुनैदचा ‘लव्हयापा’ चित्रपट सुपरहिट होण्यासाठी केला नवस