Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • bigg boss marathi 6 |
  • IPL 2026 |
  • Marathi News |
  • TCS Nashik Case |
  • US-Israel Iran War
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

बलात्कार प्रकरणी अभिनेता विजय बाबूसाठी लूकआऊट नोटीस जारी, परदेशात राहिल्यास इंटरपोलची घेतली जाणार मदत

एका अभिनेत्रीने दाखल केलेल्या तक्रारीवरून (Sexual Assault Case) एर्नाकुलम दक्षिण पोलिसांनी २२ एप्रिल रोजी विजय बाबूविरुद्ध (Vijay Babu) गुन्हा दाखल (Crime) केला होता. त्यानंतर २६ एप्रिलच्या रात्री विजय बाबूने फेसबुक लाईव्हद्वारे त्याच्यावरील आरोपांबाबत प्रतिक्रिया दिली आणि या प्रकरणात तोच पीडित असल्याचं म्हटलं होतं. या लाईव्हदरम्यान त्याने पीडितेचं नावंही सांगितलं होतं.

  • By साधना
Updated On: Apr 28, 2022 | 03:17 PM
vijay-babu

vijay-babu

Follow Us
Close
Follow Us:

मल्याळम अभिनेता-निर्माता विजय बाबूसाठी (Vijay Babu) कोची शहर पोलिसांनी (Kochi Police) लूकआऊट नोटीस (Lookout notice) जारी करण्यात आली आहे. विजयवर एका चित्रपटाच्या अभिनेत्रीने बलात्काराचा  (Sexual Assault Case)आरोप केला आहे. डीसीपी यूव्ही कुरियाकोसे यांनी यापूर्वी सांगितलं होतं की आरोपांनंतर विजय फरार होता आणि त्याच्यावर दोन गुन्हे दाखल करण्यात आले होते. मात्र आता विजय बाबूने आपण फरार नसून दुबईत असल्याचा दावा केला आहे. कडवंथरा इथल्या नक्षत्र हॉटेल आणि अभिनेत्याच्या अपार्टमेंटवरही पोलिसांनी छापा टाकला आहे. या प्रकरणातील महत्त्वाचे पुरावे पोलिसांनी जप्त केले आहेत. विजय भारतात परत येताच त्याला अटक करण्यात येईल. जर तो दीर्घकाळ परदेशात राहिल्यास त्याच्या अटकेसाठी इंटरपोलची (Interpol) मदत घेतली जाणार आहे.

[read_also content=”ग्रामीण भागात मोकाट कुत्र्यांचा हैदोस ! १४८० जणांना घेतला चावा, १९९ जणांवर सर्वोपचारमध्ये उपचार https://www.navarashtra.com/maharashtra/mokat-dog-haidos-in-rural-areas-1480-people-were-bitten-199-were-treated-in-general-nraa-274009.html”]

गुन्हा दाखल झाल्यानंतर आपण काहीही चुकीचं केलं नसल्याचं सांगत विजयने सर्व आरोप फेटाळून लावले होते. इतकंच नव्हे तर संबंधित अभिनेत्रीविरोधात मानहानीचा खटला दाखल करणार असल्याचंही त्याने स्पष्ट केलं. “मी काहीही चुकीचं केलेलं नाही. मी पीडित आहे. या देशाचा कायदा तिला संरक्षण देतोय आणि मी त्रास सहन करत असताना ती आरामात आहे. तिला इतक्या सहजासहजी सुटू देणार नाही”, असं तो फेसबुक लाईव्हदरम्यान म्हणाला होता.

अभिनेत्रीने दाखल केलेल्या तक्रारीवरून एर्नाकुलम दक्षिण पोलिसांनी २२ एप्रिल रोजी विजय बाबूविरुद्ध गुन्हा दाखल केला होता. त्यानंतर २६ एप्रिलच्या रात्री विजय बाबूने फेसबुक लाईव्हद्वारे त्याच्यावरील आरोपांबाबत प्रतिक्रिया दिली आणि या प्रकरणात तोच पीडित असल्याचं म्हटलं होतं. या लाईव्हदरम्यान त्याने पीडितेचं नावंही सांगितलं होतं.

फेसबुक लाईव्हद्वारे फेटाळले आरोप
“मी मानहानीचा खटला दाखल करेन. मी तिला इतक्या सहजासहजी सुटू देणार नाही. माझ्याकडे असलेले सर्व पुरावे मी शेअर करू शकतो, पण मी तसं करणार नाही. कारण मला तिच्या कुटुंबियांचं नुकसान करायचं नाही. मी फक्त माझी पत्नी, आई, बहीण आणि मित्रांना उत्तर देण्यास बांधिल आहे. ‘विजय बाबू दोषी नाही’ अशा छोट्याशा बातमीने हे सर्व संपू नये असं मला वाटतं. ती माझ्याकडे ऑडिशनसाठी आली होती आणि तिला भूमिका मिळाली. हे सर्व झाल्यानंतर आता ती कास्टिंग काउच आणि इतर गोष्टींबद्दल बोलतेय, याचा त्रास मला होत आहे. तिने मला नैराश्यात असल्याचे मेसेज पाठवण्यास सुरुवात केली. डिसेंबर ते मार्च २०२१ पर्यंतचे तिचे सर्व मेसेज माझ्याकडे आहेत. चारशेहून अधिक स्क्रीनशॉट्स माझ्याकडे आहेत. तिचे जे काही आरोप आहेत, मग ते बलात्कार किंवा सहमतीने असो, ते सर्व माझ्याकडे रेकॉर्डवर आहे” असं तो फेसबुक लाईव्हदरम्यान म्हणाला.

Web Title: Lookout notice issued for actor producer vijay bau in sexual assault case nrsr

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Apr 28, 2022 | 03:14 PM

Topics:  

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.