Maharashtra Shaheer Trailer : दिग्दर्शक केदार शिंदेचा (Kedar Shinde ) ‘महाराष्ट्र शाहीर’ (Maharashtra Shaheer ) या सिनेमाची गेल्या अनेक दिवसांपासून चर्चा आहे. सोशल मीडियावर या सिनेमाची खूप चर्चा सुरू आहे. सिनेमातील गाणी सध्या खूप गाजतायेत. बहरला मधुमास या गाण्याची सोशल मीडियावर क्रेझ पाहायला मिळत आहे. नुकताच या सिनेमाचा ट्रेलर रिलीज झाला आहे. त्याला चाहत्यांनी चांगला प्रतिसाद दिलेला आहे.
शाहीर साबळे यांच्या जीवनावर ‘केदार शिंदे’ यांच्या महाराष्ट्र शाहीर सिनेमाची कथा आधारित आहेत. अभिनेता अंकुश चौधरी शाहीर साबळेंची भूमिका साकारताना दिसत आहे. सिनेमाला अजय-अतुल (Ajay-Atul) यांनी संगीत दिलेलं आहे. सिनेमातील गाणी जितकी सुंदर आहेत तितकेच सिनेमातील डायलॉग्जही तगडे आहेत. ‘आम्ही कलाकार आहोत पण कुणाचे मिंधे नाही’ हा डायलॉग साऱ्यांच्या पसंतीस उतरताना दिसत आहे. सध्या सोशल मीडियावर या सिनेमातील संवादांची चर्चा सुरू आहे. सिनेमाचा ट्रेलरची खूपच चर्चा आहे.
या चित्रपटात शाहीर साबळे यांच्या पत्नीची भूमिका केदार यांची मुलगी सना शिंदे (Sana Shinde) तर आजीची भूमिका अभिनेत्री शुभांगी सदावर्ते साकारत आहेत. विशेष म्हणजे महाराष्ट्राचे पहिले मुख्यमंत्री यशवंतराव चव्हाण ही देखील या चित्रपटातून समोर येणार आहेत. अभिनेता अतुल काळे यशवंतराव चव्हाणांच्या भूमिकेत दिसत आहे. इतक्या वर्षांनी देखील ‘जय जय महाराष्ट्र माझा’ हे शाहिर साबळेंच्या आवाजातील गाणं अंगावर शहारे आणतं.
शाहिर साबळे यांच्या आयुष्यावर आधारित महाराष्ट्र शाहिर हा सिनेमा येत्या 28 एप्रिल 2023 रोजी रिलीज होणार आहे. त्याआधीच शाहिरांचं गीत महाराष्ट्राचं राज्यगीत म्हणून देखील घोषित करण्यात आलं आहे. हा सिनेमा रिलीजपूर्वीच चर्चेत आला आहे. ट्रेलरलासुद्धा प्रेक्षक चांगला प्रतिसाद देत आहेत. केदार शिंदे गेल्या 3 वर्षांपासून महाराष्ट्र शाहीर सिनेमाची तयारी करत आहेत. प्रेक्षकांपर्यंत शाहिरांचा जीवनप्रवास पोहचवण्यासाठी केदार शिंदे आणि टीमने खूप मनापासून प्रयत्न केला आहे.
‘महाराष्ट्र शाहीर’ या चित्रपटात शाहीर साबळे यांची भूमिका कोण साकारणार याची उत्सुकता सर्वांना होती. अखेर अंकुश चौधरी (Ankush Chaudhari) ही भूमिका साकारत असल्याचं समोर आलं आणि साऱ्यांनाच आनंद झाला. अंकुशचा एक खास लुक देखील समोर आला होता अंकुशने ही भूमिका योग्य रीतीने प्रेक्षकांपर्यंत पोहचवण्यासाठी पुरेपूर प्रयत्न केल्याचं त्यात दिसत आहे.