प्रेक्षकांना खळखळून हसवणारी 'महाराष्ट्राची हास्यजत्रा' घेणार प्रेक्षकांचा निरोप
Maharashtrachi Hasyajatra Off Air : ‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’ने फक्त महाराष्ट्रालाच नाही तर अवघ्या जगाला पोटधरून हसवलं आहे. अख्ख्या प्रेक्षकांचं खळखळून मनोरंजन करणाऱ्या हा शो लवकरच प्रेक्षकांचा निरोप घेणार आहे. याबद्दलची माहिती शो मधील कलाकारांनीच इन्स्टा स्टोरी शेअर करत चाहत्यांना माहिती दिली आहे.
खरंतर ‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’ने कोरोना काळात प्रेक्षकांचं निखळ मनोरंजन केलं आहे. सर्वत्रच भितीचं वातावरण असताना या शोने प्रेक्षकांचं खळखळून मनोरंजन केलं. गेल्या वर्षीही काही दिवसांचा ब्रेक घेत पुन्हा एकदा हा शो प्रेक्षकांचं मनोरंजन करण्यासाठी सज्ज झाला. ‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’ने अनेक कलाकारांना प्रसिद्धी मिळवून दिली आहे. गेल्या अनेक वर्षांपासून हा शो प्रेक्षकांचं खळखळून मनोरंजन करत आहे.
शोमध्ये मुख्य भूमिकेत असणाऱ्या रसिका वेंगुर्लेकर, नम्रता संभेराव, प्रियदर्शनी इंदलकर आणि शिवाली परबने इन्स्टा स्टोरी शेअर करत हास्यजत्रेच्या सेटचा फोटो शेअर केला आहे. अभिनेत्री प्रियदर्शनी जाधवने इन्स्टा स्टोरीवर शोच्या सेटवरील काही फोटो शेअर केले आहेत. प्रियदर्शनीने एका पोस्टमध्ये वनिता खरातसोबतचा एक व्हिडिओ शेअर केला आहे. त्यात तिने ‘शेवटचं शेड्युल’ असं लिहिलं आहे. त्यानंतर तिने स्टेजवरील पायऱ्यांसोबतचा एक फोटो शेअर केला आहे. यात तिने ‘Dear MHJ सदैवं तुझी आठवण येत राहिल’असं लिहिलं आहे.
शिवाय रसिका वेंगुर्लेकर हिनेही इन्स्टा स्टोरी शेअर केली आहे. तिने फोटोवर see you soon असं लिहिलंय. याचाच अर्थ ‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’ शो पुन्हा एकदा मोठा ब्रेक घेणार असल्याचं समजतंय. यामागचं कारण म्हणजे, ‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’ शो आता अमेरिका टूरवर जात आहे. या दौऱ्यावर ‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’शोचे सर्व कलाकार सहभागी होणार आहेत. १९ सप्टेंबर ते २६ ऑक्टोबर ‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’ शोचे कलाकार अमेरिका टूरवर जाणार आहेत. त्यामुळे ‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’शो काही काळ तरी बंद असणार आहे.
हे देखील वाचा – रणवीर ब्रारचा आता ‘तुफानी बिर्याणी हंट’, डिस्नी+ हॉटस्टारवर येणार धमाकेदार नवा सीझन
‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’ शो पहिल्यांदा २२ ऑगस्ट २०१८ रोजी पहिल्यांदा टेलिकास्ट झाला होता. अनेक नवख्या कलाकारांना संधी देत हा शो टेलिकास्ट झाला होता. प्रसाद खांडेकर, विशाखा सुभेदार, गौरव मोरे, वनिता खरात, रसिका वेंगुर्लेकर, प्रियदर्शनी इंदलकर, शिवाली परब, पृथ्वीक प्रताप, ओंकार राऊत या कलाकारांनी ‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’ शो गाजवला. आता काही काळ ब्रेक घेऊन ‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’ पुन्हा कधी भेटीला येईल याची सर्वांना उत्सुकता आहे.