Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Dussehra |
  • Navratri |
  • Ind vs Wi test |
  • Bihar Election 2025 |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

Punha Ekda Chaurang : भुषण प्रधान दिसणार नव्या भूमिकेत, ‘पुन्हा एकदा चौरंग’मध्ये उकलणार ‘त्या’ हत्येचं गुढ

मराठी सिनेसृष्टीत सध्या अनेक ज्वलंत विषयावर आधारित वास्तवदर्शी चित्रपट रिलीज होत आहेत. अनेक सिनेमांनी आजवर समाजातील दाहक विषय मोठया पडद्यावर मांडत समाजाला आरसा दाखवला आहे. याच वाटेवरील असलेला 'पुन्हा एकदा चौरंग' हा आगामी मराठी चित्रपट एका ज्वलंत विषयाला वाचा फोडणार आहे.

  • By चेतन बोडके
Updated On: Sep 15, 2024 | 03:58 PM
भुषण प्रधान दिसणार नव्या भूमिकेत, 'पुन्हा एकदा चौरंग'मध्ये उकलणार 'त्या' हत्येचं गुढ

भुषण प्रधान दिसणार नव्या भूमिकेत, 'पुन्हा एकदा चौरंग'मध्ये उकलणार 'त्या' हत्येचं गुढ

Follow Us
Close
Follow Us:

Punha Ekda Chaurang Teaser : मराठी सिनेसृष्टीला ज्वलंत विषयावर वास्तवदर्शी चित्रपट बनवण्याची फार मोठी परंपरा आहे. आजवर अनेक सिनेमांनी समाजातील दाहक विषय मोठया पडद्यावर मांडत समाजाला आरसा दाखवला आहे. याच वाटेवरील असलेला ‘पुन्हा एकदा चौरंग’ हा आगामी मराठी चित्रपट एका ज्वलंत विषयाला वाचा फोडणार आहे. ‘पुन्हा एकदा चौरंग’ या सिनेमाचा टिझर आणि पोस्टर नुकतेच प्रदर्शित करण्यात आले आहे. ‘आता मेणबत्ती नाही, होईल तो चौरंग’ असे म्हणत या चित्रपटाने जणू अन्यायाविरोधात एक लढाच पुकारला आहे.

हे देखील वाचा – रावडी अंदाज अन् नजरेत आग… शरद केळकरचा ‘रानटी’मधला थरारक लूक चर्चेत

आरोही फिल्म्सच्या बॅनरखाली निर्माते राजेंद्रकुमार गुलाबराव मोहिते आहेत. ज्योती राजेंद्रकुमार मोहीते सहनिर्मात्या आहेत. सागर दिनकरराव मोहिते यांनी दिग्दर्शनाची धुरा यशस्वीपणे सांभाळली आहे. ‘पुन्हा एकदा चौरंग’ हे शीर्षक खऱ्या अर्थाने चित्रपटाचा रंग दाखवणारे आहे. ही लढाई न्याय-अन्यायाची असल्याचे पोस्टर पाहिल्यावर सहजपणे जाणवते. ‘आता मेणबत्ती नाही…’ ही टॅगलाईन थेट ह्रदयाला भिडते. आज आपल्या आजूबाजूला जे घडत आहे ते भयानक आहे.

स्त्रिया-तरुणी यांचे जगणे असह्य झाले आहे. दिवसागणिक स्त्रियांवरील अत्याचाराच्या घटना समोर येत आहेत. हे चित्र पाहिल्यावर हाच आपला पुढारलेला, सुधारलेला, महिलांना समान वागणूक देणारा समाज का? असा प्रश्न कोणत्याही सुजाण नागरिकाला पडल्याशिवाय राहणार नाही. कोलकाता, बदलापूर सारख्या ठिकाणी घडलेल्या घटना स्त्रियांवर होणाऱ्या अन्यायचे प्रतीक आहेत. अशा असंख्य घटना आहेत ज्या कधी उजेडात आल्याच नाहीत. अशी कितीतरी प्रकरणे आहेत जी सत्ता आणि पैशाच्या बळावर दाबली गेली आहेत. ‘पुन्हा एकदा चौरंग’या चित्रपटाची कथाही अशाच प्रकारची आहे.

सुप्रसिद्ध लेखक प्रताप गंगावणे यांनी या सिनेमाचं लेखन केलं असून त्यांचे मोलाचे सहकार्य व मार्गदर्शन मिळाले आहे. प्रताप गंगावणे यांनी आजवर बऱ्याच यशस्वी चित्रपटांचे लेखन केले असून ऐतिहासिक चित्रपटांचे लेखन करण्यात हातखंडा असलेल्या प्रताप गंगावणे यांना विविध मानाच्या पुरस्कारांनी सन्मानित करण्यात आले आहे. प्रदर्शित करण्यात आलेला टिझर खऱ्या अर्थाने ‘पुन्हा एकदा चौरंग’ची झलक दाखवणारा आहे. याबाबत दिग्दर्शक सागर दिनकरराव मोहिते म्हणाले की, ‘पुन्हा एकदा चौरंग’ हा चित्रपट रसिकांना विचार करायला लावणारा आहे. केवळ रसिकांचे मनोरंजन न करता त्याद्वारे एक सशक्त संदेश देण्याचे प्रयत्न करण्यात आला आहे. सशक्त कथानकाला नावाजलेल्या कलाकारांनी उत्तम न्याय देण्याचे काम केले आहे. आवश्यकतेनुसार सुरेल गीत-संगीताची जोडही देण्यात आली आहे. दर्जेदार निर्मितीमूल्ये असलेला ‘पुन्हा एकदा चौरंग’ नक्कीच प्रेक्षकांच्या पसंतीस उतरेल अशी आशाही मोहिते यांनी व्यक्त केली.

हे देखील वाचा – तुटलेलं हृदय अन्…; बिग बॉसच्या घरातून आर्या जाधवला काढल्यानंतरची पहिली पोस्ट चर्चेत

‘पुन्हा एकदा चौरंग’मध्ये भूषण प्रधान आणि सौरभ गोखले हे दोन तगडे अभिनेते मुख्य भूमिकेत आहेत. त्यांच्या जोडीला अरुण नलावडे, जयवंत वाडकर, सिद्धी पाटणे, लतिका सावंत, महेश कोकाटे, दिव्येश मेदगे, नितीन कुलकर्णी, वंदना सरदेसाई, डॉ विलास कुलकर्णी, मिलिंद दास्ताने, संतोष पाटील, राजभूषण सहस्त्रबुद्धे, बाळकृष्ण शिंदे, डॉ बाळासाहेब केंडके, पंकज काळे, पुष्पा कदम, प्रसाद दबके, नीरज राठोड, ओमकार बोथटे, प्रथमेश काटकर, अमोल जाधव, सतीश तांदळे, किशन राठोड, विलास कदम यांच्या जोडीला नवोदित अभिनेत्री सलोनी सातपुते, श्रद्धा नालिंदे, हर्षदा तोंडीलकर, प्रतीक्षा पगारे या चित्रपटाद्वारे सिनेसृष्टीत पाऊल ठेवणार आहेत.

Web Title: Marathi actor bhushan pradhan and saurabh gokhale starrer punha ekda chaurang mararthi movie poster and teaser released in social media

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Sep 15, 2024 | 03:58 PM

Topics:  

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.